आज सकाळीच माझा एक म्युच्युअल फंडाचा ग्राहक ऑफिसमध्ये भेटयला आला होता, तुम्ही ती आंब्याची गोष्ट मागे सांगीतलीत म्हणून मी म्युच्युअल फंडात एसआपी सुरू केली व ती अजून चालू आहे व आता मला तिचा चांगलाच फायदा झाला आहे, धन्यवाद. मग मला ती मी त्याला सांगीतलेली गोष्ट आठवली. ७/८ वर्षापुर्वी तो ग्राहक माझ्याकडे गुंतवणूकीचा सल्ला मागायला आला होता, तेव्हा त्याने विचारले कि मला म्युच्युअल फंडात थोडी गुंतवणूक करावयाची आहे कसे काय करु ते सांगा तेव्हा मी त्याला प्रथमत: म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचे सगळे फायदे व तोटे सांगीतले व जर तुला यात गुंतवणूक करावयाची असेल तर मी तुला एक माझ्याबाबतीत घडलेली गोष्ट सांगतो. माझे बाबा, आम्ही त्याना भाऊ म्हणत असू, त्यानी घरापासून सुमारे 2/3 फर्लांग अंतरावर ४०/५० आंब्याची झाडे सुमारे २५/३० वर्षापुर्वी लावली होती व त्या बागेत पाण्याची सोय न्हवती म्हणून भाऊ रोज संध्याकाळी एक कावड करायचे व दोन्ही बाजूला एकावर एक दोन घागरी पाण्याच्या विहरीवरून भरुन नेत असत व त्या झाडाना पाणी घालत असत, जवळपास ८/१० वर्ष त्याचा हा नित्यक्रम असायचा. एकदा मी असाच त्यांच्याबरोबर आंब्याच्या झाडाना पाणी घालायला गेलो होतो. मी त्याना विचारले कि भाऊ ह्या झाडांवर आंबे कधी धरतील तेव्हा ते म्हणाले किमान ८/१० वर्षानी धरायला लागतील, पण भरपूर आंबे मिळायला अजून किमान १५/२० वर्षे लागतील. आज खरंच त्या झाडाना भरपूर आंबे लागता आहेत पण भाऊनी लावलेल्या झाडांवर फळ लागण्यापुर्वीच त्यानी या जगाचा निरोप त्यांच्या वयाच्या ५४ व्या वर्षीच घेतला. मी व माझी सारीच भावंड लहानपणीच शिक्षणासाठी शहरात निघून गेलो होतो. आज आम्हाला दरवर्षी भरपूर आंबे खायलासुध्दा मिळतात व बागेतून चांगले पैसेसुध्दा दरवर्षी मिळतात. जर तेव्हा भाऊनी झाडे लावलीच नसती तर आम्ही काय लावायला तेथे गेलोही नसतो व आज हक्काने स्वत:ची फळेसुध्दा मिळाली नसती. तो ग्राहक म्हणाला खरं आहे तेव्हा मी तुमचे ऐकले व दरमहा फक्त रु.२००० गुंतवायला सुरुवात केली होती व नंतर दरवर्षी जस जसा माझा पगार वाढत गेला तसतशी म्युच्युअल फंडातील मासिक गुंतवणूक वाढवत गेलो आज मी दरमहा रु.२०००० गुंतवत आहे, आणि बाजारात एवढे चढ उतार झाले तरी माझ्या गुंतवणूकीचे मुल्य ५३ लाख रुपये झाले आहे तेव्हा आता मी काय करु, मी सांगीतले आजपर्यंत तू ग्रोथ पर्यायात गुंतवणूक करत होतास आता यापुढे तू गुंतवणूक रिटायर होईपर्यंत चालूच ठेव मात्र आता तू तुझा पर्याय बदल व नियमीत लाभांश मिळण्याचा पर्याय घे म्हणजे तुला तूच लावलेल्या झाडाची फळे दरवर्षी मिळत रहातील, मिळणा-या पैशातून तुला हवे ते कर वाटल्यास भरपूर फिर, अथवा तुला हवी ती गोष्ट विकत घे. हिच रक्कम वाढत जाऊन तुझ्या निवृत्तीनंतरच्या गरजा सुध्दा भागवणार आहे. हा संवाद सुरु होता तेव्हा माझा २६ वर्षाचा मुलगा हजर होता, रोज कानी कपाळी ओरडूनही नोकरी लागल्यापासून म्युच्युअल फंडात द.म. फक्त ५५०० ची एसआयपी करत होता, त्याने लगेच ती ४५०० ने वाढवली, आणि म्हणाला बाबा पुढच्यावर्षी पगार वाढला कि आणखीन वाढवीन, मला ५० व्या वर्षापुर्वी नोकरी सोडता येइल काय? मी म्हटले जर दरवर्षी तुझी एसआयपीची रक्कम पगाराप्रमाणे वाढवत नेलीस तर निश्र्चितच होता येईल मात्र म्युच्युअल फंडात नियमीत गुंतवणूक करत रहा, बाजाराच्या चढ उताराने विचलीत होऊ नकोस. आज बाजार कसाही असला तरी भविष्यात ह्याच गोष्टीची पुनरावृत्ती होणार आहे कारण हा माझा स्वत:चा अनुभव आहे. नेहमी दरवर्षी आंब्याच्या झाडाल जसे आंबे एकसारख्या प्रमाणात मिळतील असे सांगता येत नाही तसेच आज, उद्या किंवा येत्या नजीकच्या काळात बाजारात काय होईल हे सांगणे कठीण आहे मात्र दिर्घ काळात शेअर बाजारातून चांगले उत्पन्न मिळणारच कारण गेले २०० वर्ष हेच होत आले आहे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
2434
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
आंब्याच्या झाडांची गोष्ट
बरोबर आहे. It should be
In reply to आंब्याच्या झाडांची गोष्ट by पैसा
एस आय पी
Keep it continue for long
In reply to एस आय पी by सर्वसाक्षी
माफ करा पण ....
Check performance and good
In reply to माफ करा पण .... by मन१
+ १मन१ गुंतवा फक्त स्वतात,
In reply to माफ करा पण .... by मन१