Skip to main content

नाव चालते नावीका रे

लेखक सांजसंध्या यांनी सोमवार, 23/04/2012 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
नाव चालते नावीका रे नाव चालते नावीका रे ............................. वाराभरली शीडे खुणावी, पैलतीराला निघाया रे ||धॄ|| जन्मभरिची ओझी घेती, दोन किना-या मधे तैरती रंगमंच हा वाही कुणाचा, पाण्या वरती रे... | १ | पल्याड जावे हीच आकांक्षा, कुणी मागता तुजला भिक्षा धीराने तू वल्हवित नेशी, चिंता कसली रे.. | २ | तरी कशाला चिंता वाहे, कर्मदरिद्री तया म्हणावे अज्ञान्याला कशी कळावी, ओळख तुझी ही रे | ३ | नाव चालते नावीका रे ................................ - संध्या
काव्यरस

दहि भल्ले

लेखक नेहरिन यांनी सोमवार, 23/04/2012 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
दहि भल्ले म्हणजे दहिवडे नाहित .हा एक चाट प्रकार आहे.यासाठी लागणारे साहित्य खालिल प्रमाणे. साहित्य :- १वाटी उडदाची डाळ, १पाकिट पाणिपुरिच्या पुर-या, १वाटी चिंचेची चटणी, १ टेबल स्पून चाट मसाला ,१ चमचा लाल तिखट, १ चमचा जिरे पावडर ,१ चमचा धने पावडर ,१/२ लिटर दुघाचे दही, मीठ ,१वाटी पिठी साखर,१/२ हिरव्या मिरच्या १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबिर. कृती :-उडदाची डाळ ४/५ तास भिजत घालावी. नंतर पाणि काढुन टाकुन त्यात २ हिरव्या मिरच्या घालुन मिक्सर मधुन वाटुन घ्यावी .

पुणे-नशिक प्रवास एक सुस्त(z...z...) अनुभव

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 23/04/2012 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो , परवा काही कामानिमीत्त पुण्याहून नाशिकला येण झालं, त्याचा हा वृत्तांत .... प्रवास म्हटला की कधी कधी कंटाळवाणा असतो तर कधी कधी एखादा चुस्त अनुभव देउन जातो. तुम्ही कोठे आणि कुणाबरोबर प्रवास करताय यावर बरच काही ठरतं.शिवाय प्रवास आपण कशानं करतोय यावरही बरच काही ठरत असतं. असो, बरच विषयांतर झालं, मुळ मुद्यावर येतो, नमनालाच घडाभर तेल नको घालायला. नाशिकला लवकर पोहोचायचं असल्याने पहाटे चारला मला उठवायला पार्टनरला सांगून ठेवले. त्याची सध्या नाईट शिप्ट संपून गेलेली होती पण त्या शिप्टच्या सवयीमुळे त्याला रात्री झोप लागत नाही. त्यामुळे त्याने बरोबर चार वाजता ओरडून उठवले.

नशिक -पुणे प्रवास एक मस्त(?) अनुभव

लेखक प्राध्यापक यांनी रविवार, 22/04/2012 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो , परवा काही कामानिमीत्त नाशिक वरुन पुण्याला येण झालं, त्याचा हा वृत्तांत .... प्रवास म्हणल की कधी कधी कंटाळवाना असतो तर कधी कधी एखादा मस्त अनुभव देउन जातो.तुम्ही कुठ आणी कोणाबरोबर प्रवास करताय यावर बरच काही ठरतं.शिवाय प्रवास आपण कशानं करतोय यावरही बरच काही ठरत असतं. असो,बरच विषयांतर झालं ,मुळ मुद्यावर येतो ,नमनालाच घडीभर तेल नको घालायला. पुण्यात लवकर पोहचायचं म्हणून पहाटे ४ वाजता चा मोबाइल मधे अलार्म लावला होता,तरी आवरता आवरता ६वाजले मग घरी नाष्टा करायचा विचार बाजुला सारला आणी गाडी काढली ,५ मिनीटाच्या आत हायवे ला लागलो, अर्थातच सकाळी रस्त्यावर फारशी वाहनं नव्हती ,एप्रील चा महीन

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 22/04/2012 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही.

सांग सांग भोलानाथ...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 22/04/2012 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज मार्केटयार्डातुन फुलं घेऊन परत येताना,डोस्क्यावरच्या उन्हानी आणी आधी मार्केटमधे याच उन्हाळ्यामुळे फुलांच्या अव्वाच्यास्सव्वा वाढलेल्या रेटनी चांगलाच तापलो होतो.साली आंम्ही कायमची गिर्‍हाइकं असुनही अतिमहाग किमतीनी अती पडिक माल उचलायची वेळ आली की हे असच होतं.बाहेर पार्किंगकडे येऊन आमच्या न्हेमीच्या हाटिलवर गेलो.तर आज तेही काही अ-परिहार्य कारणानी बंद...! म्हणुन दुसरी टपरी गाठली आणी तिथे चहा देणार्‍या पोर्‍यानी सक्काळीच घातलेल्या इस्त्रीच्या शर्टवर चहा सांडवला.मग त्याच्या मालकाच्या शिव्या उघड आणी माझ्या मनात देऊन झाल्या.आज आपला दिवस नाही.असं मनाशी पुटपुटत गाडी काढली आणी कुठेतरी निरा मा

वीर्यदानाचे महत्व पटवणारा - विकी डोनर :)

लेखक सोत्रि यांनी रविवार, 22/04/2012 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन अब्राहम, अभिनय कशाशी खातात हे न कळणारा एक बॉलीवुडी पेहेलवान, जेव्हा एक चित्रपट प्रोड्युस करणार हे वाचले होते तेव्हा हसू आले होते. खरंतर त्याचा हा सिनेमा डाऊनलोड करूनच बघितला असता. पण सध्या मद्र देशी काहिच विरंगुळा नसल्याने आणि १२-२ असे लोड शेडिंग असल्यामुळे एका मॉल मध्ये गेलो (A.C. मध्ये २ तास घालवायला). बघण्यासारखी काहीच 'प्रेक्षणीय स्थळं' नसल्यामुळे भयंकर बोर झाले म्हणून PVR मल्टीप्लेक्स कडे मोर्चा वळवला. तिथे त्यावेळी फक्त विकी डोनर ची तिकीटे करंटला मिळत होती. म्हटले चला १२० रूपये जॉनच्या बोडक्यावर घालूयात काही पर्याय नाही.

* शाकुंतल ते कट्यार *

लेखक मदनबाण यांनी रविवार, 22/04/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मला ठाण्यातल्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात जाण्याचा योग आला. :) पं. चंद्रकांत लिमये निर्मीत शाकुंतल ते कट्यार या नाटकाचा प्रयोग होता. :) मला परवानगी मिळ्याल्याने त्या नाटकाची प्रकाशचित्रे टिपता आली.:) फक्त मिपाकरांसाठी इथे देत आहे. :) आनंद घ्या...

प्रेम करतो मी तुझ्यावर मनात

लेखक वडा खालचा वडा यांनी शनिवार, 21/04/2012 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम करतो मी तुझ्यावर मनात हे काही सांगता येईना तुझ्या कानात | सांगावे हे तुजला घेउनी हातात हात म्हणुनी मी आलो घेउनी लाल गुलाब || पण पहिले तर आधीच होता लाल गुलाब तुझ्या हातात मग मी हिरमुसलो मनातल्या मनात | कारण झाला होता उशीर प्रेम व्यक्त करण्यात मग मी विचार केला काय अर्थ या जगण्यात ??|| निघून गेलो समुद्रा पाशी प्राण त्यागण्यास '' मग मात्र परत आले माझ्या लक्षात | काय आहे हरकत जिने सकाळी हा "लाल गुलाब" दिला हातात तिलाच हो म्हणण्यात ?? || मोरया .....
काव्यरस