Skip to main content

अर्धवट

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 03/01/2011 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्वताभोवतीच्या ह्या पिंजर्यात पक्ष्याने कुठे उडायचे... त्याच त्याच भिंती चहुकडे नविन त्यात काय पहायचे ... तितक्यात त्याला दिसला समोर आइना पाहावे त्यात वाटले पण धाडस कही होइना दिसेल आपलाच भेसूर चेहरा ह्या जाणिवेने काळजाचा ठोका चुकला आणि जीवन्त पणाचा आभास जपत त्याने आपला एक पंख छाटला आता नको ते उडणे, नको तो स्वच्छंद हट्ट मिटून घेतले अंग अंग मिटून घेतले डोळे घट्ट पसरला जीवघेणा काळोख, दाटला अंधार मिट्ट वाटले आला शेवट ... भेदरून मी घाबरून मी मिटलो अर्धवट ... मी उरलो अर्धवट ...
काव्यरस

मंकी मूडस....

लेखक किल्लेदार यांनी रविवार, 02/01/2011 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
हम्पी आणि बदामी ला फिरतांना बरीच माकडे आणि त्यांच्या मर्कटचेष्टा बघायला मिळतात. हम्पीतील माकडे साळसूद,गमतीदार आणि शांत आहेत तर बदामीतील जरा आगाऊ आणि व्रात्य ...

चश्मीस डोळस, बोलके मोने, शहाणे खुळे, सोनार पितळे....

लेखक मिलिंद यांनी रविवार, 02/01/2011 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षक वाचूनच दचकलात ना ! दचकू नका. मी काही विरुध्दार्थी शब्दांच्या जोड्या लावलेल्या नाहीत. (आणी तुम्हालाही लावायला सांगत नाही) अहो ही आहेत आडनांवे आणी तीही त्या आडनावांच्या व्यक्तींच्या गुणविशेषासकट. तुम्हालाही कधी तरी असा प्रश्न पडला असेल की ही आडनांवे/उपनांमे (Family names) कशी पडली असतील कुटुंबांना? ज्यांचा वंशपरंपरागत/पिढीजात व्यवसाय आहे त्यांना त्यांच्या पेशाची नांवे पडणे हे ठिक आहे. पण म्हणून अशा विरुध्द गुणविशेषाची आडनांव का बरं समाजाने (आडनांवे कोणी ठेवली हे ज्ञात नसल्याने तुर्तास समाजाने) ठेवावीत. हा काही काल्पनिक लेख किंवा कथा नाही.

टूटीफ्रूटी केक

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 02/01/2011 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
शाही अंडा बिर्याणीचा यथेच्छ आस्वाद घेता घेता दिनेश आणि केसुने टूटीफ्रूटी केक हवा आहे असे जाहीर केले, त्या दोघांना कामाला लावून हा केक बनवला. साहित्य- २५० ग्राम बटर/लोणी/मार्गारीन, २०० ग्राम साखर, ५ अंडी, २५० ग्राम मैदा,२ चहाचे चमचे बेकिंग पावडर, २ चहाचे चमचे वॅनिला अर्क, १चमचा लिंबाचा रस, अर्धी वाटी टूटीफ्रूटीचे तुकडे, पाव कप दूध, १ चिमूट मीठ कृती- बटर भरपूर फेटून घेणे, साखर घालून फेटणे, अंडी घालून फेटणे, वॅनिला अर्क, लिंबाचा रस घालून फेटणे. मैदा+ बेकिंग पावडर+ मीठ एकत्र करुन वरील मिश्रणात घालणे व फेटणे.

देवप्रयागला भेट

लेखक संजय अभ्यंकर यांनी रविवार, 02/01/2011 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडे कंपनीच्या कामानिमित्त हरिद्वार ला दिडेक महीने होतो. एका रवीवारी वेळ मिळाल्यावर देवप्रयागला फेरी मारली. येथे बद्रिनाथ जवळून येणारी अलकनंदा व गोमुखहून येणारी भागीरथी चा संगम आहे. येथून पुढे हि नदी गंगा म्हणून ओळखली जाते. ह्रिषीकेश पासुन ८० कि.मी. तर हरिद्वार पासुन ११० कि.मी. वर असलेले शांत व सुंदर ठीकाण. त्याची काही चित्रे. अलकनंदा (डा) व भागीरथी (उ) संगम.

भ्रष्टाचार व लॉबीइंग

लेखक रणजित चितळे यांनी रविवार, 02/01/2011 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
१ निरा राडीया ह्या मोठ मोठ्या कंपन्यांसाठी लॉबीइंग करायच्या. अर्थातच पैशाच्या मोबदल्यात. अशा लॉबीइंगला भ्रष्टाचार म्हणता येईल का. सिग्नलला पोलिसाने पकडले तर काही लोक पैसे देऊन सुटतात - हे एक प्रकारचे लॉबीइंगच झाले. माझे उत्तर - हा भ्रष्टाचारच आहे. -- सोयी करता कोणी ह्याच गोष्टीला लॉबिइंग हे नाव ठेवतात. काहींचे म्हणणे पडते की अमेरीकेत (व प्रगत राष्ट्रात) सुद्धा असेच चालते (म्हणजे ते बरोबर) किंवा हल्ली चे मॅनेजमेंट चे एक तंत्र आहे असे म्हणतात. २. निरा राडीया केंद्रात कोणते मंत्री पाहिजे हे ठरवू शकते (पंत प्रधान ठरवतात असे मला वाटायचे). हे अराजक नाही का.

तात्या अभ्यंकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना !

लेखक नीलकांत यांनी रविवार, 02/01/2011 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो ,
Tatya
आज आपल्या मिसळपावचे संस्थापक श्री तात्या अभ्यंकर यांचा वाढदिवस आहे. मिसळपाव उभारणीत आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय करण्यात तात्यांचा सिंहाचा वाटा आहे. मिसळपावच्या तात्या अभ्यंकरांना मिसळपावच्या सर्व सदस्यांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना.

किती सांगू मी आनंद झाला-

लेखक विदेश यांनी शनिवार, 01/01/2011 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल:- किती सांगू मी सांगू कुणाला-) किती सांगू मी आनंद झाला , भाव भाज्यांचा खाली ग आला ! गडे जाऊ चला , भाज्या आणू चला- रुपयाला किलो कांदा झाला ! ।१। नवर्‍याच्या संगती ग , पिशव्या हाती घेऊन मी आले ‘नको हसू गालात , नको चालू तोर्‍यात-’ नवरोजी कुरकुरले ! चुका-दोडका-लसूण , कोबी-आलं-सुरण , नवलकोलात फ्लॉवर दिसला ! ।२। मेथी शेपू भेंडी ग , पालकाची पेंढी भुलले ग्राहक किती ! कुणी मागे गवार , कुणी घेवडा-मटार शेंगांना नांवे किती ! रोज फोडी करून , ते बटाटे चिरून- सांज सकाळी कंटाळा आला !