अनंत
सध्या सगळीकडे वातावरण वाताअनंतमय झालय. अनंताची झाडे फुलांनी तारकांनी भरलेल्या आकाशासारखी झाली आहेत. हे माझ्याघरचे अनंत. संध्याका़ळी ऑफिसमधुन घरी गेले की ह्या फुलांना आधी पहायला जाते. त्याचा सुगंध अनुभवते. एखादे फुल घरात आणून ठेवते तो सुगंध कायम राहण्यासाठी. दुसर्यादिवशी काही फुले काढून ऑफिसमध्ये नेते. कुणी मैत्रीण येईल तिला देते. हा नित्यक्रम गेले आठवडाभर चालू आहे. काही मैत्रीणींनी बजावलेच आहे की आल्या आल्या आधी एक फुल मला द्यायचे.
मिसळपाव
हि डाळ बनवायला अगदी सोप्पी अन टेस्टला एकदम झक्कास असते .