Skip to main content

मासे ३४) टोळ

लेखक जागु यांनी शुक्रवार, 23/09/2011 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
टोळ हा मासा समुद्रात मिळणारा हा दिसायला लांबलचक व सुंदर चकचकीत असतो. ह्याच्या शेपटीला टिकलीसारखा काळा ठिपका असतो. ह्याचे डोके म्हणायची की चोच असाच प्रश्न पडतो मला ती लांब लचक असते.

दृष्ट कशी काढावी?

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शुक्रवार, 23/09/2011 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
दृष्ट कशी काढावी? लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही कधी कधी दृष्ट काढली जाते, बाहेरची बाधा झाली असेल, कुणाची नजर लागली असेल तर असा प्रकार करतात. ( म्हणजे नेमके काय? ) संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलट्सुलट ओवाळतात. ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही काही ठिकाणी ( आमच्या घरी ) वापरतात. सनातनवाल्यांच्या पुस्तकात नारळाने द्रूष्ट काढावी असे दिले आहे असे वाटते. दृष्ट काढल्यानंतर ते पदार्थ तीन रस्ते एकत्र येतात तिथे तिठ्यावर नेऊन टाकायचे असतात. नारळ असल्यास तिथे आपटून फोडायचा असतो. तिथे जाताना कुणाशी रस्त्यात बोलायचे नसते. दृष्ट नेमकी कशी काढावी?

मोबाईल फंडे आणं मोठं मोठे गंडे

लेखक VINODBANKHELE यांनी शुक्रवार, 23/09/2011 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल आजच्या युगातला अल्लाउद्दिनाचा दिवाच जणू , अगदी लहान मुला पासून वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे असे नव्या युगाचे आयुध , अडी अडचणीला , वेळ प्रसंगाला नव्हे तर अगदी सदा सर्वदा हातात , खिशात पर्स मध्ये असणारा मानवाचा ट्रेड मार्कच जणू . अगदी शेतकरी राजा सुद्धा मोबाईल द्वारे आपल्या विहिरी वरची मोटार चालू आणि बंद सुद्धा करायला लागला , भिकारी एका गल्लीतून दुसर्या गल्लीतील भिकार्याची हाल हवाल विचारायला लागला ,बळी राजाला अगदी देश परदेशातला शेतमालाचा भाव ह्या मोबाईल च्या कृपेने आपल्

"पेरेण्टस का इन-लॉज"

लेखक मी ऋचा यांनी शुक्रवार, 23/09/2011 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
कंपनीत आत्ता अर्ध्या तासापूर्वी एक चांगली बातमी मिळाली. आत्तापर्यन्त आम्हाला ग्रूप मेडिक्लेम पॉलिसी मधे फक्त जोडीदार आणि मुले यांचाच अंतर्भाव करता यायचा मात्र त्यात आता पालकांचाही समावेश करता येईल. ही बातमी ऐकल्या ऐकल्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे "पेरेण्टस का इन-लॉज". माझे आई-वडिल आणि सासरे (सासूबाई नाहियेत) तिघेही स्वावलंबी आहेत. दोन्ही "पालक संचांना" समाविष्ट करता येणार नाहीए त्यामुळे आता मला या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत ना॑हिए. म्हणून मी आपल्या सूज्ञ मिपाकरांना मदत मागावी असा विचार केला. आता तुम्ही सांगा मी कुणाला समाविष्ट करावे?

समारोप - गुरूपदेश

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 23/09/2011 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो तुमच्या भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसादातून बरेच काही शिकायला मिळाले. पण एक खुलासा आवश्यक आहे. माझ्या गुरूला मी अंतर्बाह्य ठाऊक असल्याने माझे भले कशात आहे ते त्यांना चांगले ठाऊक होते. त्यांनी दिलेला सल्ला पूर्णपणे वैयक्तिक होता. तो माझ्याकरता म्हणजे विशिष्ट व्यक्तीकरता होता. मला माझा विकास साधायचा असेल तर मी ज्या वातावरणात असायला हवे तेथे मी नव्हतो, एव्हढेच त्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे आयायटियन्स बुद्धीमान की आयायटी बाहेरचे बुद्धीमान हा मुद्दा गैरलागू आहे. ज्योतिषाशी लावलेला संबंध तर अत्यंत हास्यास्पद आहे.

)माझं सामान हे...(

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 23/09/2011 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
शैलेंद्र यांनी रसग्रहणाची परंपरा पुढे चालवत धनाजीराव वाकडे यांच्या 'माझं हे सारं सामान गं सखू...' या कवितेवर लेख लिहिला. ती कविता व तो लेख या दोन्हीवर एकंदरीतच धमाल, हहपुवा वगैरे प्रतिसाद पाहून थोडी निराशा झाली. शैलेंद्र यांनीदेखील ही कविता काहीशी गमतीदार असल्याप्रमाणे तिचा अर्थ लावलेला आहे. माझं नेहेमीच असं मत पडलेलं आहे की लेखकाच्या रचनेचा अभ्यास हा त्याच्या इतर रचनांच्या संदर्भात घेतला पाहिज.
काव्यरस

राधा गौळण

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 23/09/2011 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
राधा गौळण
आळवणी करते कृष्णाची; राधा गौळण मी मथूरेची ||धृ|| दुध दही करण्यासाठी; बाजारी मथुरेच्या नेण्यासाठी पहाटेच उठूनी धारा काढीते गायींची ||१|| गोपींकांना सवेत घेवूनी; यमूना तिरावर रास खेळूनी वाट पाहते नंदलालच्या मुरलीची ||२|| मायेच्या पाशात न शिरण्या; मोहांपासूनी विलोभी होण्या आस लागली तुझ्या न माझ्या मिलनाची ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०९/२०११

निदान नमस्कार तर कराल?

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 23/09/2011 04:44 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी कामावर निघण्याच्या गडबडीत नित्यकर्मे उरकत असतांना पत्नीच्या आई म्हणाल्या, "आज अविधवा नवमी आहे, निघतांना आईच्या फोटोला नमस्कार करून जा, आणि येतांना दुध-केळी आणायला विसरू नकोस." गेली ३० वर्षे पत्नीच्या आईना मीही 'आई'च म्हणतो. त्याही त्यांच्या मुली इतकंच माझ्यावर प्रेम करतात, क्वचित कधी हक्काने रागावतातही. लग्नानंतर माझ्या आईला विचारलं होतं, "मी त्यांना आई म्हणालो तर तुला चालेल का गं?", तर म्हणाली "अरे बाबा, दोन आया मिळणं याला नशीब लागतं, त्या किती प्रेम करतात ते पाहिलंय मी, मला वाईट तर नाहीच, उलट आनंदच वाटेल. फक्त तूच लक्षात ठेव, आई म्हणशील तर तसा मानही ठेव!" मी जमेल तितकं ते पाळतो.

रंगपंचमीच्या सनाला

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 23/09/2011 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
रंगपंचमीच्या सनाला
This Lavani is dedicated to parag p divekar as yesterday he demanded "Lavani Mahotasav" here.
नका भिजवू शालू वेल बुट्टेदार नऊवारी रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||धृ|| नेम तुमचा कधी का चुकतो! अंगाला बाई असा झोंबतो पाण्याचा तो मारा; नका करू मजवरी रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||१|| रंग हवेत* कितीक उडवीले *(हवे ते) फुगे फोडीले हिरवे पिवळे रंगात येवूनी का गुलाल फेकीला अंगावरी? रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||२|| लाज मला हो आली भारी सर्व सख्यांनी मस्करी केली
काव्यरस