Skip to main content

मोदी सुतोवाच

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 11/05/2026 14:42 या दिवशी प्रकाशित केले.

घ्या कविता 

(faster than instant coffee 🫖☕ )
 
 
सराफ सोने चोर |
दर आठवड्याला 
उघडतोय दालन कोरं ||
 
मोदी यांचे आवाहन |
सोने नको,प्रवास नको,
कमी चालवा वाहन ||
 
सामान्य चालवतोय बाईक |
त्यालाच बसणार फटका 
पेट्रोल दर हाईक ||
 
मंत्र्यांचा वाहन ताफा |
बचत तोंडाच्या वाफा ||
 
करू नका परदेश प्रवास |
इथे सामान्यांना होतोय 
कामावर जातांना त्रास ||
 
काटकसर ठीक आहे |
पण दात कोरून 
पोट भरणार नाही ||
 
संपलाय चुनाव मोका |
आता मोदींना दिसतोय 
मोठा मंदी धोका ||
 
तरी नको खरेदी नवी|
नको हॉटेलिंग म्हणतोय कवी ||
 
मोदींचे सुतोवाक्य |
म्हणजे 'कुछ बडा होनेवाला है' 
हे नक्की शक्य ||
 
चाचपडा सेविंग पुंजी |
आता बचत हीच कुंजी ||
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 180
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया