असे कुणीतरी यावे,
जिच्यात आपण हरवूनी जावे ।
शोधिता अपुल्यास अपुल्यात अपुल्याला,
तिचेच दर्शन व्हावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
ओठांतले ते शब्द तिने मग,
अलगद झेलुनी घ्यावे ।
अबोल अश्या ह्या डोळ्यांतले ते,
भाव समजोनी जावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
मौन धरिले तिनेच जरका,
मी अस्वस्थ असावे ।
अश्या क्षणिमग बोलुनी काही,
मौन तिने सोडावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
बोल लाविले तिला कुणी तर,
घाव मलाच मिळावे ।
घाव लागता अंगी माझ्या,
आईग... असे तिने म्हणावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
वाद जाहले अमूच्यात तरी मग,
मीच मला रोखावे ।
माझी असो वा तिची चूक ति,
मीच " सॉरी " म्हणावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
हरलो जरी मी भांडणात तिच्याशी,
तिने हसत जिंकावे ।
हसू पाहता तिचे असे ते,
मी नेहमीच हरावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
हे असेच कुणीतरी आले तर मग,
स्वप्न कशास म्हणावे ।
स्वप्न उतरिले सत्यातच जरका,
सत्य ते फसवे नसावे......।
हे असे कुणीतरी यावे.....
हर्षद अ प्रभुदेसाई.....
वाचने
3034
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
किती हो बोल्ड लिहीता तुम्ही ?
मला कळल नही...
In reply to किती हो बोल्ड लिहीता तुम्ही ? by टारझन
डोंबिवलीत सुनामी आली की काय??
काव्यविभागातून कलादालनात
सहमत आहे.
In reply to काव्यविभागातून कलादालनात by विजुभाऊ
अगागा
In reply to काव्यविभागातून कलादालनात by विजुभाऊ
सदर ले़ख हा माननीय
In reply to काव्यविभागातून कलादालनात by विजुभाऊ
सगळ
In reply to काव्यविभागातून कलादालनात by विजुभाऊ
कविता चांगलि आहे. प्रेमळ
बाकी माहित नाही, पण..