Skip to main content

मालक मला एखादा डूआयडी द्याना!

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 11/05/2026 19:26 या दिवशी प्रकाशित केले.

मालक मला एखादा डूआयडी द्याना!
डू आय डी घेईन 
जिलेब्या पाडीन 
भक्ताना चोपीन 
चाप चाप चाप!

मालक मला एखादी डूआयडी द्याना!
डू आयडी घेईन
खरडफळा गाजवीन 
वादविवाद करीन 
ठप ठप ठप

मालक मला एखादा डुआयडी द्याना,
डू आयडी घेईन,
चिखलफेक करीन
दोन चार आयडी उडवीन 
धप धप धप!

मालक मला एखादा डू आयडी द्याना
डू आयडी घेईन 
मूळ आयडी ठेवीन 
पुन्हा पुन्हा येईन 
ख्या ख्या ख्या!

ग्रेसची आई

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 11/05/2026 06:54 या दिवशी प्रकाशित केले.

 

 

 

आज तारीख दहा मे.आज जागतिक मातृदिन.

मातृदेवो भव:,

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी...

देव सर्वत्र,सदासर्वकाळ पोहचू शकत  नाही  म्हणून  त्याने आई बनवली आहे.

साने गुरूजींचे "शामची आई ",पुस्तक व त्यावर आधारित झालेला चित्रपट. 

लहानपणी ऐकलेली आई आणी मुलाची गोष्ट. सारांश....

एक बोजड दिवस

लेखक निओ यांनी शनिवार, 09/05/2026 21:29 या दिवशी प्रकाशित केले.

एखादा दिवस कसा ढकलत ढकलत काढावा लागतो, गाडी पंक्चर

हंपीचा ध्यास -हंपी इतिहास

लेखक Bhakti यांनी शनिवार, 09/05/2026 12:47 या दिवशी प्रकाशित केले.

हंपी नावाचा एक मराठी सिनेमा आहे. ठीकठाक आहे, पण तेव्हापासून हंपीचा ध्यास लागला होता.

हंपीला जाण्याआधी मी मिपावर जयंत कुलकर्णी यांची "विजयनगर साम्राज्याची मालिका" नीट वाचून काढली. युट्युबवर शेकडो व्हिडिओ पाहिले. प्रत्यक्ष हंपी फिरताना "सफर हंपी - बदामीची आणि गदग परिसराची" हे आशुतोष बापट यांचे पुस्तक सतत सोबत होते. एक-दोन ठिकाणी गाईड घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तेही केले.

तमिळनाडूचा मुख्यमंत्री कोण

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 08/05/2026 17:03 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या तामिळनाडूमध्ये नेहमीचे डी एम के आणि ए आय ए डी एम के हे दोन पक्ष आळीपाळीने पूर्वी सत्तेत होते ते आता तमिळ मतदारांनी कडेला बसवले आहेत. त्यांनी अभिनेता असणारा आणि आता राजकारणी बनलेला विजय चंद्रशेखर जोसेफ याच्या तमिळग वेट्री कळगम या पक्षाला तब्बल 108 जागा देऊन सर्वाधिक संख्येचा पक्ष बनवले आहे. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करायचे असेल तर किमान 118 जागा ताब्यात असणे आवश्यक आहे. म्हणजे विजेच्या पक्षाला जर सत्ता स्थापन करायचे असेल विजय जोसेफ ला जर मुख्यमंत्री व्हायचे असेल तर अजून दहा जागांची गरज आहे. डी एम के किंवा ए आय ए डी एम के हे दोघे मिळून जरी एकत्र आले तरी देखील 118 जागा होत नाहीत.