Skip to main content

आम्ही आणि स्वाईन फ्लु

लेखक चाफा यांनी गुरुवार, 12/04/2012 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख फार पुर्वी म्हणजे जेंव्हा स्वाईन फ्ल्यु ने भारतभर हाहाकार माजवला होता तेंव्हा लिहीलेला आहे पण आता पुन्हा एकदा पुण्यात स्वाईनफ्ल्यु चे दुष्टचक्र सुरु झाल्याचं कळल्यावर इथे टाकतोय ********** " येतो गं अशु...." बाहेर पाडण्यापूर्वी मी सौ. ला हाक मारली. " अरे, पण मास्क घातलायस का?" सौ. ने आठवण करून दिली. हो ! आजकाल कुठे बाहेर पडायचं झालं तर डोक्यात हेल्मेट घातलेय की नाही यापेक्षा तिची मी मास्क घातलाय की नाही यावर जास्त नजर असते. कारण सगळ्यांनाच माहिताय. आजकाल जगभर धुडगूस घालणारा ‘स्वाईन फ्लू’. या रोगाने माझ्या जीवनशैलीत मरणाचा फरक करून ठेवलाय.

शेवग्याच्या शेंगांची भाजी ---

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 11/04/2012 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - चार-पाच कोवळ्या शेवगा शेंगा, एक चमचा तेल, फोडणी साहित्य, एक चमचा शेंगदाणे कूट, मिठ चवीनुसार, गोडामसाला एक छोटा चमचा, अर्धा चमचा साखर. कॄती -- शेंगाचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या, पाच ते सात मिनिटे उकडत ठेवा,त्यावेळी त्यात मिठ घाला. चवदार होतात. शक्यतो लोखंडी कढई किंवा तव्यात फ़ोडणी करा त्यातच गोडा मसाला घाला, आता शेंगातील पाणी काढून टाका, त्या शेंगा फ़ोडणीत टाका, त्यावर मिठ व साखर घालून चांगल्य़ा परतून घ्या, व आता त्यात शेंगदाणे कूट घालून परत चांगले परतून घ्याजास्त कोरडे वाटल्यास आपण शेंगा उकडत ठेवल्या होत्या त्यातील थोडे पाणी घाला.ते पटकन आटून जाईल. ( मी काय केले आधी भाकरी केल्या व त्

भळ्ळकन ..

लेखक गवि यांनी बुधवार, 11/04/2012 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
रीअर व्यू मिरर मधून भळ्ळकन प्रकाश डोळ्यात घुसला.. कोणाचा तरी हॅलोजनवाला हेडलाईट असणार.. डोळ्यात चळचळीत पाणी आणि मनात कचकचीत शिव्या आल्या.. संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा डोळ्यात घुसणारा लखलखता पारा.. कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा.. दिवसाच्या वेळेला हॅलोजन लावून शायनिंग मारतात... काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची... मान वळवून मागे बघितलं तर तो सूर्य होता... मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!! -(पूर्वप्रकाशित)

एका तलवारबाजाची कहाणी

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 11/04/2012 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
पांडवांच्या वनवासातले १२ वे वर्ष संपत आले तसे दुर्योधनाच्या चेहर्‍यावरचे चिंतेचे जाळे वाढतच चालले. पांडवांच्या मागावर सोडलेले गुप्तहेर जसे एकामागुन एक बेपत्ता होउ लागले तसे तसे तर त्याचे डोके काळजीने पोखरले जाउ लागले. कर्ण, द्रोण भीष्मादि दिग्गजांच्या बळावर त्याने पांडवांशी वैर तर घेतले होते परंतु एक कर्ण वगळता कोण किती एकनिष्ठ आहे याबद्दल त्याला शंकाच होती. भीष्म द्रोण तर ऐनवेळेस पाठिशी उभे राहतिल की नाही याची त्याला काळजी होतीच. पण सत्तेच्या लालसेने दु:शासन देखील विरोधात उभा ठाकणार नाही कशावरुन? पण ही शंका तो झटकन पुसुन टाकत असे. द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारा दु:शासन तर होता.

तुझी म्हातारी मेली तर मी काय करू..

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 11/04/2012 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा :- मला झालेला 'डायरीया'. मी तर रस्त्याने बोंबलत हिंडत होतो मी तर भेळपुरी खात होतो मी तर पोरीला गंडवत होतो बोंबलत हिंडत होतो, भेळपुरी खात होतो पोरीला गंडवत होतो तुला मिर्ची लागली तर मी काय करू.. मी तर उकीरडे फुंकत होते मी तर रवंथ करत होते मी तर डोळे मारत होते उकीरडे फुंकत होते, रवंथ करत होते डोळे मारत होते तुला मिर्ची लागली तर मी काय करू . आग लागो सार्‍या दुनीयेला, गेम टाकणार तुझ्यावर प्रेमदिवाणा..

पुढे ही अनभिज्ञ तू

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 11/04/2012 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
पुढे ही अनभिज्ञ तू, मागे ही अनभिज्ञ तू जे जे आहे ते, पळ हाच आहे साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते अनोळखी छायेचा, वाटेत डेरा आहे अदृष्य हातांचा, आम्हाला घेरा आहे पळ हा प्रकाशाचा, बाकी अंधेर आहे पळ हा गमवू नको, तो पळ तुझा आहे राहणार्‍या कर विचार, साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते ह्या क्षणीच्या तोर्‍याने, बैठक सावरलेली ह्या क्षणीच्या ऊर्जेने, धडधड चालवलेली ह्याच्या अस्तित्वाने, दुनिया आमची आहे शतके ओवाळून ह्या, पळा दिली आहेत राहणार्‍या कर विचार, साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते ह्या क्षणीच्या छायेत, आपले ठिकाण आहे या पुढल्या काळाचे, फसवे निशाण आहे कोण पाही भविष्य, कोण जाणी भविष्य ह्या क्षणानेच मिळेल, ज

गोवा

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 11/04/2012 04:05 या दिवशी प्रकाशित केले.
मालवण सोडता सोडता दोन अजब पाट्या नजरेस पडल्या. पहिली पाटी ही. काही अर्थबोध होईना..... Pati दूसरी पाटी ही. ह्याचा काही अर्थबोध गावकर्‍यांना झालेला दिसत नाहिए. अतिक्रमण विरोधी कायदेशिर पाटीच अतिक्रमणाने घेरलेली आहे. Atikraman मालवण सोडून निघालो तो दिवस शिमग्याचा होता. कोंकणात शिमगा तसा मोठा सण. आठवडाभर चालतो.

गर्द नजरेची नार..

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 10/04/2012 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
गर्द नजरेची नार जणु चांदण्याची धार होता पैंजणांचा वार सार डोलतं शिवार कधी उसळता ज्वार कधी बावरी ती खार चिंब मोगर्‍यांचे हार हसु तिचं वाहणारं उंच उडणारी घार जशी तेज तलवार करी नजरांचे भार एका नजरेत गार गर्द नजरेची नार काय शब्द बोलणारं तिच्या नजरेतं सारं माझ्या मनातलं सार
काव्यरस

चिउ आणि काऊ

लेखक मानव यांनी मंगळवार, 10/04/2012 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
एक होती चिउ आणि एक होता काऊ.दोघांच प्रेम हे जगासाठी एक विजातिय जोडीच होती पण दोघांचही एकमेकांवर खुप प्रगाढ प्रेम होत.काउ दिवसभर काव काव करत गावभर फ़िरायचा.आणि चिउ त्याची घरी वाट पहात बसायची.चिउ काऊवर खुप प्रेम करत असे पण काऊला मात्र वेळच पुरत नसे तो दिवसभर पोटाच्या मागे लागलेला असे.तशी चिउ ची भुक फ़ार न्हवती तिला अगदी थोडसच लागायच पण काउला मात्र सगळ गोळा करुन ठेवायची हौस जडलेली होती. त्याच्या कामात तो एवढा व्यस्त असे की चिउचे प्रेम घेण्याएवढाही वेळ शिल्लक नसे.काउ पहाटेच उडुन जाई आणि संध्याकाळी घरट्यात परतत असे.घरी आल्यावर तो चिउला एकेक हुकुम सोडे माझ डोक दाब,पाय दाब.चिऊ त्याच सर्व काही प्र