Skip to main content

रगडा पॅटिस पाणीपुरीवर फरसाणही दिसले -

लेखक विदेश
शनिवार, 20/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले-) रगडा पॅटिस पाणीपुरीवर फरसाणही दिसले मनीं हे ' फस्त करू ' म्हटले .. |धृ| जाय उभी ही गाडी करुनी पुढ्यात, भैया पाहे वळुनी - हॉटेलवाले शांत बिचारे गल्ल्यावर सुकले .. |१| पाणी भयंकर सुटता तोंडी खमंग बनते शेव पापडी रिक्षामधले प्रणयपाखरू खुषीत का हसले .. |२| तुमची ' माया ' - माझी किमया कृतार्थ झालो , म्हणतो भैया , भेळकचोरीसाठी गिऱ्हाईक खोळंबुन बसले .. |३|
लेखनविषय:

वाचने 2091
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

रगडा पॅटीसचे नाव एकुन तोंडाला पाणी सुटले.

पाणीपुरी नसे ती असे शिवांबूपुरी खाऊ नकाच उगीच ती येई ओकारी गल्लीच्छपणातले किटाणू शरीरी शिरले ||४||