ज्यु. अर्धवटराव
गणपा भाऊंच्या लेकीचे "तारे जमीं पर" वाचताना आमच्या चिरंजीवांचा, अर्थात ज्यु. अर्धवटरावांचा एक किस्सा आठवला. किस्सा तसा साधाच, पण मला एका क्षणात अपरंपार सुख देणारा.
मागच्याच आठवड्यातील गोष्ट. मी १०% वेळ ऑफीसचं काम आणि ९०% वेळ मिपावर पौराणीक विमाने, धर्म, वगैरे बौद्धीके पचवून थोडा वैतागलेल्या अवस्थेत संध्याकाळी घरी परतलो. ज्यु. अर्धवटराव खेळण्यात दंग होते. त्यांची मला वेलकम करायची एक खास स्टाईल आहे. त्यानुसार आमचे आगत-स्वागत झाले आणि मी स्थानापन्न झालो. डोक्यात या निष्ठूर-पापी-व्यवहारी वगैरे वगैरे दुनीयादारीचे तसलेच काहि व्यवहारी विचार घोळत होते.
मिसळपाव
" alt="" />
