Skip to main content

दोन लेकांमधील अंतर

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 10/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील शहरी मध्यमवर्गीय सध्या आम्ही दोन, आमचे एक ह्या मोडवर आहेत. परंतु, कुटुंब नियोजनाच्या सुरुवातीच्या काळात "हम दो हमारे दो" किंवा "पहला जल्दी नही, दुसरा अभी नही, तीसरा कभी नही" अशा जाहिराती प्रसिद्ध होत. दोन मुलांमध्ये किती अंतर ठेवावे ह्याची चर्चा करणारा एक रोचक लेख नुकताच वाचनात आला. आदिमानवदेखिल आपल्या अपत्यांत ३-४ वर्षांचे अंतर ठेवी, हे कळून आश्चर्य वाटले. दोन अपत्यांत ईर्षा वाढू नये असे वाटत असल्यास, हे अंतर एकतर एक वर्षापेक्षा कमी अथवा चार वर्षांचे वर ठेवावे, असे मानसशास्त्र सांगते. अर्थात, ही वैयक्तीक बाब असल्यामुळे प्रत्येक जोडप्याने सर्व साकल्याने विचार करून स्वतः पुरता निर्णय घ्यावा, हेच खरे!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5391
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

In reply to by विसोबा खेचर

या बाबतीत काहीच अनुभव नाही.. (अविवाहीत) तात्या. अविवाहीत शब्द अप्रस्तुत वाटला ;)

माझं मत असं आहे की, दोन लेकात अंतर ठेवण्याची गरज नाही. एखाद्या माणसाने एकाच वर्षी दोन मुली एक उलगा जन्माला घालायचा ठरवला तर ते जोडपे आणि देव मिळुन ठरवतील काय, कुठे, कसे ते. त्यासाठी जोडप्याल कशाला अट पाहिजे. उद्या लोक म्हणतील एका जोडप्याने कमीत कमी दोन वर्षाच्या अंतराने लेक जन्माला घातले पाहिजेत. कोणी म्हणेल एका जोडप्याला एकच लेक असले पाहिजे. तेव्हा जन्माला घालण्यावर 'बंधन नको' या विचारांशी प्रामाणिक....! सुनील साहेब, कशाला लेकाच्या अंतरा-बिंतराच्या भानगडीत पडत आहात. पाडगावकरांची "कविता" घ्या रसग्रहणाला.

In reply to by मृत्युन्जय

अंतराची अट नको याच्याशी असहमत आहे. वाढती लोकसंख्या पाहता अंतराची अट असली पाहिजे. :) बाकी, चालू द्या......! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा. डॉ., ही कोणती "अंतरा".......................??? आणि तिच्या काय अटी आहेत, ते एकदा सांगून टाका................. हा. का. ना. का. ....................................... :wink:

In reply to by तिमा

तिरशिंगराव, अनेक ठिकाणी घरोबा......................... स्त्री चा असेल तर एका महिन्यात अनेक मुले कशी काय जन्माला घालता येतील ब्वॉ??????????? ................... :wink: ह्.घ्या.

पण ह्या पेक्षा "दोन बायकांमध्ये किती अंतर असावे"? असा धागा एखाद्या दादल्याला जास्त कामाला यील. ;-) किंवा आमच्या अण्णांसाठी :- "दोन उपोषांमध्ये किती अंतर असावं" किंवा अक्षयकुमारसाठी :- "दोन फाल्तु पिक्चरमध्ये किती अंतर असावं" किंवा आफ्रिदीसाठी:- "दोन रीटायरमेंट मध्ये किती अंतर असावं" (हा प्राणी दरवर्षी नव्यानं रिटायर होतो म्हणे) सार्वजनिक हापिसातल्या कुबट लिफ्टसाठी:- "दोन अस्वच्छ आणि घाण मारणार्‍या लोकांमध्ये किती अंतर असावं" --मनोबा

In reply to by मन१

बच्चनच्या अभि ला माहीत असेल "दोन फाल्तु पिक्चरमध्ये किती अंतर असावं" बाकीही काही विचारा

दोन अपत्यांत ईर्षा वाढू नये असे वाटत असल्यास, हे अंतर एकतर एक वर्षापेक्षा कमी अथवा चार वर्षांचे वर ठेवावे, असे मानसशास्त्र सांगते. असं काय नाही. ईर्ष्या ही वयावर अवलंबून नसते. वपुंची पार्ट्नर कादंबरी वाचा, म्हणजे कळेल

तसा महत्वाचा प्रश्न आहे...पहिले मुल झाल्यानंतर ३,४ वर्षांत निर्णय घ्यायला पाहिजे पण असे होते कि दुसर्या अपत्याचा विचार करताना दोन्ही पालक नोकरी करणारे असेल तर उशीर होतो ...७ वर्ष किंवा त्यापुढे पण हे अन्तर जाते...आमच्या बिल्डींग मध्ये तर मोठा मुलगा ११ वर्षाचा आहे त्यांना आत्ता दुसरा मुलगा झाला ..म्हणजे पहिला ११ वी ला जाईल तेव्हा दुसरा पहिली ला ..! कधी कधी हे वयात अंतर जास्त राहील म्हणून " हम दो हमारा एक" म्हणणारे पण हल्ली बरेच जण दिसतात.

पटदीशी दोन लेखांमधील अंतर वाचले गेले.... बाकी चालूद्या... पोरं परमेश्वराची देन असत्यात... आपन कशापाय त्यात ढवळाढ्वळ मारायची असंच काहीबाही वाटतयं.

त्यांच्या कुठल्यातरी गोष्टीत असा प्रसंग आहे की कुणी मोठा नेता शाळेत पाव्हणा म्हणून आलेला असतो. तो त्यावेळेस कुटुंब नियोजनाचे प्रस्थ असल्यामुळे शाळेच्या पोरांना कुटुंब नियोजनाचे धडे देऊ लागतो. मास्तर डुलक्या घेत असतात. मधेच त्यांना दचकून जाग येते तेव्हा पुढारी म्हणत असतो "दोन पोरात अंतर ठेवा" आणि मास्तर धडपडून उठतात आणि आरडाओरडा करुन पोरांना दूर दूर बसायचा हुकूम करतात. मग हेडमास्तर त्याला गप करुन नक्की काय ते समजावतात.

नंतर नंतर म्हणता म्हणता आपोआप पडते ते अंतर