Skip to main content

आठवणींच्या चारोळ्या

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 17/06/2011 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
१. मनाच्या गाभा-यातून घोंघावतेय आठवणींचे वादळ थरथरणा-या पापण्यांतून ओघळतायत आनंदाश्रू नितळ
२. एकदा त्याच किनार्‍यावर एक स्वैर लाट भेटली त्या लाटेवर झालेली स्वार एक आठवण घेऊन आदळली
३. गंधुली अंगणातील रातराणीची सांजवेळीच मोहरून पसरली छोटुली कळी तुझ्या आठवणीची अवेळीच बहरून उमलली
४. तुझ्या आठवणींशी हृदयाची पहिल्या प्रहरी झडली चकमक जिंकता जिंकता हरलो मी राहिली अनंत वेदनेची तगमग

वेडे मन

लेखक प्रिया ब यांनी शुक्रवार, 17/06/2011 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
का नकळत एखाद्यात इतकं गुंतत जातो? त्या एका कटाक्षासाठी इतकं झुरत राह्तो? तो मात्र धुंद असतो त्याच्याच विश्वात तुम्हाला टिचभर जागा नसते त्याच्या जीवनात का हे अशक्य स्वप्न उराशी मी बाळगले? खरया परिस्थितीला सामोर जाण अवघड वाटू लागले हरवलेल्या मनाची मीच समजूत काढत राहिले.. कंठ दाटून आला आणि डोळे पाणावले!!!

किसान अधिकार दिवसाची सुट्टी द्या.

लेखक कापूसकोन्ड्या यांनी शुक्रवार, 17/06/2011 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.rediff.com/news/report/growing-voices-in-cong-to-make-rahul-… माननीय दिग्विजय सिन्ग यांनी मनापासून केलेले गौरवोद्गार पहा. सध्या राहूलजीना वेळ नाही. ते स्विसमध्ये सुट्टी घेत आहे. मध्यंतरी उत्तर प्रदेश मध्ये शेतकरी यांची काळजी वाहताना खूप दमछाक झाली. सर्वात महत्वाचे म्हनजे त्यांनी बाबा आणि अण्णासारखी नौटकी केली नाही. येणारा १९ जून हा राहूलजींचा वाढ्दिवस आहे. तो आपण सर्वांनी मनापासून साजरा करूया.

रव्याचे लाडू.

लेखक ज्योति प्रकाश यांनी गुरुवार, 16/06/2011 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-दोन पेले लाडू रवा(नेहमीच्या रव्यापेक्शा बारिक असतो). एक पेला कणिक्.(गव्हाचे पीठ) साजूक तूप. पिठिसाखर वेलची पूड. कृती:- प्रथम कणिक कोरडीच भाजून घ्यावी.व बाजूला काढून ठेवावी.एका कढईत तूप घेऊन त्यात रवा चांगला भाजून घ्यावा.त्यातच नंतर भाजलेली कणिक मिसळावी.व आच बंद करावी व मिश्रण थंड करण्यास ठेवावे. नंतर त्यात वेलची पूड व पिठिसाखर मिसळावी.व लाडू वळावे.मिश्रण कोरडे वाटल्यास जरूर तेव्हढे तूप मिसळावे.

ज्येष्ठ नागरिक अत्याचार : जागृती, कायदा, मदत व उपाय

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 16/06/2011 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
सत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ.

तुमच्यात्-आमच्यात

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 16/06/2011 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
"हजारो वर्षापुर्वी आपण झुंडीत राहात होतो. काही झुंडीत सशक्तांनी अशक्तांना आधार देणे काटेकोरपणे सांभाळले जायचे.
काव्यरस

आडनावाचे फायदे किती व तोटे किती

लेखक रणजित चितळे यांनी गुरुवार, 16/06/2011 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
जगभर सगळीकडे आपण पहातो की नावा बरोबर आडनावे असतात. युरोपात सुमारे ५००० हजार वर्षापुर्वी आडनावे उपयोगात हळू हळू यायला लागली. भारतात कधी व का उपयोगात आली ते कळायला मार्ग नाही. वेदकाळानंतर गोत्र उत्पन्न झाली. पुढे वंशज व कुळ हे आडनावा सारखे उपयोगात आले. रामाला बहूतेक आडनाव नव्हते. कृष्णाला यादव कुळातला म्हणून संबोधले जाते. वर्णाश्रम व जातीवार रचने मुळे आपल्या कडे आडनावांना महत्व आले. 'अरे पण आडनाव काय त्याचे' मुलाने वर्गातल्या मुलाचे नाव आपल्याला सांगितले की सहजच हा प्रश्न विचारला जातो. ह्या संबंधात काथ्याकूट करण्यासाठी खालील मुद्दे देत आहे. त्या बरोबर माझी मते ही देत आहे. १.