लेखकसस्नेहयांनी मंगळवार, 21/02/2012 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : २ वाट्या शे॑गदाणे
अर्धी वाटी तीळ
अर्धी वाटी किसलेले खोबरे
२ वाट्या किसलेला गूळ
२ चमचे तूप
वेलचीपूड २ चिमटी
शे॑गदाणे व तीळ वेगवेगळे भाजून कूट करून घ्यावे. मग इतर सर्व साहित्य एकत्र करुन चा॑गले कुस्करावे. २-२ डाव खलबत्त्यात कुटून घ्यावे. चा॑गला मुद्दा (आमच्या कोल्हापुरी भाषेत ) झाला पाहिजे इतपत. मग ताटाला तुप लावून वडया थापाव्या. ६ तासान्॑तर कापाव्या.
लेखकपाषाणभेदयांनी मंगळवार, 21/02/2012 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
बरं झालं आत्ताच रिक्षा रिझर्वला लागली ते. नायतर आतमध्ये पॅसेंजर बसलेले असतांना रिक्शा रिझर्वला लागली म्हणजे पॅसेंजर नको ते उगाच बोलतात. इतर ठिकाणी टाईमपास करत तासभर थांबतील पण रिक्षा रिझर्वला आली की पेटोलकॉक रिझर्वकरेपर्यंत देखील थांबायची त्यांची तयारी नसते. आता रात्रीचे दहा वाजत आले आहेत. पटकन जवळचा कांतीशेटचा पेट्रोलपंप बंद व्हायच्या आता पेट्रोल भरून घेतलं पाहीजे. नाहीतर उगाच लांब हायवेला जावून पेट्रोल भरावे लागेल. अन टाइमाची खोटी होइल ते अलग. रात्री अकराची लोकल सापडली पाहीजे. त्यात बरेच पॅसेंजर मिळतात लांब लांब जाणारे.
आज सुपरवायझर राणे उगाचच तणतणत होता. म्हणे जॉब कमी निघाले. हॅ.
लेखकरामकुमारयांनी मंगळवार, 21/02/2012 02:41 या दिवशी प्रकाशित केले.
' सच्या दिलाचा राजा '
हातावर बसलेली माशी जशी पटकन आपण उडवावी तशीच माझ्या अंगावरील पांघरुणे मी उडवली कारण आज होता; निवडणुकीचा निकाल या धावपळीत दिवस गेला. मावळत्या दिशेला पाहिलं तर दिवस कासराभर राहिला होता. पाहता - पाहता अजगराने जसा बेडूक गिळावा तसा अंधाराने दिवस गीळाला. मी माझ्या वाड्यात आलो तर सर्व वाडा चीडीचाप स्मशान शांतता. एरवी असणाऱ्या दिवसात आणि आजच्या असणाऱ्या दिवसात जमीन आसमानाचा फरक होता हे पाहुन मला काही वेळ करंट बसल्यासारखे झ|ले असा का ?
लेखकअत्रुप्त आत्मायांनी मंगळवार, 21/02/2012 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज मनात आलं,मी तर तात्विक अर्थानं काही धार्मिक उरलेलो नाही.त्यामुळे आज मी काही कुठे स्वतःसाठी शिवरात्री निमित्तानं स्वतः शंकराची पूजा उपासना वगैरे करायला बसणार नाही.पण असं असलं तरी व्यावहारिक अर्थानं अश्या दिवशी काही चांगलं करावं,असं वाटण्या इथपर्यंत मी धार्मिक आहेच...मग काय करायचं..?
झटकन लक्षात आलं,की आपण जर का शिवरात्र या दिवसाचा एक चांगला अनुषंग मनात ठेवत आहोत.तर नरहर कुरुंदकरांच्या शिवरात्र या पुस्तकाची आपल्याला जमेल तशी ओळख का करवुन देऊ नये...? अलिकडेच सागर यांनी कुरुंदकरांचं एक पुस्तक वाचकां समोर ठेवलच आहे. तसाच माझाही हा एक अल्पमती प्रयत्न....
लेखकajay wankhedeयांनी सोमवार, 20/02/2012 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
तारुण्य....
नव तारुण्य नव दांम्पत्य
सोबतीला दोन गुबगुबीत अपत्य
कामाच्या धकाधकित वेळ
जातो कसा कळतच नाही
सांय समयी थकुन येता
लगेच चहा नि बिस्किट
खोल्या लहान गर्दी महान
सखे तरि राहतेस प्र शांत
रात्र प्रहरी धुंद प्रणय
जिवाणु विषाणुंचा कहर
सारं काही पचवतेस
सुख हि नि दु:ख
तुझा एंटी वायरस खरंच
भारदस्त.....
अपडेट होतो आपोआपच
सकाळ ची लगबग.....
डबा नास्ता मुलांची घाई
सारं सारं आवरतेस झ्टपट
वारध्क्य.....
आता मी सेवा निवॄत्त
नि तु पण रजोनिवॄत्त
दंतकांति गमावलेले ओठ
रोजच बघतात वाट...
लेखकशैलेन्द्रयांनी सोमवार, 20/02/2012 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी अचानक एखादा छंद आपला ताबा घेतो. वेळात वेळ काढुन, कधी महत्वाच्या कामांनाही टांग मारुन आपण त्या दुनीयेत हरवायला बघतो. जे आपण करायला बघतो ते कितपत जमतय, याबाबत उत्सुकता तर असतेच.
अशीच काही मी काढलेली छायाचित्र, आपल्या सुचनांसाठी आणी माझ्या सुधारणांसाठी...
सुरवात आक्षीच्या किणार्यावरचे काही वेडर्स..
सॅन्ड प्लोव्हर्स.. कळपाने फिरणारे, कळपाने उडणारे...
लेखकsagarpdyयांनी सोमवार, 20/02/2012 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गराज राजगड आणि स्वराज्याचे तोरण - तोरणा किल्ला यांच्या मधोमध, सह्याद्रीच्या कुशीत लपलेला प्रचंड सुळका - लिंगाणा. हा किल्ला शिवरायांनी १६४८ मध्ये चंद्रराव मोरेना पराभूत केल्यानंतर बांधला. सुळक्याचा आकार हा शिवालीन्गाशी बरेच साधर्म्य दाखवत असल्याने त्याचे नाव लिंगाणा असे पडले. या किल्ल्याचा मुख्य वापर हा तुरुंग म्हणून होई. मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात आलेल्या कैद्यांना शिड्यांच्या मदतीने सुळक्यावर चढवण्यात येई आणि शिड्या काढून घेत. सुळका योग्य उपकरणे (किमान एक दोरी) असल्याशिवाय उतरणे शक्य नाही.