युध्द : जागतिक अर्थव्यवस्थे ची गरज ?
In reply to या धाग्यावर खरंच माहितीपूर्ण by बिपिन कार्यकर्ते
In reply to या धाग्यावर खरंच माहितीपूर्ण by बिपिन कार्यकर्ते
In reply to असेच by प्रदीप
In reply to कधी ना कधी अमेरिका अन उ. कोरियाचे युध्द निश्चित by वाहीदा
In reply to लेखातील विचारांशी बराचसा सहमत by अवलिया
In reply to वॉर इज पीस by नितिन थत्ते
In reply to डॉलर आणि यूरो च्या युध्दात by डीलर
In reply to डिलर जी, मतितार्थ असा आहे कि by वडिल
In reply to समजले नाही by प्रदीप
In reply to प्रदिप, अमेरीके च्या डॉलर मधे by वडिल
युरोपात अनेक देश कफल्लक आहेत ( ग्रीस ,पोर्तुगाल....) जर युरो मधे जगानी व्यवहार केले नाहित तर युरो ला काहिहि मागणी रहाणार नाहि आणि भाव घसरुन अर्थव्यवस्था अजुन कोलमडेल.नाही हो ते कारण नाही.खरे कारण आहे ग्रीस आणि इतर देशांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेत घातलेला सावळागोंधळ.ग्रीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना बेसुमार सवलती दिल्या गेल्या आणि अनेक पांढरे हत्ती पोसले.त्यातून सरकारचे उत्पन्न आणि खर्च यातील फरक असलेले फिस्कल डेफिसिट वाढले.युरोपियन युनियनच्या सदस्यत्वासाठी ३% डेफिसिट असा नॉर्म असताना ग्रीसचे डेफिसिट १०% पेक्षा जास्त झाले.यातूनच ग्रीस सरकार त्यांच्या बॉंडवरील व्याज आणि मुद्दल यावर डिफॉल्ट करेल अशा अवस्थेला पोहोचले.युरोपातील इतर देशांतील बॅंकांनी ग्रीस सरकारचे बॉंड मोठ्या प्रमाणावर खरेदी केले होते.तेव्हा ग्रीस सरकारने डिफॉल्ट केल्यास या सगळ्या बॅंका अडचणीत येणाऱ्यातल्या होत्या.यावर उपाय म्हणजे जर्मनी आणि युरोपीयन युनियनला ग्रीससाठी तातडीचे पॅकेज जाहिर करावे लागले.देशातील सरकार बॉंडवर डिफॉल्टपर्यंत पोहोचणे याची निशाणी असते त्या बॉंडवरील यिल्ड (व्याज) वाढणे.एकदा सरकारी बॉंडवरील व्याज वाढले की अर्थव्यवस्थेतील व्याजाचे इतर दरही वाढतात.व्याजाचे दर वाढले की त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट पर्णाम होतो.तसेच इंटरेस्ट रेट पॅरिटीप्रमाणे व्याजाचे दर वाढले की त्या चलनाचे अवमूल्यन होते. युरोपातील देशांचे चलन एकच असल्यामुळे आणि मुख्यत: त्यांच्या अर्थव्यवस्था इंटिग्रेटेड असल्यामुळे व्याजाचे दर हे पूर्णपणे त्या देशातील सरकारच्या हातात राहत नाहीत. एका युरोपीयन देशातील व्याजाच्या दरांवर इतर देशांतील परिस्थितीचाही परिणाम होतो.आणि हा प्रश्न केवळ ग्रीसपुरता मर्यादित नाही.तर पोर्तुगाल,इटली,आयर्लंड आणि स्पेन या इतर देशांमध्येही हाच प्रश्न आहे.मध्यंतरी आयर्लंडमध्येही ग्रीससारखे पॅकेज द्यावे लागले.तीच वेळ पुढील २-३ वर्षात पोर्तुगाल,इटली आणि स्पेनवर येणार हे नक्कीच. तेव्हा अशा परिस्थितीत पूर्ण युरोझोनमध्ये हा प्रश्न पसरला आणि म्हणून युरोची पडझड झाली.मूळ कारण सगळ्या जगाने युरोत व्यवहार न करणे हे नाही तर त्या देशांमधील अर्थव्यवस्था वाईट पध्दतीने हाताळली हे आहे. भारतीय रुपयात पूर्ण जगातील १% व्यवहारही होत नसतील.मग तुम्ही म्हणता त्या न्यायाने भारतीय रूपया किती गडगडायला हवा.
चीन , रशिया आणि युरोपिय देश जास्तित जास्त व्यवहार युरो मधे करुन अमेरीके ला (डॉलरला) शह देत आहेतचीनने प्रचंड प्रमाणावर अमेरिकन डॉलर आपल्याकडे ठेवले आहेत आणि चीनची परकीय चलन गंगाजळी प्रचंड प्रमाणावर आहे.साधारण ३-४ वर्षांपूर्वी चीनने स्वत:चा "सार्वभौम फंड" (Sovereign Wealth Fund) स्थापन केला.२००७ मध्ये चीनच्या फंडने काही अमेरिकन बॅंका आणि मुख्य म्हणजे मॉर्गन स्टॅनले सारखी इन्व्हेस्टमेन्ट बॅंक यांच्यात गुंतवणूक केली आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेला काही प्रमाणावर तरी स्थैर्य दिले.याचे कारण अमेरिकन अर्थव्यवस्था कोसळणे सध्या तरी कोणालाच परवडणार नाही.तेव्हा जास्तीत जास्त व्यवहार युरोत करून डॉलरला शह देणे म्हणजे तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे? आज जगाचे जीडीपी सुमारे ५८ ट्रिलियन डॉलर्स आहे त्यापैकी अमेरिकेचा वाटा आहे सुमारे १६ ट्रिलियन डॉलर्स आणि चीनचा सुमारे ५.५ ट्रिलियन डॉलर्स.तेव्हा आजही इतक्या अडचणी येऊनही अमेरिकेची अर्थव्यवस्था चीनपेक्षा तीनपट मोठी आहे.आणि चीनच्या जीडीपीच्या सुमारे २३-२४% भाग हा निर्यातीवर अवलंबून आहे.जर अमेरिकेसारखी मोठी अर्थव्यवस्था कोसळली तर त्याचा फटका चीनलाही बसणारच आहे.तेव्हा चीनने कितीही वेगाने प्रगती केली आणि अमेरिकेत कितीही अडचणी आल्या तरी आणखी १० वर्षे तरी चीन डॉलरला शह वगैरे द्यायच्या भानगडीत पडणार नाही असे मला वाटते.नंतरचे सांगता येत नाही. असो.
In reply to कसे काय? by क्लिंटन
In reply to क्लिंटन साहेब,माझा वरचा by वडिल
In reply to प्रतिसाद by प्रदीप
In reply to प्रदिप, एका ओळीचा प्रश्न by वडिल
पण... ते सोडवण्या साठि युरोप युरो मधे कर्ज न घेता अमेरीकेच्या फेडरल रिजर्व कडुन (डॉलर) कर्ज घेत आहेत हे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे इलेक्श न च्या दुसर्या दिवशीच क्वान्टिटेटिव इजींग ... म्हणजे थोडक्यात डिवाल्युएशन ( नोटा छापणे). आजची समस्या उद्दावर ढकलण्या सारखे. त्या मुळे बॉन्ड नोटस कोसळल्या आहेत. नाहितर युरो आणि युरोपिय अर्थव्यवस्था आत्ताच गडगड्ली असती आणि ब्लॅक क्रिसमस दिसला असता. असो.हे समजले नाही. युरोतील ज्या देशांच्या अर्थव्यवस्था धडपडत आहेत त्यांना युरोची सेंट्रल बँक मदत करीत आहे (तेथील रोखे विकत घेऊन). त्यासाठी युरोची सामायिक गंगाजळी मुख्य्तवे वापरण्यात येत आहे. ह्या गंगाजळीचे प्रमुख काँट्रिब्युटर्स त्यांच्यातील सधन देश-- प्रामुख्याने जर्मनी व मग फ्रान्स. अशा प्रकरे मदत करीत रहाण्यास जर्मनीचा अर्थातच विरोध आहे. त्यामुळे अलिकडे त्यांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या (म्हणजे ग्रीस व आयर्लंड) ह्या पुढील मदतींसाठी निम सरकारी -- खाजगी-- गुंतवणूकदारही जबाबदार रहातील अशी तरतूद केली आहे. ह्याचा अर्थ ह्यापुढील युरोतील आर्थिक दृष्ट्या धडपडणार्या देशांचे डेट रिस्ट्रक्चरींग करतांना इतर सरकारीच नव्हे तर प्रायव्हेट गुंतवणूकदारांनाही झळ सोसावी लागेल!! ह्य बातमीमुळे अर्थात खाजगी गुंतवणूकदार अधिकच धास्तावले आहेत, व ग्रीस, पोर्तुगाल व स्पेन ह्या देशांच्या रोख्यांचे यिल्ड अजून वाढले आहे. ह्या देशांच्या सी. डी. एस.च्य किंमती अजून चढत आहेत. ही सगळी लक्षणे युरोसाठी फारशी चांगली नाहीत. तेव्हा लवकरच युरो विसर्जित करावा लागेल की काय अशी चिन्हे सध्यातरी दिसत आहेत. ग्रीस व आयर्लंड येथे यूरोपीय सेंट्रल बँकेच्या व्यतिरीक्त आय. एम. एफ. नेही पैसे टाकलेले आहेत. पण तसे त्यांनी इतरत्र्सही टाकलेले होते (उदा. ९७ सालच्या आशियाई देशांच्या धडपडीत). ह्या सर्वाचा व QE2 चा संबंध काय? (परत प्रश्न-- कारण असले अजून एक भोंगळ विधान तुम्ही करीत आहात). अमेरीकेने QE2 त्यांच्या स्वतःच्या मोडकळीला अलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केले आहे. गंमत पहा-- डॉलर व युरो ह्यांच्यात कसलेतरी युद्ध सुरू आहे, अशा विधानापासून तुमची सुरूवात झाली. आता अमेरीकेच्या फेडच्या QE2 चा उद्देश युरोचा पडता डोलारा सावरणे असा होता अशा अर्थाचे काही तुम्ही ह्या प्रतिसादात लिहीले आहे! तुमच्या ज्या विधानांविषयी तुम्हाला नेमके काय अभिप्रेत आहे हे समजत नाही (कारण तुमच्या मते ते ढोबळ लिहीलेले असते) त्यांविषयी नेमके तुम्हाला काय म्हणायचे आहे हे समजून घेण्यासाठी मी प्रश्न विचारतो. त्याविषयी मला कसलीही लाज अथवा खंत वाटत नाही. आपण जे लिहीतो त्याविषयी तुम्ही नीट, सविस्तर व कोहीरंट उत्तरे द्याल अशी किमान आशा आहे. आता येथेकी तुम्ही जे उत्तर दिले आहे, त्याविषयी परत विचारावे लागते आहेच! 'नियाल फर्ग्युसन्चे पुस्तक तुम्ही वाचले आहेत (व म्हणून तुम्ही युरोच्या आर्थिक धडपडीविषयी सविस्तर लिहीत आहात)' अशी शाबासकी तुम्ही क्लिंटन ह्यांना दिली होती. तेव्हढ्यापुरता मी तो उल्लेख केला आहे, कारण ह्या घडामोडी अगदी अलिकडच्या आहेत, फर्गुसनच्या पुस्तकात त्यांचा उल्लेख नाही. माझ्या लिहीण्याचा रोख तुमच्यावर हल्ला करण्याचा दिसत असेल तर तो तुमचा प्रश्न झाला. चर्चा सुरू करतांना व त्यापुढे प्रतिसादातूनही कोहीरंट, नेमकी माहीती देता यावी. उगाच चार टर्म्स उडवल्या तर कुणी ना कुणी तरी त्याविषयी पृच्छा करणार, हे मी तुम्हाला सांगायला नको.
In reply to उत्तर by प्रदीप
In reply to प्रदिप, तुम्हाला काहिहि by वडिल
तुम्हि युध्द आणि अर्थ कारण यांचा संबध नाहि हे तरी लिहा.युद्ध आणि अर्थकारण ह्यांचा पूर्वापार संबंध आहे, हे वर मी माझ्या ह्या धाग्यावरच्या पहिल्या प्रतिसादातच मान्य केले आहे. तुम्ही ते वाचले नसेल तर पुन्हा वाचा.
मी सुचवले.. युरोपात ला डेट क्रायसीस आणि युध्द अर्थकारण याचा संबध नाहि.अगदी बरोबर. पण डॉलर-युरो युद्ध सुरू आहे आणि त्यावर खुलासा विचारल्यावर QE2 वगैरे कुणी लिहीले? धागा तुमचा, त्याचे लेखक तुम्ही आणि डाफरताय दुसर्यांवर? आता मला खरोखरीच हसू येते आहे :) मेरी ख्रिस्मस!!
In reply to क्लिंटन साहेब,माझा वरचा by वडिल
गेल्या आठवड्यात तर चीन आणि रशिया नी रुबल आणि युआन मधे संरक्षण विषयक करार केला.तुम्ही नक्की कोणत्या संरक्षण विषयक कराराबद्दल बोलत आहात?मी ती बातमी फॉलो केली नव्हती आणि गुगलूनही गेल्या आठवड्यात रेलेव्हन्ट काही मिळाले नाही.गेल्या महिन्यातील ही बातमी तुम्हाला अभिप्रेत आहे का?त्या बातमीत म्हटले आहे की पूर्वी चीन आणि रशिया अमेरिकन डॉलरमध्ये व्यापार करत पण आता ते हळूहळू त्यांच्या चलनांमध्ये व्यापार करणार आहेत. या दुव्यावर चीन आणि रशियातील करारावर म्हटले आहे की दोन देशांमधील व्यापार वर्षाला ५० बिलियन डॉलर आहे आणि तो आकडा जागतिक व्यापारात मोठ्या उलथापालथी घडवू शकणार नाही.पण या करारातून प्रेरणा घेऊन पुढे पेट्रोलियमचा वार्षिक २.३ ट्रिलियन डॉलरचा व्यापार (सध्या जो डॉलरमध्ये चालतो) तो लोकल चलनात चालायला लागल तर डॉलरवर त्याचा परिणाम होईल आणि असा परिणाम होऊ द्यायचा की नाही हे सौदी अरेबिया सारख्या देशांवर अवलंबून आहे. यातही पुढील मुद्दे आहेत. १. सौदी अरेबियानेही अमेरिकेत अनेक शे बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे हे Fahrenhite 911 सारख्या चित्रपटात म्हटले आहेच.तेव्हा डॉलर कोसळणे म्हणजे सौदी अरेबियाचेही नुकसान आहेच. २. चीनकडे सुमारे २.६ ट्रिलियन डॉलर इतके परकीय चलन आहे.चीनचे जीडीपी दरवर्षी ५.५ ट्रिलियन डॉलर आहे हे लक्षात घेतले तर त्यांच्याकडील परकीय चलनाचा साठा किती मोठा आहे हे कळते.डॉलर कोसळणे आणि त्या प्रक्रियेला स्वत: चीनने मदत करणे म्हणजे आपल्या पायावरच धोंडा पाडल्यासारखे होणार नाही का? ३. आज अमेरिका हीच पेट्रोलियम पदार्थांसाठीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.तेव्हा या बाजारपेठेच्या नुसत्या आकारामुळे अमेरिका ही competitive market मधील price taker नाही तर price maker सुध्दा आहे. अशा मोठ्या ग्राहकाकडे बार्गेनिंग पॉवर जास्त असते. तेव्हा चीन-रशिया करारामुळे डॉलर कोसळेल असे म्हणणे मला तरी far-fetched वाटते.
त्या मुळे युरो आणि डॉलर वरुन डिलिवरेजींग / हेजींग करण्याचे अजुन एक टुल मिळाले. डॉलर आणि युरो ची मागणी हळु हळु कमी झाली म्हणजे हेजींग /डि रिस्किंग ला मोठा स्प्रेड मिळेलयाचे अधिक स्पष्टीकरण देऊ शकाल का?जागतिक व्यापारातील काही मुख्य रिस्क असतात. त्या म्हणजे परकीय चलनाच्या विनिमय दरांमधील होणारे चढउतार (करन्सी रिस्क), व्याजाच्या दरांमध्ये होणारे चढउतार (इंटरेस्ट रेट रिस्क) आणि मूळ गोष्टीतील (उदाहरणार्थ पेट्रोलियम) दरांमध्ये होणारे चढउतार. यासाठी हेजिंग करायला करन्सी फॉरवर्ड्स/फ्युचर्स, कमोडिटी फॉरवर्ड्स/फ्युचर्स, Forward Rate Agreement, Eurodollar Futures असे विविध टूल असतात.तेव्हा हेजिंगसाठी आणखी टूल मिळेल म्हणजे नक्की कोणते?ते कशा स्वरूपाचे असेल?
व्य नी नी अधिक बोलु.आपल्या चर्चेत इतर कोणाला रस असेल तर त्यांनाही हे वाचता यावे म्हणून व्य.नि न करता इथेच लिहित आहे.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to अवांतर by प्रदीप
विमान कंपन्या इंधनाची फ्यूचर काँट्रॅक्ट्स करतात व पैशाची बचत करतात.हो बरोबर.पण विमानाच्या इंधनाची फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स सर्वत्र एक्स्चेंजवर उपलब्ध नसतात. उदाहरणार्थ अमेरिकेत अशी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स एक्स्चेंजमध्ये नाहीत पण गेल्या २-३ वर्षांपासून अशी कॉन्ट्रॅक्ट्स भारतात एक्स्चेंजमध्ये उपलब्ध आहेत. जिथे अशी कॉन्ट्रॅक्ट्स उपलब्ध नसतात तिथे विमानवाहतूक कंपन्या विमानाच्या इंधनाला सर्वसाधारण मिळत्याजुळत्या कमोडिटीवर (उदाहरणार्थ क्रूड पेट्रोलियम तेल) फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स घेतात.
कधीकधी हे अंगाशी येतेहे सगळ्यात महत्वाचे.असे अंगाशी आल्यामुळे बिलियन डॉलर्सचे नुकसान होण्यापासून दिवाळखोरी जाहिर करावी लागण्यापर्यंत वेळ विविध कंपन्यांवर आली आहे.यापैकी Metallgeschaft या कंपनीची केस रिस्क मॅनेजमेन्ट कम्युनिटीमध्ये खूपच लोकप्रिय आहे.जमल्यास यावर स्वतंत्र लेख कधीतरी. अर्थात या सगळ्याचा मूळ चर्चा विषयाशी संबंध नाही.पण एकातून एक विषय निघत गेले आणि त्यात हा विषयही आला.तेव्हा भविष्यातही कोणी ही चर्चा वाचल्यास पूर्ण माहिती मिळावी म्हणून हा प्रतिसाद.
In reply to डिलर जी, मतितार्थ असा आहे कि by वडिल
In reply to आपल्याकडे मान्युफाकच्यरींग by विजुभाऊ
In reply to विजुभाउ, धन्यवाद .तुमचे by वडिल
In reply to आंतरराष्त्रीय व्यापार केवळ by विजुभाऊ
In reply to +१ by क्लिंटन
In reply to जर एकच कंपनी दोन देशांना by वडिल
तुमचं सर्व लेखन हेच दर्शवते आहे कि अमेरीकेचा मुख्य धंदा हा सर्व देशांना शस्त्र पुरवणे हा आहे. कोणाला किती हाच फक्त वादाचा विषय आहे.कसे काय?माझ्या मते तरी अमेरिकेचा मुख्य धंदा स्वत:चा स्वार्थ साधणे हाच आहे.आणि तो तसा असेल तर त्यात काही गैर मला वाटत नाही.घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणी भाजत नसतो.जर स्वत:चा स्वार्थ इतर देशांना शस्त्रे विकून साधता येत असेल तर अमेरिका तसे करेल आणि जर इतर देशांमधील युध्द थांबवून स्वत:चा स्वार्थ साधता येत असेल तर अमेरिका ते ही करेल.
समजा आज किंवा उद्या युध्द झाले नाहि तरी ... युध्द करवुन व्यापार वाढवता येइल का नाहि ?दक्षिण आशियाच्या संदर्भात सुमारे २० वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत नि:संदिग्ध हो.मधल्या काळात उत्तर तितके निंसंदिग्ध नव्हते.पण आताच्या काळात युध्द करवून शस्त्रांचा व्यापार जितका वाढेल त्याच्या अनेक पटींनी युध्दात भारताच्या होणाऱ्या नुकसानामुळे तो कमी होईल.भारत-पाकिस्तान दरम्यान युध्द झाले तर (अमेरिकेने पाकिस्तानची अण्वस्त्रे ताब्यात घेतली नाहीत तर) ते अणुयुध्दच होईल हे वेगळे सांगायला नको. इथे Fortune 500 कंपन्यांची यादी दिली आहे.त्यात लॉकहिड मार्टीन ही एफ-१६ विमाने उत्पादन करणारी कंपनी ४४व्या क्रमांकावर आहे.पण त्यापेक्षाही वॉलमार्ट, बॅंक ऑफ अमेरिका, जनरल इलेक्ट्रीक,जे.पी.मॉर्गन चेस,एच.पी,सिटीग्रुप,प्रॉक्टर ऍन्ड गॅम्बल,जनरल मोटर्स या कंपन्या मोठ्या आहेत आणि त्यांचे हितसंबंध दक्षिण आशियात अणुयुध्द होऊ नये यातच गुंतलेले आहेत हे नक्की. भारतात वेगाने वाढणारे एअरलाईन्स क्षेत्र ही पैशाच्या दृष्टीने विचार केला तर भारत ही बोईंगसाठी लॉकहिड मार्टीनपेक्षा मोठी बाजारपेठ आहे. प्रॉक्टर ऍन्ड गॅम्बलची उत्पादने जगभरात जवळपास सर्वत्र विकली जातात पण भारतीय मध्यमवर्गीयांची संख्या लक्षात घेता भारत ही त्या कंपनीची मोठी बाजारपेठ आहे.अणुयुध्द झाले तर भारतात लोकांना विमान प्रवास परवडेल का?म्हणजे त्यात बोईंगसारख्या कंपनीचे नुकसान नाही का? भारताचे अणुयुध्दात मोठे नुकसान झाले तर एरियल, मॅक ३, टाईड हे सध्या अगदी गल्लोगल्ली विकले जाणारे ब्रॅन्ड लोकांना परवडतील का?म्हणजेच त्याचा प्रॉक्टर ऍन्ड गॅम्बलला मोठा फटका बसणार हे नक्कीच. असेच Fortune 500 कंपन्यांपैकी अनेकांविषयी लिहिता येईल.तेव्हा निदान दक्षिण आशियात युध्द करवून अमेरिका स्वत:चा स्वार्थ साधेल असे वाटावे अशी परिस्थिती आहे का? अर्थात उद्या पाकिस्तान तालिबान्यांच्या हातात गेला तरी अणुयुध्द होणार नाही अशा भ्रमात मी नक्कीच नाही.माझा म्हणायचा उद्देश आहे की तुम्ही म्हणता तसे युध्द अमेरिका करवणार नाही असे मला वाटते.
सदैव युध्द सदृश भितीदायक वातावरण ठेवलं तर व्यापारावर / इन्वेस्ट्मेन्टस वर त्याचा काय परीणाम होईल ? भारतीय उप खंडयाचे उत्तर वर लिहिले तसेच आहे.त्याचा व्यापारावर आणि इन्व्हेस्टमेन्टवर वाईट परिणाम होईल आणि सध्याच्या काळात ते अमेरिकेला परवडण्यासारखे नाही.
In reply to डिलर जी, मतितार्थ असा आहे कि by वडिल
In reply to http://www.bbc.co.uk/news/wor by अवलिया
या धाग्यावर खरंच माहितीपूर्ण