कविता कराव्या लागत नाहीत,
त्या नकळतच होत असतात ।
मनातल्या भावनांना जसे,
शब्दांचे आधार मिळत असतात ।
जुळवायचीच म्हणून,
वाक्यांतील यमके जुळवायची नसतात ।
वरच्या ओळींची खालच्या ओळींशी,
ओढून ताणून नाती जोडायची नसतात ।
सरळ सोप्या शब्दात भावना मनातल्या,
कवीतेतून ह्या मांडायच्या असतात ।
शब्द असतात भावनांसाठी कवीतेत,
भावना शब्दां साठी नसतात ।
हर्षद प्रभुदेसाई.....(डोंबिवली)
वाचने
1881
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>कविता कराव्या लागत
किती दिवसांनी लिहीलंत हर्षद
=)) =)) हाण तेज्यायल्या,
In reply to किती दिवसांनी लिहीलंत हर्षद by टारझन
तुम्ही काही या लोकांकडे लक्ष
डोंबिवलीत सुनामी आली की काय??
नगरी टु नन्दादिप , वाचताना
कोनी काहिहि म्हनो, आपल्याला