शशक'२०२२ - स्क्रीनटाईम
माझ्या वाढत्या स्क्रीनटाईमच्या व्यसनाबाबचा मानसोपचारतज्ञाने दिलेला रिपोर्ट वाचून होताच बायोटेलीपोर्टेशनतज्ञ डाॅ गफलावाला मला म्हणाले," तुला या व्यसनातून कायमचं सोडवीन मी . फक्त माझ्या एका प्रयोगात स्वेच्छेने सहभागी होतोयस असं लिहून सही कर इथे"
"काहीही करीन सर पण..." सही करताना मी म्हणालो.
"गुड. हे हेल्मेट घालून या होलोग्राम प्रतिमेत उभा रहा"
कानातला कल्लोळ दुर्लक्षून मी होलोग्राममधे उभा राहिलो.
डोळे उघडले तेव्हा समोर असलेले डाॅ गफलावाला म्हणत होते," कसं वाटतंय? आता वाढता स्क्रीन टाईम वगैरे विसरून जायचं"
"खरंच?"
" हो, काळ कायमचा गोठवलाय तुझ्यासाठी, पण.."
............
"सर ! माझे हात ?
मिसळपाव