काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती
काव्यरस
रानातली वाट.. एक न संपणारा परिघ -२
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...
भरारल रान सारं, गंधाळली माती
गच्च ओल शिवार.. फुललेली कांती
हिरव्या पात्यावर,. मोत्यांची नक्षी
पांढर्याफटुक ढगांची रेशमी दुलई
काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती
बांधावर उभी कोवळी रानजाई
नटलेल्या सृष्टीवर आभाळाची प्रीती
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...
भरारल रान सारं, गंधाळली माती ||
झिम्माड गर्द रानात.. टिफण चालती
सर्जा-राजाच्या पायामधी भिंगरी फिरती
औंदाच्या पावसात बांधणार चारभिंती
घराच्या छप्पराला स्वप्न टांगली कौलांची
------------- शब्दमेघ ( १६ जुन २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ)
१. आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
३. टिपुर आशेचं दाणं
वाचने
4035
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
..................पण अजुन काहीतरी हवय !
शीर्षक वाचून गविंची खव आठवली.
गणेशा -खूप छान कविता. आवडली.अगदी मनापासून.
कविता वाचून मन भरून गेले. खूप शुभेच्छा !!
खूप छान
फारच छान झाली आहे कविता.
मस्त कविता आहे....
पहिली दोन कडवी कोराईगडावर फिरताना तयार केली असावीस असं वाटतं. :)
In reply to मस्त कविता आहे.... पहिली दोन by किसन शिंदे
+१ असेच म्हणतो.
सुरुवातीला वाचताना झटकन कोरीगडच डोळ्यांसमोर येउन गेला.
सुरेख कविता रे.
वा! पावसाचा परिणाम फार झालेला दिसतोय कवी लोकांवर!
In reply to वा! पावसाचा परिणाम फार झालेला by नगरीनिरंजन
अहो ननि, पावसाचा परिणाम प्रत्येक संवेदनशील माणसावर होतच असतो, कविला व्यक्त करता येतो, इतकेच!! :)
In reply to अहो by मिसळलेला काव्यप्रेमी
हो. अगदी बरोबर!
पांढर्याफटुक ढगांची रेशमी दुलई काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती बांधावर उभी कोवळी रानजाई नटलेल्या सृष्टीवर आभाळाची प्रीतीक्या बात! क्या बात!! जियो!! वाचनखुण साठवलेली आहे!! :)
सुंदर..!
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनापासुन आभार
सुरेख कविता
छान, सुरेख