Skip to main content

दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/09/2011 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा
ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक (बॅकग्राउंड हातोडीनं ठोकल्याचा आवाज) ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक माझा दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा लाकूड तासून, रंधा मारून काढतो भुस्सा ||धृ|| कामं त्याचं हाय सुताराचं आणतो लाकूडं सागाचं करवतीनं कापत बसतो रातीबी तसंच करतो काय करावं समजना झालं कामासाठी नुसता झालाय वेडापीसा लाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||१|| एकदा पलंग करायला लागला मोजमाप करीत तो बसला मी घरकामात गुंतलेली मला बोलावलं त्यांनं तरीबी जवळ ओढूनं चावट बोलला असातसा ला

भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्थ कारणीभुत आहेत काय?

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/09/2011 04:45 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्थ कारणीभुत आहेत काय? भारतीय उपखंडात निरनिराळ्या आजारपणांचे प्रमाण वाढते आहे. त्यात मधुमेह, हॄदयरोग, स्थुलपणा आदी गृहीत धरा. वेगवेगळ्या संस्था याबाबत वेळोवेळी आकडेवारी प्रसूत करत असतात. जरी ती आकडेवारी आहे तितकी खरी मानली नाही तरीही वरील आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहेच. हे आजारपण वाढण्यामागे अनेक कारणे असतीलही - जसे बदलती जीवनशैली, आर्थीक स्थिती उंचावणे, अन्नघटकाचे पोषणमुल्ये, सुपोषण आदी.

पाव्हण्यानं डोळा मारला

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/09/2011 04:08 या दिवशी प्रकाशित केले.
पाव्हण्यानं डोळा मारला
ह्या पाव्हण्यानं डोळा मारला ग मला जवळ ये आसं म्हनला ग बाजारात बसले मी ग भाजी विकायला समोर आला अन लागला भाव पुसायला हातात घेवून पाही खालीवर जुडी मेथीची दे आसं म्हनला ग मला जवळ ये आसं म्हनला ग आजूबाजूला जमली गर्दी मला ग त्याची नव्हती वर्दी शुक शुक करतोय, हात हालवतोय समोर उभा तो राह्यला ग मला जवळ ये आसं म्हनला ग नजर माझी गिर्‍हाईकांवर नव्हती काही त्याच्यावर हात घालूनी खिशातमधी नोटा त्यानं काढल्या ग मला जवळ ये आसं म्हनला ग वागणं त्याचं वंगाळ नव्हतं समजलं मला काय खरं ते व्हतं चष्मा न
काव्यरस

भूत कसे बनते? - सर्वपित्री पेश्शल!

लेखक प्रियाली यांनी रविवार, 25/09/2011 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
सौ.अ.जि. पैसाताई यांना खालील लेख पुष्पगुच्छ देऊन समर्पित. सदर पुष्पगुच्छावर विक्रेत्याचा लोगो असेलच पण तरीही एक विशेष श्टीकर लावून तो पुष्पगुच्छ कोणत्या विक्रेत्याकडून खरेदी केला आहे ते कळवले आहे. पैसाताईंना हा लेख समर्पित करण्याचे कारण काही चाणाक्ष वाचकांनी जाणले असेलच पण ज्यांनी ते जाणले नसेल त्यांच्यासाठी पुढील खुलासा: पितृपक्ष सुना सुना गेला अशी खरड लिहून त्यांनी मला मसणातून उठवले. अर्थातच, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. या पार्श्वभूमीवर आमचे एक जालमित्र मध्यंतरी मला म्हणाले होते. “अगं हडळी, कधीतरी माणसांत ये.” तो अपमान आणि शल्य अद्याप माझ्या हृदयात सलते आहे.

बंगाली तरुणी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 25/09/2011 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
सौंदर्य हा कुठल्या जातिचा..धर्माचा वा प्रांताचा मक्ता नाहि असे जरी असले तरी सुंदर व रेखिव सौंदर्य या मधे बंगाली तरुणींचा भरणा सर्वात जास्त आहे असेच पुर्वि पासुनच आढळुन येते.... चित्रपट.. माध्यमे.. पत्रकारीता..मॉडेलिंग या मधे बहुसंख्य तरुणी बंगाली आढळतात.. सिनेमा व सिरियल हे क्ष्रेत्र तर अनेक बंगाली सौंदर्य वतिनी गाजवले आहेच..सुचित्रा सेन..अपर्णा सेन..

कामवाली

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 24/09/2011 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हा कदाचित, भारतात राहण्यार्‍या भारतीय (आयटी वाईफ्/वर्किंग वाईफ/रिच नॉन वर्किंग वाइफ) गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय असेल. आजकाल चांगली कामवाली मिळणे कठीण गोष्ट आहे असे ऐकिवात आहे. ;) गोष्ट तशी जुनी आहे. मी बेंगलोरात नवखाच गेलो होतो तेव्हाची. ऑफिस शहराबाहेर असल्याने जवळपास रहाणे क्रमप्राप्त होते, पगारही कमीच होता. लोटेगोल्लाहली नावाच्या खेड्यासम एरीआ मधे १ बीएचके जागेत रुमपार्टनर हवा आहे म्हणून अ‍ॅड लागली होती हापिसात. भाडं कमी होतं, पंजाबी रुम पार्टनर म्हणजे खाण्या आणि "पिण्याची' आबाळं होणार नाहीत अशी अपेक्षा करुन चांगभलं म्हंटलं. शनिवारी संध्याकाळी रहायला गेलो.

'त्या'ची भेट

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 24/09/2011 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचा प्रसंगः (हा भाग बर्‍याच दिवसांपूर्वी टाकला होता, म्हणून जसाच्यातसा टंकवत आहे.)
तो मला अचानकच भेटला. साधारण वर्षभरापूर्वीची घटना असेल. खरतर तारीख मा़झ्या लक्षात रहायला हवी होती. कारण त्याची भेट हि मला बर्‍यापैकी बदलून टाकणारी घटना होती. थंडीचे दिवस होते. ऑफिस च्या कामाने वैतागलो होतो. फारच लोड आला होता. त्यातून सततच्या टूरिंगमुळे जरा होमसिक ही झालो होतो. अश्याच एका सोमवारी ऑफिसच्या कामासाठी सकाळी लवकर निघायच होत. रविवारी संध्याकाळी जाम कंटाळा...नव्हे सगळ्याचा अगदी उबग आला होता. रात्री डोळ्याला डोळा काहीलागेना. Mid-life Crisis आयुष्यात फारच लवकर व्हायला लागला होता बहुतेक.

अशी कशी ही म्हागाई

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 24/09/2011 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
अशी कशी ही म्हागाई
अशी कशी ही म्हागाई वाढ वाढ वाढली माझ्या खर्चाची झोळी हिनं फाडली ||धृ|| नका डाळ तुम्ही म्हणू; नका तांदूळ तुम्ही म्हणू गहू जोंधळं झालं आहे सोनं जणू; पाहून बाजरीचे भाव मी पिशवी खुंटीला टांगली ||१|| दह्या दुधाचे भाव कसे वाढता वाढं; शेरभर ताकालाबी धा रूपये लागं पोरं झालीत वाळून बारीक रोड; पामतेल डालातुपाविना देवू कशी भाजीला फोडणी? ||२|| राकेल गॅस प्रेटोल डिझल; याबीगर चाक कसं चालंल? ऐश्टी गाडीबी पैशाविना हालंना; पेशल रिक्षा कशी करावी?

ड्रंकन उर्फ बीयर बम चिकन

लेखक गणपा यांनी शनिवार, 24/09/2011 06:04 या दिवशी प्रकाशित केले.
कस काय मंडळी? सर्व काही क्षेम कुशल आहे ना ? बाप्पा त्यांच्या गावी परतले. आणि आता काही दिवसातच दुर्गा माता आपल्या भक्तांच्या भेटीस येतेय. मग ९-१० दिवस काही उसंत मिळायची नाही तुम्हाला. तेव्हा म्हटल एक विकांत मिळतोय मध्ये तर तो सत्कारणी लावावा. फार काही कटकटीची पाककृती नाही आज. चला तर मग लागा कामाला.