Skip to main content

शशक'२०२२ - संपत्ती

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
एका बरोबर एक आला. त्यातून झाले पाच. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले सात. संपत्ती तरी अजून कशाला म्हणतात हो ? पाचांच्या बरोबर पाच आले. त्यातून झाले दहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले वीस. संपत्ती तरी अजून चांगलीच जमत होती. दहांच्या बरोबर सहाच आले. त्यातून झाले सहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले बावीस. संपत्ती तरी अजून हवीशी वाटत होती. सहांच्या बरोबर शून्य आले. त्यातून झाले शून्य. तरी पण सुखात राहत होते सहा. संपत्तीच्या कल्पना कालानुरूप बदलणारच आणि बदलल्या तर कोणाला फरक पडतो ? सगळ्यांनाच शून्य आवडू लागले तर आपले कसे होणार !

शशक'२०२२ - आईचा मार

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारी भावड्याबरोबर खेळताना झालेल्या भांडणानंतर आईचा मार खाऊन छोटी आन्जी दिवसभर रूसून बसलेली. संध्याकाळी बाबा घरी आले की धावत जाऊन त्यांना बिलगली. "काय झालं बबड्या?" "मला तर वाटतं हा भावड्या नसताच तर बरं झालं असतं बाबा." आन्जी बाबांच्या कुशीत हुंदका देत बोलली. रात्री जेवतानाही बाबांनी आन्जीला बळंच आणून बसवली. आई अजूनही जाणूनबुजून तिच्याकडे लक्ष देत नव्हती. जेवायला सुरूवात झाली तसा भावड्या रडवेला होत आईला म्हटला, "आई! भोपळ्याची भाजी नाय ग आवडत मला." "खातोयस का मुकाट्याने, का देऊ धपाटा?" आई रागावून बोलली. "हम्म, कशी मारतेस ग माझ्या भावाला?

शशक'२०२२ - कलियुगात कॉनमॅन

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
सरतशेवटी आज जॉब पूर्ण होणार होता. इतक्या दिवस फोनवर तोंड चालवले त्याचे बक्षीस मिळणार. म्हाताऱ्यांची लूट करताना टोचणी लागते खरी, पण उत्क्रांतीच्या नियमांनुसार- ओटीपी दुसऱ्याला सांगायचा नसतो हे पण माहीत नसलेला माणूस नामशेषच होणारच. पण म्हाताऱ्याचा फोनवरचा अविर्भाव आज वेगळाच होता. चढ्या आवाजात प्रश्न विचारत होता, पोलिसांत तक्रार करणार म्हणत होता. सगळं मुसळ केरात ! त्याने फणकाऱ्याने फोन ठेवला. संध्याकाळी, म्हाताऱ्यानं फोनवरून जो डायलॉग मारलेला तोच सेम टू सेम डायलॉग टीव्ही वर सुपरिचित आवाजात ऐकल्यावर तो सटपटला- आणि दगाफटका झाल्याचे दुःख झाले. त्याने खोलीत जाऊन 'शोले'चे पोस्टर रागाने फाडले.