Skip to main content

असे कुणीतरी यावे.....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
असे कुणीतरी यावे, जिच्यात आपण हरवूनी जावे । शोधिता अपुल्यास अपुल्यात अपुल्याला, तिचेच दर्शन व्हावे । हे असे कुणीतरी यावे..... ओठांतले ते शब्द तिने मग, अलगद झेलुनी घ्यावे । अबोल अश्या ह्या डोळ्यांतले ते, भाव समजोनी जावे । हे असे कुणीतरी यावे..... मौन धरिले तिनेच जरका, मी अस्वस्थ असावे । अश्या क्षणिमग बोलुनी काही, मौन तिने सोडावे । हे असे कुणीतरी यावे..... बोल लाविले तिला कुणी तर, घाव मलाच मिळावे । घाव लागता अंगी माझ्या, आईग...

शब्दांचे खेळ...

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
किती सोपं असत नाई शब्दांचे असे हे खेळ करणं, भावनांच्या गुंत्यात गुंतवून ह्या शब्दांना वाक्यांमध्ये पाडणं । पडताना मात्र वाक्यांमध्ये हे शब्द काहिना-काही अर्थ घेऊन पडतात, थोडीशी जागा चुकली तर मात्र हेच... अर्थाचा अनर्थ करून टाकतात । पण चुकल्या वाक्यांतील ते शब्द देखील काहिना-काही सांगत असतात, चुकीचीच का असेनात..

कविता.....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 14/03/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
कविता कराव्या लागत नाहीत, त्या नकळतच होत असतात । मनातल्या भावनांना जसे, शब्दांचे आधार मिळत असतात । जुळवायचीच म्हणून, वाक्यांतील यमके जुळवायची नसतात । वरच्या ओळींची खालच्या ओळींशी, ओढून ताणून नाती जोडायची नसतात । सरळ सोप्या शब्दात भावना मनातल्या, कवीतेतून ह्या मांडायच्या असतात । शब्द असतात भावनांसाठी कवीतेत, भावना शब्दां साठी नसतात । हर्षद प्रभुदेसाई.....(डोंबिवली)

आता मागणे एकची

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 14/03/2011 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मागणे एकची, ठेव ताठ उभा सूखी खोल रुतवले पाय, जरी माती रुखी सुखी अंगाखांद्यावर खेळे, पिलावळ चिमण्यांची धरी पानांचा पखवाज, धून अंगाई गीताची राघू पोपटी, मी तृप्त, बाकदार लाल चोची श्वास रोखूनी साहतो, पक्व फ़ळावर टोची कधी ढगही धरती, वेड्या कंजुषीचा हट्ट तहानला व्याकूळ मी, बंद खजिने ते घट्ट ओल्या वाऱ्यातून बाहू, शोषी अपुऱ्या जलाते दवबिंदू चार घेऊन, रस भरतो फ़ळाते येता मागणी कुठूनी, दांडे कुऱ्हाडींचे काळ भुंडे करूनीया अंगा, कुणी पेटविती जाळ आता मागणे एकची, राहो अंतरंगी श्वास जरी तोडले बाहुंना, वाढो कबंधी विश्वास जरी तोडले बाहुंना, वाढो कबंधी विश्वास

फुकट ते पौष्टिक?

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 14/03/2011 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
"सर, यू हॅव बीन सिलेक्‍टेड फॉर ए फ्री गिफ्ट व्हावचर...' लाडिक आवाजातल्या एका "तरुणाचा' दोन दिवसांपूर्वी फोन आला होता. सहसा अशा फोनना काय उत्तर द्यायचं, त्याला आता मी सरावलोय. पण इथे जरा माझ्या इंटरेस्टचा विषय होता. चकटफु पर्यटनाचा. "क्‍लब महिंद्रा'कडून हा फोन होता. त्यासाठी आम्हा दोघांना जोडीनं त्यांच्या हापिसात गिफ्ट व्हावचरचा आहेर साकारण्यासाठी जायचं होतं. रविवारचा दिवस ठरला. दुपारी साडेबाराला बोलावलं होतं, बाणेर रोडवर दुपारच्या उन्हात बोंबलत तो पत्ता शोधेपर्यंत एक वाजला. एक तासाचं प्रेझेंटेशन ऐकावं लागणार, ते कुठल्या तरी मेंबरशिपची गळ घालणार, कशात तरी अडकवण्यासाठी भुलवणार, सगळं ठाऊक होतं.

दु:ख

लेखक पद्मश्री चित्रे यांनी रविवार, 13/03/2011 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
दु:ख माझे देखणे , द्रिष्ट त्या लावू नका एकटा आहे सुखी मी, सोबती होवू नका.. चांदण्यांचा हा पसारा ,चन्द्र तरीही एकटा शल्य घेवूनी फिरे तो, तेजावरी जावू नका.. पापण्यांच्या आड पाणी, सागराला लाजवी हासरा चेहरा बघूनी, गोडवे गावू नका... साद मिटते अन्तरी, शब्द सारे पोरके वेदनेची आग उरली, ती तरी मागू नका.. घाव आहे जीवघेणा , तरी ही जिव्हारी राखतो बेगडी या सान्त्वनाची ,आस मज दावू नका... वाळवंटासारखा -निष्पर्ण मी, निष्प्राण मी मॄगजळाची ओढ माझ्या , अंतरी उजळू नका...
काव्यरस

विचित्र मन......

लेखक किरन वनारे यांनी रविवार, 13/03/2011 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
मन हे असे का विचित्र विचारात गुन्तते, दिवसा ढ्वळा पड्ल्या शुन्य स्वप्नात रमते, ए़़कान्त एकान्त शोधत नुसते स्वतातच रमते, रस्तातल्या गर्दित सुध्दा स्वतालाच शोधते, मन मन करतो पण बरे कुठे हे असते, शरिरातला कुठ्ला कोपरा धरुन हे बसते, काहितरि नुसते नविन सविन शोधत फिरते, जे नाहि अस्तित्वात चुकुन त्यालाच का शोधते, समजावले कितिदा आरे....
काव्यरस

किसने बचाया मेरी आत्मा को - आलोक धन्वा

लेखक शुचि यांनी रविवार, 13/03/2011 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
या जगात नानाविध भव्यदिव्य अनुभव आहेत. कर्तुत्व गाजविण्याच्या संधी आहेत. महत्त्वाकांक्षा, वक्तृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती, वैराग्य आदि डोळ्यांचे पारणे फेडणारे गुण आहेत. अनेक प्रकारची व्यक्तीमत्वे या ना त्या कारणाने सतत आपल्या सहवासात येत असतात. यातील अनेक जण ज्ञानाने, धनाने, सामर्थ्याने आपल्यापेक्षा थोर असतात. आपल्याला असूया, दबदबादेखील वाटू शकतो. पण थोडा अंतर्मुख होऊन विचार केला तर आपल्या लक्षात येते की - आपल्या जीवनात वरील भव्य गोष्टी या अळवावरच्या पाण्यासारख्या येतात आणि जातात.