Skip to main content

अबोला

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 11/03/2011 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिटींग संपता संपत नव्हती. ऑफिसमधून घरी पोहोचायला सुधाला कमीत कमी एक तास उशीर होणार होता. जास्त उशीर झाला तर सुहास पुन्हा अबोला धरणार. सुधाने पुन्हा एकदा हातातल्या घडाळ्यावर नजर टाकली. "ह्या मिटींग्ज वेळेत घ्यायला काय होतं ह्या अय्यरला ! ऑफिस सुटायच्या वेळेला बरोब्बर मिटींग घ्यायला सुचतं याला. शिवाय मिटींगचा उपयोग काही नाही." "सुधा, सुधा! " सुधाने चमकून अय्यरकडे पाहिलं. "मी तुम्हाला डिस्टर्ब नाहि ना केलं?" अय्यर तिच्याकडे पाहून कुत्सितपणे हसून म्हणाला. "अं! नाही सर. माझं लक्ष आहे सर." सुधा मनातला सगळा राग चेहर्‍यावर दिसू न देता चेहर्‍यावर खोटं स्मित आणून म्हणाली.

ब्लेड रनर – चित्रपटात रंगसंगतीचा प्रभावी वापर

लेखक चिंतातुर जंतू यांनी शुक्रवार, 11/03/2011 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी इंद्रराज पवार यांनी चित्रपटातल्या रंगसंगतीविषयी दोन लेख लिहिले होते. (पहा: ‘चित्रपटातील "तानापिहिनिपाजा"’ आणि ‘अनेक भावनांचे प्रतीक : लाल रंग’) ते वाचताना अमेरिकन चित्रपटांमध्ये खूप प्रभावी पद्धतीनं रंगांचा वापर केला आहे असे चित्रपट आठवण्याचा प्रयत्न केला असता पटकन आठवलेला एक चित्रपट म्हणजे ब्लेड रनर.

उपाय सुचवाल ?

लेखक उगा काहितरीच यांनी शुक्रवार, 11/03/2011 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
मी सरकारी निवासस्थानात राहतो. (क्वॉर्टर) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक बोका पाळला आहे. तो बोका कधिच बांधलेला नसतो. रात्री तो माझ्या गाडीच्या (Honda cb twister) कव्हर मध्ये जाउन झोपतो. त्यामुळे गाडीच्या सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहिच उपयोग नाही. त्या बोक्याला मारायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब) यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?

कृतघ्न!

लेखक स्वैर परी यांनी शुक्रवार, 11/03/2011 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका ईंग्रजी कवितेचा अनुवाद इथे सादर करीत आहे! शालु हिरवा पांघरलेला अन निळा तिचा पदर असे भोर नयन तिचे ते निळेशार पाहुनी अमुचा जीव वसे महान अशी ती राणी उभी कशी दिमाखात वंदन करती वाकुनी सारे जोडुनी दोन्ही हात क्षण ते हर्षाचे टिकले नाही काळ फार ग्रुहित धरिले आम्ही तिला प्रत्येक वार शालु भरला चिखलाने पुरता यथासांग पदर तिचा तो फाडला घडले कसे हे पांग दयनीय अवस्था ही तिची दुर्लक्षीली आम्ही कृतुघ्न बाळांना जरी अजुन ती लावी पान्ही सुर्य आणि चंद्र तिला घेत बाहु पाशात ओढी "पर्वा नाही तुझी कुणा अन कुणा नाही गोडी" काय तिने मागितले प्रेम तिचे का खोटे? अवखळ अल्लड प्रेम अपेक्षिले, घडले काय मोठे?
काव्यरस

डॉक्टर

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 11/03/2011 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
"सोडव रे आता या दुखण्यातुन.." म्हणणार्‍या रुग्णांना डॉक्टर दिलासा देत होता आणि 'बरं वाटेल हं लवकर ' असा धीर देत उपचार करत होता त्याला पाहून मला "तो" आठवला. फरक असलाच तर एवढाच ... तो व्यथित झालेल्यांचा आधार बनत होता आणि थकलेल्या मनांना 'तो आहे, सगळे ठीक होईल..' अशी जगण्याची उभारी देत होता

ब्रेकिंग न्यूज : जपानमध्ये सुनामीचा तडाखा

लेखक सागर यांनी शुक्रवार, 11/03/2011 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
सीएनएन वाहीनीचा दुवा बीबीसी वाहीनीचा दुवा ८.८ रिश्टर स्केल चा भुकंप झाला आणि या सुनामीने हाहाकार सुरु केला.

अंडे का फंडा .......

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 11/03/2011 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
अंडे का फंडा ....... अंडे का फंडा ....... साहित्य :- उकडलेली अंडी ४-५ , कढीपत्ता ,जीर ,मोहरी,हिंग , २ टोमाटो बारीक चिरलेले , मीठ चवीनुसार ,लाल तिखट दीड स्पून ,गरम मसाला १ स्पून. वाटण :- सुक्या खोबर्याचा कीस १ वाटी,तळलेला कांदा १ वाटी,(कांदा चिरून थोड तेल घालून हलका सोनेरी भाजावा ), कोथिंबीर ,खसखस (सोनेरी भाजून घ्यावी ) २ चमचे ,लसून ८-९ पाकळी ,आल १/२ इंच बस .......... वरील सर्व साहित्य मिक्सी मध्ये पाणी घालून बारीक वाटून घ्यावे फोडणी :- कढइत ३ चमचे त

महाराष्ट्र राज्यातील gazetteer's ची माहिती असलेला दुवा

लेखक सुकामेवा यांनी शुक्रवार, 11/03/2011 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या दुव्यावर महाराष्ट्र राज्यातील gazetteer's ची माहिती आहे. तसेच महाराष्ट्र : भुमि व लोक, इतिहास प्राचीन काळ (खंड-1), स्थापत्य व कला (खंड-1,भाग-2),औषधी वनस्पती व महाराष्ट्रातील वनस्पतीशास्त्र आणि वनसंपदा या संबंधी सुद्धा माहिती उपलब्ध आहे.