मुलगी ही लायाबिलिटी ?
आजच्याच टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार एका सुप्रीम कोर्टाच्या महिला न्यायाधीशांनी आपल्या दोन्ही अविवाहित मुलींना 'लायाबिलिटी' म्हणून दाखवले आहे. आधीच आपल्या देशांत मुलींचे प्रमाण कमी होत चालले आहे म्हणून सरकारी पातळीवरुन ' मुलगा किंवा मुलगी' काहीच फरक नाही अशा अर्थाच्या जाहिराती चालू आहेत. त्याच्या विरुध्द जाणारे हे विधान आहे.
स्त्री ही कधी समाजाच्या गळ्यातली धोंड होऊ शकते का ? लग्नाचा खर्च तर हल्ली मुलांनाही येतो. स्त्री पुरुष समानता या देशात कधी येणार ?
हा स्त्री वर घोर अन्याय आहे म्हणून त्याचा तीव्र निषेध !!!
मिसळपाव
ह्या चिकन करीला bachelor's हे विशेषण देण्याचे कारण हे कि ही चिकन करी बनवायला काही पण वाटणे, घोटणे, कालवण करावे लागत नाही. फक्त एक कुकर आणि तो ही नसेल तर एक मोठं भांडं लागतं. तर तुमच्या मित्रांना किंवा (अम्म्म्म ... ) मैत्रिणींना impress करायचं असेल तर ही चिकन करी नक्कीच तुमच्या मदतीस येईल.
माझिद माझ्दी हा माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक. कलर ऑफ पॅरेडाइज, चिल्ड्रन ऑफ हेवन, द फादर अशा सगळ्याच कलाकृतींचा मी प्रचंड चाहता आहे. माझ्या तेहेरानच्या वास्तव्यात माझी या असामीची भेट होऊ शकली नाही याची अजुनही मला हुरहूर वाटते.
त्यांच्या सर्व कलाकृतींमधे माझी विशेष आवडती फिल्म म्हणजे 'बरान'
रशिया - अफगाण युद्धामधे विस्थापीत झालेले अफगाणी निर्वासीत लोक लपूनछपून तेहेरान बाहेरच्या निर्वासीतांच्या छावण्यांमधून दुर्दैवाचे दशावतार भोगताहेत.