Skip to main content

breaking dawn part 1

breaking dawn part 1

Published on सोमवार, 12/12/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
नुकताच आम्ही ब्रेकिंग डॉन हा चित्रपट बघितला. ट्वाइलाइट आणि हॅरी पॉटर फन्स मधे नेहमीच जुंपलेली असते. जे के रोलिंग ने स्नेप आणि लिली ची लव स्टोरी एका चॅप्टर मधे जशी सांगितली ते स्टेफनी मेयर ला चार पुस्तकांत ही जमले नाही असेही काहींचे मत आहे. असो , तर हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला , आणि ह्या चित्रपटाने एका आठवड्यात ३०० मिलियन $ कमवल्याचेही वृत्त आहे ( अमेरिकेत काहीही चालतं म्हणा ). तर आता चित्रपटा कडे वळूया . चित्रपटाची सुरूवात एड्वर्ड (रॉबर्ट पेटिनसन) आणि बेला (क्रिस्टन स्टिवार्ट) यांच्या लग्नाने होते. एका वेमपाइर (मराठीत काय म्हणतात ?) आणि सामान्य मुलीचं होणारं हे पहिलाच लग्न असतं. लग्न एका जंगलात होतं . लग्न सोयीस्कर रित्या पार पडतं पण तेव्हढ्यात तिथे जेकब ( टेलर लॉटनर) ( बेला वर प्रेम करणारा) येतो. थोडाफार गोंधळ घालून तो निघून जातो . नंतर एड्वर्ड आणि बेला हनिमून ला जातात , ब्राझील मधल्या कुठल्याश्या गावात ते जातात . हॉटेल मधे गेल्यावर एड्वर्ड चा आतापर्यंत दाखवलेला संयम सुटतो व ते हनिमून साजरा करतात. पण दुसर्या दिवशी बेला च्या शरीरावर झालेल्या जखमा बघून एड्वर्ड थांबण्याचा निर्णय घेतो , नंतर उरलेल्या दिवसांत ते चेस वगैरे खेळत बसतात. पण निसर्गाने आपलं काम केलेलं असतं , बेलाला आपण आई होणार असल्याचे समजते .एडवर्ड तडक घरी जाण्याचा निर्णय घेतो. , बेला ची तब्येत बिघडत जात असते. सर्वजण तिला गर्भपाताचा सल्ल्ला देतात पण ती नकार देते. इकडे सॅम व इतर कोल्हयांना ही बातमी समजते . येणारं नवीन बाळ हे आपल्या प्रजातीला धोका असल्याचे त्याला वाटते म्हणून ते बेला वर हल्ला करण्याचे ठरवतात पण जेकब त्याला विरोध करतो. जेकब ही बातमी कलेन कुटुंबीयना सांगतो व आपण बेला चे रक्षण करू असे सांगतो. इकडे बेला ची तब्येत दिवसेंदिवस खालावतच असते.ति अन्न खाणं बंद करते या वर उपाय म्हणून येणार्या वेमपाइर बाळाच्या पोषणासाठी तिला रक्त पाजन्यात येतं. आणि तीही it is good म्हणून गटागटा पिते. इकडे जेकब रोज रात्री बेला चं रक्षण करण्यासाठी पहारा देत असतो. एका रात्री बेलाला प्रसववेदना सुरू होतात , आणि ती एका बाळाला(अर्ध मानव , अर्ध वेंपायर ) जन्म देते. पण ह्यात ती अर्धमेली होते, तिला वाचवण्यासाठी एड्वर्ड तिला ठीकठिकाणी चावतो, जेकब मात्र बेला वारली अस समजून रडत बसतो ह्याच वेळी सॅम व इतर कोल्हे हल्ला करतात ,इथे एड्वर्ड ,जेकब, व इतर वेंपाइर्स मिळून त्यांचा सामना करतात वल त्याना पिटाळुन लावतात. बेला काही दिवस निपचित पडून असते पण तिच्या शरीरात म्युटेशन सुरू असते, एक दिवस ती डोळे उघडते व ती वेंपायर झालेली असते.इथे चित्रपट संपतो. रॉबर्ट पेटिंसन चे काम चांगले झाले आहे. एक मेट्यूवर्ड नवरा त्याने चांगला रन्गवलाय . टेलर लोटनर कधी कधी भाव खाऊन जातो. क्रिस्टन स्टिवार्ट मात्र कुठल्याही अँगल ने आई वाटत नाही , बालिश वाटते. एक सीन मला खूप विनोदी वाटला ज्यात कोल्हे गुर्र गुर्र करत असतात पण आपल्याला मात्र इंग्लीश डायलॉग्स एकू येत असतात. चित्रपटात बघण्यासारखे काहीही नाही . मागील पार्ट्स पेक्षा हा चित्रपट खालच्या दर्जाचा झालाय. कहाणी मे ट्विस्ट सारखे प्रसंग तर नाहीतच. हा चित्रपट बघून तुमची निराशाच होईल. त्यामुळे चित्रपट टाळलेलाच बरा . हो मात्र जर तुम्ही डाय हार्ड ट्वाइलाइट फॅन वगैरे जर असाल तर मात्र बघा. forever is just the begining ही या चित्रपटाची टॅग लाइन आहे कदाचित ह्याचा अर्थ पुढील भागात कळेल.
लेखनप्रकार

याद्या 6192
प्रतिक्रिया 27

क्रमशः लेखनाची वाईट सवय या चित्रपटवाल्यांनी ही उचलल्याचे पाहुन संताप आला. असो आधीच उतरवून घेतला आहे. विकांती पहावा म्हणतो.

प्लिज प्लिज प्लिज नम्र विनंती आहे की एका चांगल्या चित्रपटाचा असा खून पाडून नका :( अहो ट्वायलाईट काय आहे हे तरी तुम्हाला समजले आहे का हो ? चित्रपट काय अर्धवट झोपेत पाहीला का ? का ट्रेलर पाहून परिक्षण लिहीले आहेत ?
ट्वाइलाइट आणि हॅरी पॉटर फन्स मधे नेहमीच जुंपलेली असते
=)) =)) हे म्हणजे 'नाच रे मोरा' आणि 'कोलावरी डी' वाल्यांमध्ये जुंपलेली असते असे म्हणण्यासारखे आहे.
लग्न एका जंगलात होतं .
__/\__ ते लग्न एडवर्डच्या बंगल्याच्या लॉनवर होते हो.
ब्राझील मधल्या कुठल्याश्या गावात ते जातात . हॉटेल मधे गेल्यावर एड्वर्ड चा आतापर्यंत दाखवलेला संयम सुटतो व ते हनिमून साजरा करतात.
ते एका छोट्याश्या बेटावर असलेल्या प्रायव्हेट बंगलो मध्ये जातात हो साहेब.
इकडे सॅम व इतर कोल्हयांना ही बातमी समजते .
कोल्हा? साहेब अहो वेअरवुल्फ ह्या शब्दावरून तरी मराठी भाषांतर निट करायचे हो. कोणीतरी आमच्या प्रियालीतैला बोलवा रे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

लांडगासूर, चांदणलांडगा, लांडव(लांडगा + मानव चे लघुरूप) किंवा मांडगा, किंवा मांडागासूर, मांडगादैत्य लांडहैवान लांडिब्लिस (लांडगा + इब्लिस) हे शब्द कसे वाटतात?

In reply to by मन१

मराठी शब्दकोशात .... लांडहैवान लांडिब्लिस (लांडगा + इब्लिस) हे वाचून तर खपलोच..... लयी भारि राव..... अवान्तर : लान्डपिशाच्च लान्ड्सैतान चान्डगा इत्यादि इत्यादि.... आमच्या तर्फे जादा पुरवठा... अमृत...

In reply to by परिकथेतील राजकुमार

'ट्वायलाईट' ह्या पराच्या राखीव कुरणात इतरांचा चंचूप्रवेश हा त्याला आवडला नाही हे स्पष्ट दिसत आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. बाकी सर्वच ट्वायलाईट पिक्चर्स हे कमालीचे संथ आणि तद्दन टुकार आहेत असे आमचे मत आहे, आता मग ह्यावर अजुन काय चांगले लिहता येऊ शकेल ? - छोटा डॉन

जे के रोलिंग ने स्नेप आणि लिली ची लव स्टोरी एका चॅप्टर मधे जशी सांगितली ते स्टेफनी मेयर ला चार पुस्तकांत ही जमले नाही असेही काहींचे मत आहे.
बरोब्बर.... सगळा येड्याचा बाजार आहे टॉयलाइट सिरीज म्हंजे. टॉयलाइट ची लायकी तरी आहे का हॅरी पॉटर सोबत तूलनेला उभं रहायची ? ती क्रिस्टन स्टिवार्ट मात्र जामच मनात बसली आहे, अगदी कॅच दॅट किड, इं टू द वाइल्ड पासून ते टॉयलाइट ब्रेकिंग डॉन पार्ट १ पर्यंत सगळ्याच ठीकाणी कायमच आवडली, म्हणून बघायचा चित्रपट, बाकी व्हॅंपायर/वेर्वोल्फ कंन्सेप्टची फूलटू लावली आहे या टॉयलाइट सिरीजने. अवांतर :- शेवटी जेकबला कोण भेटतं हे पूस्तकात वाचल्यावर तर हसून हसून गडाबडा लोळावसं वाटतं .... :)

चित्रपट ओळख आवडली. पण हे ट्यायलाईट सिरीजचे चित्रपट काही आवडले नाहीत. वँपायर्स वगैरे असलेले भयपट पण श्टुरी रोमँटीक गुलाबी वगैरे. वर कौतिक असं की वँपायर आहेत पण सिनेमात बिभत्सपणा काही नाही. एकतर नुसतच रोमँटीक सिनेमे काढा किंवा च्यायला काय व्हायोलंस दाखवायचं आहे ते होउन जाउ देना. सॉ, हॉस्टेल, गेला बाजार राँग टर्न किंवा हिल्स हॅव आईज बघून हे असले सिनेमे बालपट वाटतात.

No. He Becomes A Werewolf In New Moon After Edward Leaves Bella And She Starts Spending All of Her Spare Time With Jacob. But No He Is NOT A Werewolf In Twilight. In Breaking Dawn, We Find Out He Is A Shape Shifter

In reply to by snowy

ऑ लेख फक्कड मराठीतुन आणि प्रतिसाद इंगजीतुन? वरचा लेख नक्की तुम्हीच लिहिला आहे नं? की भावना व्यक्त करायला इंग्रजी सोप्पी ? ;)

In reply to by snowy

In Breaking Dawn, We Find Out He Is A Shape Shifter In Breaking Dawn, We Also Find Out He Is Son in Law of बेला. एकूणच स्टोरी सोबत शेप शिफ्टर या रेड इंडीयन लोकांच्या sorcery संबधीत संकल्पनेचीही वाट लागली आहे. (Carlos Castaneda's टिचींग ओफ डान जुआन जरूर वाचा )

वेमपाइर (मराठीत काय म्हणतात ?)
श्रीयुत नारायण धारप यांनी 'लुचाई' हा शब्दप्रयोग वापरला आहे.
वेअरवुल्फ = कोल्हा ??
वुल्फ = लांडगा

ट्विलाईट च्या पहिल्या भागाची टॅगलाईन वाचुन चित्रपट पाहायची इच्छा मेली ती मेलीच. ट्विलाईटचे ट्रेलर पण पाहावत नाही. वॅम्पायर आणि मनुष्याची प्रेमकहाणी..कै च्या कै कन्सेप्ट..! भारतात ही चित्रपटमालिका साफ आपटली असे ऐकुन आहे.

In reply to by इंटरनेटस्नेही

धागा न वाचताच प्रतिसाद दिलास ना? जरा लेखक काय म्हणतो ते तरी पहा......
मागील पार्ट्स पेक्षा हा चित्रपट खालच्या दर्जाचा झालाय. कहाणी मे ट्विस्ट सारखे प्रसंग तर नाहीतच. हा चित्रपट बघून तुमची निराशाच होईल. त्यामुळे चित्रपट टाळलेलाच बरा .
=)) कसा पकडला. ;)

In reply to by गणपा

बहुदा इंट्याने प्रत्येक प्रकारच्या धाग्यासाठी त्या त्या प्रकारचे प्रतिसाद एक्सेल फाईलमध्ये सेव करून ठेवले असावेत. ;)

चित्रपट खुप गडबडीत बघितलात का? |लग्न सोयीस्कर रित्या पार पडतं पण तेव्हढ्यात तिथे जेकब ( टेलर लॉटनर) ( बेला वर प्रेम करणारा) येतो. थोडाफार गोंधळ |घालून तो निघून जातो . जेकब ला एडवर्ड बोलावतो, बेला साठी लग्नाची भेट म्हणून. एका वेमपाइर आणि मुलीचा हनिमून त्या मुलीसाठी जीवघेणा ठरू शकतो म्हणून जेकब बेला आणि एडवर्ड शी भांडून निघून जातो. |ति अन्न खाणं बंद करते या वर उपाय म्हणून येणार्या वेमपाइर बाळाच्या पोषणासाठी तिला रक्त पाजन्यात येतं. बेला ने कितीही अन्न घेतले तरी त्या बाळासाठी पुरत नाही. येणारे बाळ पण vampire असण्याची शक्यता असल्याने तिला रक्त पाजण्याचा उपाय जेकब सुचवतो. | बेला काही दिवस निपचित पडून असते पण तिच्या शरीरात म्युटेशन सुरू असते, एक दिवस ती डोळे उघडते व ती वेंपायर | झालेली असते एखादा मनुष्य vampire बनण्यासाठी ३ दिवसांचा कालावधी लागतो. या काळात त्याच्या शरीरात होणारे बदल असह्य असतात आणि तो तळमळत रहातो. पण बेला ची तळमळ silent असल्याने एडवर्ड आणि जेकब ला वाटते कि ती मेली आहे. |क्रिस्टन स्टिवार्ट मात्र कुठल्याही अँगल ने आई वाटत नाही , बालिश वाटते :) हो, ती १८/१९ वर्षांचीच दाखवायची आहे त्यांना. | एक सीन मला खूप विनोदी वाटला ज्यात कोल्हे गुर्र गुर्र करत असतात पण आपल्याला मात्र इंग्लीश डायलॉग्स एकू येत असतात. :) :) :)

हा चित्रपट जरुर बघा The Gods Must Be Crazy

In reply to by श्री गावसेना प्रमुख

The Gods Must Be Crazy - One and Two