Skip to main content

दुरवरल्या गावाकडची आठवण

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 22/02/2012 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
दुरवरल्या गावाकडची आठवण उदास संध्याकाळी असल्या; त्या उजाड डोंगररांगा पाहून दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून शेणगोठा कचरा काढून झाडून साफ केले घर ते आईची ती घांदल गडबड मजला येथूनी दिसते कपीला चांदी गाय गरीब चारा खात असते मायेचा स्पर्श होताच दुधामध्ये प्रेम उतरते त्याच वेळचे ते निरसे दुध मी टाकतसे पिवून दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून धाब्याचे घर पाटाईचे; त्यात झोका बांधलेला लहान भाऊ त्या झोळीत असे झोपलेला आठवतो तो परवचा झोका देता देता म्हटलेला आठवतो तो अभ्यास अजूनही घोकंपट्टी केलेला जीव वेडा रमतो; जरी तेथे नाही

हेरवाडची भानामती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शरणागती - प्रकरण 4

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 22/02/2012 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
हेरवाडची भानामती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शरणागती
विज्ञाऩ आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण 4
14 ऑगस्ट 1993 च्या बेळगाव दै. तरुण भारतमधे बेडकीहाळ गावात भानामतीमुळे बालिकेच्या अंगावरील कपडे गायब – अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान या मथळ्याची एक बातमी प्रसिद्ध झाली.

भाजे लेणीतील गूढ शिल्प

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 21/02/2012 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाजे लेणी. आंबेनळी, वाघजाई प्राचीन घाटवाटांच्या माथ्यावर मळवलीनजीक वसलेला महाराष्ट्रातील एक अतिप्राचीन लेणीसमूह. ह्या पूर्वीच्या लेखात भाजे लेणीचा परिचय करून दिलाच आहे. त्यात ओझरता उल्लेख केलेल्या सूर्यगुंफेतील गूढ शिल्पाचा सविस्तर परिचय करून देण्याचा आता प्रयत्न करत आहे. सूर्यगुंफा ही भाजे लेणीतील क्र.२० ची लेणी. जवळजवळ शेवटी असलेली. ओसरी, ओसरीवर असलेले खांब आणि आतमध्ये प्रशस्त विहार अशी याची रचना. ओसरीतच डाव्या बाजूच्या असलेल्या कक्षाच्या दोन्हीही बाजूंना हे शिल्पपट कोरलेले आहेत. भारतीय शिल्पकलेतील हे एक सर्वाधिक चर्चेत असलेले शिल्प. १.

...." सगुणा धायगुडे "....

लेखक जेनी... यांनी मंगळवार, 21/02/2012 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
क्र्र्रर्र्र्र दाराचा आवाज करत हळूच दाराच्या आडून एक चेहेरा " आत येवू का बाई ?" असा आवाज देवून गेला . मान वर न करताच मी " हम्म " उत्तर केल . रोजच्या सवयीप्रमाणेच सारं . ती स्त्री हळूहळू चालत खुर्ची शेजारी येवून उभी राहिली . मग मात्र माझी नजर सरळ तिच्या चेहेर्यावर गेली. पस्तिशीतली एक कळकट्ट चेहेर्याची ,लांब सडक केस असणारी ..अगदी उंचपुरी . शरीराने काहीशी मलूल , अशक्त , पण शांत चेहेर्याची एक विधवा माझ्यासमोर येवून उभी राहिली . हल्कस स्मित करून मी तिला खुर्चीवर बसायला सांगितल तशी ती साडीचा पदर हाताने पुढे घेत सावरून बसली .

जात नाही ती जात : कोर्टाचा अजब निर्णय

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 21/02/2012 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11970726.cms ह्या बातमीनुसार एका माणसाने कोर्टाला अशी विनंती केली होती की माझा धर्म माझी जात का ढून टाका आणि मला फक्त एक भारतीय म्हणायचा हक्क द्या. पण कोर्टाने ते नाकारले. मला तरी हा न्याय अजब व अतर्क्य वाटतो. एखाद्या माणसाला धर्महीन व जातीहीन असण्याचा हक्क असलाच पाहिजे. वारसा हक्क वगैरे करता धर्म वा जात आवश्यक आहे असे म्हणणे मूर्खपणाचे वाटते. निधर्मी वारसाहक्काचे कायदे बनू शकत नाहीत का?

हद्दपार झालेली चिमणी

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 21/02/2012 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
परवा माझ्या ३ वर्षाच्या भाचीला सियाला गोष्ट सांगत होते 'एक होती चिमणी अन एक होता कावळा..' सिया म्हणाली 'आत्या मला चिमणी दाखव ना कशी असते ?' पाहिलं तर खरच कि एकाही झाडावर चिमणी दिसेना. आमच्या लहानपणी चिमण्या अन कावळे भरपूर असत झाडांवरून. त्यांची भांडणे पाहणे हा मस्त टाइम पास असायचा. बागेत पाणी सोडले असताना त्या फवाऱ्यात चिवचिव करत अंघोळ करण्याऱ्या चिमण्या पहायला खूप मजा येई. त्यांचे थवे या झाडावरून त्या झाडावर भुर्रकन उडताना माना वळवून वळवून दुखेपर्यंत पाहत राहायचो. मुठभर तांदूळ टाकले कि सगळा थवा भुर्रकन खाली येताना पाहण्यासाठी आईआजीच्या पाठी लागून सारखे तांदूळ आणत असू.

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया

लेखक जागु यांनी मंगळवार, 21/02/2012 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
भले मोठे ऐटीत मिरवणारे बकुळीचे झाड आणि त्याला लागणारी नाजूकशी फुले म्हणजे जणूकाही एक एक नक्षीदार कुडीच.