चश्मीस डोळस, बोलके मोने, शहाणे खुळे, सोनार पितळे....
शिर्षक वाचूनच दचकलात ना ! दचकू नका. मी काही विरुध्दार्थी शब्दांच्या जोड्या लावलेल्या नाहीत. (आणी तुम्हालाही लावायला सांगत नाही)
अहो ही आहेत आडनांवे आणी तीही त्या आडनावांच्या व्यक्तींच्या गुणविशेषासकट.
तुम्हालाही कधी तरी असा प्रश्न पडला असेल की ही आडनांवे/उपनांमे (Family names) कशी पडली असतील कुटुंबांना? ज्यांचा वंशपरंपरागत/पिढीजात व्यवसाय आहे त्यांना त्यांच्या पेशाची नांवे पडणे हे ठिक आहे. पण म्हणून अशा विरुध्द गुणविशेषाची आडनांव का बरं समाजाने (आडनांवे कोणी ठेवली हे ज्ञात नसल्याने तुर्तास समाजाने) ठेवावीत.
हा काही काल्पनिक लेख किंवा कथा नाही.
मिसळपाव
