Skip to main content

जशास तसे

लेखक शुचि यांनी गुरुवार, 22/09/2011 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्याशी कोणी उर्मटासारखे वागले, तरी तुम्ही त्या व्यक्तीशी चांगुलपणाने वागता की तुम्ही त्या व्यक्तीला "ईंट का जवाब पत्थर से" देता? उदा - तुमची बायको एखाद्या किरकोळ कारणावरून तुमच्याशी अतोनात भांडली, खूपच आक्रस्ताळेपणाने वागली तर भांडण झाल्यानंतर तिला खूष करण्यासाठी तुम्ही तिला गुलाबाचा गुच्छ पाठविता का? का तुमच्या कृतीमधून तिची चूक जाणवून देता? जर तुम्ही तिला गुलाबाचा गुच्छ पाठवत असाल तर मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून ते चूकीचे आहे. कारण तुमच्या कृतीमधून तुमच्या दुबळेपणाचा, चूकीचा संदेश तिच्याकडे जातो आहे.

पत्तेबाज..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 22/09/2011 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर पत्ते खेळला नसेल असा एखादाच माणुस असेल..लहान पणी उन्हाळ्याची सुटी लागल्यावर पत्यांचा डाव कायम पडायचा. पण पत्त्यांचा नाद असणे हि काहि वेळा फार काळजीची बाब हि ठरु शकते. कष्टकरी ..कामगार..मध्यम वा उच्चभ्रु सा~या वर्गात रमी व ३ पत्ति खेळ लोकप्रिय आहे...व ब~याच वेळा हा खेळ नुसता वा पैसे लावुन खेळला जातो. पत्ते खेळणा~यांचे ग्रुप असतात.. मी ज्या वेळी डेक्कन ने पुणे मुंबई करीत असे त्या वेळी असाच एक ग्रुप होता..गाडी सुरु खाली कि ते व्ही.टी येईपर्यंत रमी खेळत असत..

मिसळपाववरील कवितांची रसग्रहणं # माझं हे सारं सामान गं सखू...

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 22/09/2011 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
घासू गुरुजींनी सुरु केलेल्या कविता रसग्रहणाच्या उपक्रमाने प्रभावीत होवून आपणही तिथे एखाद फुल सोडाव असं बरेच दिवस वाटत होत, पण योग्य फुल गवसत नव्हत, इतक्यात मिपाचे ताज्या दमाचे, नव्या रक्ताचे तरुण ताठर कवी श्री धनाजीराव वाकडे यांची माझं हे सारं सामान गं सखू... ही कविता वाचनात आली आणी योग्य फुलं गवसल्याचा आनंद झाला. खरतर ही कविता इतकी रसरशीत आहे, की मधमाशीच्या मकरंद गोळा करण्याच्या कौशल्याऐवजी लहान व्रात्य मुलाच्या बर्फगोल्यातून रस ओढायच्या कौशल्याचीच येथे गरज पडावी..
काव्यरस

अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेला आणि बेला,वैशालीने गायलेला नवीन अल्बम प्रकाशित

लेखक योगेश पितळे यांनी गुरुवार, 22/09/2011 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेला पहिले वहिले प्रेम हा अल्बम नुकताच प्रकाशित झाला आहे.बेला शेंडे आणि वैशाली सामंत या आजच्या आघाडीच्या गायिकांसह नील नाडकर्णी या अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या तरूण गायकाने या अल्बमद्वारे मराठी संगीतक्षेत्रात आपलं पदार्पण केलय! या अल्बममध्ये वेगवेगळ्या प्रकारची ८ गीते आहेत असून प्रवीण दवणे, मिलींद जोशी आणि मनोज यादव यांनी ती लिहिली आहेत.

३२ रुपये आहेत मग तुम्ही गरीब नाही

लेखक शाहिर यांनी गुरुवार, 22/09/2011 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या खिशात ३२ रुपये असतील तर तुम्ही गरीब नाहीत, असा आपल्या सरकारचा म्हणाना आहे . आयोगाच्या मते, देशातील शहरात राहणारी व्यक्ती ३२ रुपयांत तर ग्रामीण भागातील व्यक्ती २६ रुपयांत सहज एका दिवसाची गुजराण करू शकतो. पूर्ण हिशोब केला असता शहरात राहणार्‍या एका माणसाला एका महिन्याच्या खर्चासाठी ९६५ रुपये पुरेसे आहेत. ग्रामीण भागात असाल, तर खर्च ७८१ रुपये इतका होऊ शकतो.

लावणी: लग्नाचं वय माझं झालं

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/09/2011 03:42 या दिवशी प्रकाशित केले.
लावणी: लग्नाचं वय माझं झालं
नक्षीदार कुयरी पदरावरची......... हळद कुंकवानं भरलेली सोळा सिनगाराचा साज लेवूनी... ऐन्यापुढे उभी मी राहीली पुढ्यात तुमच्या जवळ आले माळून मी मरवा लग्नाचं वय माझं झालं; आता तारीख ती ठरवा ||धृ|| मुसमुसलेली ज्वानी माझी कळीदार ती काया हाताला हात लावा अन पारखून घ्या तिला राया अंग माझं सोन्यावानी तिस हजारी की हो झालं! चांदीवानी चमचम करूनी उजळून ते आलं तुमच्या मिठीत घ्या या रुप्याच्या रुपाला लग्नाचं वय माझं झालं; आता तारीख ती ठरवा ||१|| पावसाळ्यामदी मोरलांडोरी
काव्यरस

मोराची चिंचोली

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 22/09/2011 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
a अखेर आम्ही खरोखरच निघालो! अनेक बेत अनेकदा ठरतात आणि विरतात. तर आम्ही मोराच्या चिंचोलीला निघालो. नेहेमीप्रमाणे निघायला उशीर झालाच. त्यात भर म्हणजे खंडाळा घाटात ऐन बोगद्याच्या तोंडावर रेडीएटर मधुन भसाभस वाफ निघु लागली आणि आमची मिनीबस बघता बघता वाफेने भरली. तेवढाच फुकटात वाफेचे स्नान घेण्याचा विचार होता, पण पाणी भरेपर्यंत सर्वांनी खाली उतरायचे ठरले. पाणी आणायला तशी १०-१५ मिनिटे लागणारच होती. उतरून समोर पाहतो तर डोंगरमाथा धुक्यात शिरला होता.

पुनर्जन्म आणि कर्मविपाक

लेखक शरद यांनी बुधवार, 21/09/2011 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
पुनर्जन्म आणि कर्मविपाक श्री. रमताराम यांनी लिहलेला लेख मनोरंजक होता. नावच "रमताराम" असल्याने त्यांनी "फिरस्त्या"सारखी "धर्म. समाज, जीवनमान, मौजमजा,.. विरंगुळा " इत्यादि विभागातून आपला लेख फिरवला. मजा आली. पण एक राहिलेच. "माहिती". पुनर्जन्म (व विशेषत: कर्मविपाक ) या विषयी पूर्वासूरींनी काय विचार मांडले आहेत याची माहिती सर्वांना असतेच असे नाही. मग "एक चांगले कृत्य दुसर्‍या वाईट कृत्याच्या परिणामाला नाहिसे करते का ? " असे प्रश्न मनात उद्भवतात.( मागे या संबंधी लेख आला होता का हे मला माहीत नाही. असल्यास कृपया त्याचा संदर्भ द्यावा.) ही "माहिती" आहे, माझे मत नाही.

शेझवान पोटॅटो विथ व्हेज हक्का नुडल्स

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 21/09/2011 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य शेझवान पोटॅटो: अर्धवट उकडलेले छोटे बटाटे अर्धे कापून घेणे (तुम्ही बटाट्याच्या जाडसर फोडी ही करु शकता) १ कांदा उभा चिरलेला २ टेस्पून बारीक चिरलेला लसूण (चायनीज पाकृत भरपूर लसूण व आले लागते, आपल्या आवडीप्रामाणे कमी-जास्त करणे) १ टेस्पून बारीक चिरलेले आले ५-६ लाल मिरच्या वाटून पेस्ट (मिरच्या गरम पाण्यात ३-४ तास भिजवणे व त्यातल्या बिया काढून मिक्सरवर पाणी न घालता वाटून घेणे) ३ टेस्पून कॉनफ्लोअर १ टीस्पून काळीमिरीपूड मीठ चवीनुसार १ टीस्पून साखर १ कप व्हेज स्टॉक (पाणी ही वापरू शकता) १ टेस्पून सोया सॉ