Skip to main content

चिलीया बाळाची कथा

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 22/12/2010 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
दत्तगुरूच्या संदर्भातील काही कथांवर इथे बरेच चर्वण झालेय. त्याच संदर्भातील एक गाणे आठवले . त्या गाण्यात " चिलीया बाळाची बारीक भाजी " असे काहीसे शब्द होते ती कथा नक्की काय आहे हे कोणास ठाऊक आहे का? असल्यास ती कथा काय आहे ते सांगावे. चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे? हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का?

चीनचे मनसे.

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 22/12/2010 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
चीन सरकारने एका अध्यादेशाद्वारे चिनी भाषेत इतर भाषीक शब्द येवून त्यामुळे चिनी भाषेत भेसळ होऊ नये म्हणून इतर भाषीक शब्दाची सरमिसळ करण्यास मनाई केलेली आहे. http://www.bbc.co.uk/hindi/news/2010/12/101221_china_english_ak.shtml हे भाषेची जपणूक करण्याचे आदर्ष उदाहरण ठरेल. किंवा चीन सरकार्ची प्रषंसा केली जाईल.

एक प्रश्न...

लेखक अवलिया यांनी बुधवार, 22/12/2010 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
Genesis 47 (New King James Version) वाचतांना खालील वाक्य वाचले. 15 So when the money failed in the land of Egypt and in the land of Canaan, all the Egyptians came to Joseph and said, "Give us bread, for why should we die in your presence?

स्टेटस चेंज्ड... आशिर्वाद हवेत !!

लेखक चिगो यांनी मंगळवार, 21/12/2010 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी पारतंत्र्यात आलो... जवळपास ४ वर्षांआधी माझ्या अटकेचा प्रस्ताव (प्रपोजल) मी माझ्या प्रेयसीसमोर मांडला.. त्यावर बराच विचार करुन झाल्यावर तिने मंजूरी दिली. नंतर हा प्रस्ताव हायर कोर्टांमधून पास होत होत फायनली त्याला मंजुरी मिळाली, आणि ०२डिसेंबर २०१० रोजी आम्ही विवाहबद्ध झालो... (ढिसक्लेमर - लग्नाची पत्रिका मिपावर टाकणार होतो, पण स्कॅनर नव्हता आणि फोटोपण स्पष्ट येत नव्हता. नंतर धावपळीत ते राहूनच गेलं.

सचिनला कराचीच्या 'गॉन'चा मानाचा मुजरा!

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 21/12/2010 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
सचिनला कराचीच्या 'गॉन'चा मानाचा मुजरा! कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या 'गॉन' या वृत्तपत्राचा मी नियमित वाचक आहे 'मिपा'वर बर्‍याच लोकांना माहीत आहे. आज या पाकिस्तानी वृत्तपत्राने अतीशय सुंदर भाषेत सचिनला मानाचा मुजरा केला आहे!

अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेला देश : भारत

लेखक गांधीवादी यांनी मंगळवार, 21/12/2010 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मन बेकरी बॉंबस्फोटातील आरोपी मिर्झा हिमायत बेग याला येरवडा कारागृहात वाचण्यासाठी कुराण, वर्तमानपत्र द्यावे, असा आदेश विशेष न्यायाधीश उषा ठाकरे यांनी दिला. १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका बॉम्ब स्फोटाने १७ निष्पापांचा जीव घेतला आणि ५०-६० लोकांना जखमी केले. हे अघोरी कृत्य करण्यास जबाबदार असलेल्या मिर्जा हिमायत ऊर्फ युसुफ बेग याला (७ महिन्यांनी) अखेर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने पुणे येथून अटक केली.

यु ट्युब वरचे व्हिडीओज कसे डाउनलोड करतात??

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 21/12/2010 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
यु ट्युब वर विविध विषयांवरील माहितीपर व्हिडीओ उपलब्ध असतात. उदा: लहान मुलांसाठी वैज्ञानिक प्रयोग, नृत्य शिकवणार्‍या स्टेप्स, विविध बालगीते वगैरे. यु ट्युब वरील व्हिडीओ आपल्या कॉम्प्युटर मध्ये डाऊनलोड कसे करतात याबद्दल कुणाला माहित असल्यास कृपया येथे सांगावे. सर्वांना त्या माहितीचा उपयोग होईल. धन्यवाद!