Skip to main content

या आईला तर काही, काही कळत नाही ..

लेखक सांजसंध्या यांनी गुरुवार, 19/04/2012 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
या आईला तर काही, काही कळत नाही.. ------------------------------------------ या आईला तर काही, काही कळत नाही ओरडत असते सदानकदा..जरा ब्रेक नाही.. झोपेतच उठवून नेते..खाण्यासाठी रागे भरते इतक्या सक्काळी सक्काळी ..भूक लागत नाही या आईला तर काही....काही कळत नाही .................................|१| दूध पितांना कार्टून जरा, पाहू देत नाही.. बाबा बघतात बातम्या त्यांना, काही म्हणत नाही सारखी सारखी घड्याळ बघते..बसू देत नाही बाथरूममधे ओढत नेते..रडू देत नाही या आईला तर काही....काही कळत नाही..................................|२| कपडे, भांग, पावडर, शूज..

माजोरडेपणा!

लेखक amit_m यांनी गुरुवार, 19/04/2012 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वी टीव्हीवर बातमी पहिली, एका दुध कंपनीने दरवाढ केली म्हणून दुध उत्पादकांनी अक्षरशः हजारो लिटर दुध रस्त्यावर ओतून दिले. हा माजोरडेपणा झाला! एकीकडे ह्यांना दर वाढवून पाहिजेत (दूध कंपनीला नव्हेत) आणि दुसरीकडे अशी नासाडी करायला लाजादेखील वाटत नाहीत. एका सामान्य शेतकऱ्याला ज्याच्या घरी 1-2 गाई किंवा म्हशी आहेत त्याला असले उद्योग परवडण्यासारखे असतात का? 'महागाई फार वाढली' अशी ओरड आपण सतत करत असतो.. अशा घटनाच महागाईला वाढीला प्रोत्साहन द्यायला कारणीभूत असतात का? ह्यातून काय निष्पन्न होते?

दोन दुर्मिळ पुस्तके परत.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 19/04/2012 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, ज्यांना या विषयात रस आहे त्यांनी ही पुस्तके जरूर घ्यावीत. (मी नाव नोंदवणार आहे.) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी स्थापन केलेले भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे आपली १०१ वर्षांची वाटचाल पूर्ण केली. या कालावधीत मंडळाने अनेक् मान्यवरांची अनेक विषयांवरील पुस्तके, विविध शोधनिबंध त्रैमासिकांतून् इतिहास अभ्यासकांसाठी प्रकाशित केलेले आहेत. डॉ.ग.ह.खरे हे प्रदीर्घ् कालावधीसाठी मंडळात कार्यरत होते. त्यांचा बहुविध अभ्यास सर्वांच्याच परिचयाचा आहे. नाणी, ताम्रपट्, शिलालेख तसेच फर्माने व कागदपत्रे इ.चे वाचन डॉ.खरे कित्येक वर्षे करीत होते.

मोती बनतो शिंपल्यात

लेखक वडा खालचा वडा यांनी गुरुवार, 19/04/2012 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
मोती बनतो शिंपल्यात पक्षी राहतो घरट्यात | गणपत रावांच्या घराण्यात अक्कल नाही टाळक्यात || मोर या .....
काव्यरस

शब्द शब्द गुम्फावेत असे

लेखक वडा खालचा वडा यांनी गुरुवार, 19/04/2012 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द शब्द गुम्फावेत असे वेणीत ओवतात गजरा जसे | भावनिक हृदयाची साद असते माऊ तेव्हाच मन "कविता" करून लागते गाऊ ||१|| मोरया .....
काव्यरस

सरणाचो आराम देवानेच दिलेलो असा..

लेखक निश यांनी गुरुवार, 19/04/2012 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
माणुस म्हणुन जगुक बघण्या त्याकाही आता पैसे पडतत. आजार पळवुक लावुक घर विकुक बघतत. पोराचा शिक्षाण करुचा झाला तर शिक्षाण नको पण देणगी आवारा मारे, म्हणुक लावतत. नोकरी करुक जाता हरामखोर लाच मागतत. जिवन जगण्या सोपा नाय देवाक आपली काळजी आसा. जिवन जगुन थकल्यावर आराम सरणाचो त्यानेच दिलेलो असा.. जिवन जगुन थकल्यावर आराम सरणाचो त्यानेच दिलेलो असा..

डुप्लिकेट आयडी : एक मार्गदर्शन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 19/04/2012 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
ढिस्क्लेमर :- १) हा धागा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने काढला असून, कोणत्याही गैरकृत्याला उत्तेजन देण्याचा हेतू नाही. २) धाग्यातील युक्त्या वापरून देखील आपण तोंडावरती पडल्यास लेखक जबाबदार नाही. मित्र हो, काल आमचे मित्र श्री. मृत्युंजय ह्यांची एक प्रतिक्रिया वाचून आम्हाला फारच दु:ख झाले. येवढी वर्षे आंतरजालावरती काढून देखील अजून बर्‍याच सदस्यांना डुप्लिकेट आयडी बद्दलचा अभ्यास कमी पडतो आहे हे पाहून आता ह्यावरती मार्गदर्शन केलेच पाहिजे हे आम्ही जाणले.

जगणे सुरात आले

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 19/04/2012 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
जगणे सुरात आले

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले

चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले

दुखवू नये कधीही मनभावना कुणाच्या
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले

पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले

मतला, रदीफ, यमके, बहरास योजताना