मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दासबोध अभ्यास संकेतस्थळ उदघाटन आणि प.पू. चैतन्य महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम

विटेकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
|| श्रीराम समर्थ || नमस्कार, मागे मिपावर लिहल्याप्रमाणे दासबोध अभ्यास संकेतस्थळाच्या उद्घाटनाचा आणि प.पू. चैतन्य महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे दोन्ही दिवस भरत नाट्य मंदिर भरले होते.समर्थ आणि वारकरी संप्रदायातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. (येथे फोटो कसे लावतात याचे तांत्रिक माहीती नसल्याने चेपु चा दुवा देत आहे. ) http://www.facebook.com/media/set/?set=a.318136148214176.90028.100000533811178&type=1&l=8e0724c7ed जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. डो. सदानंद मोरे यांच्या शुभ हस्ते,संत शिरोमणी ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणारे प.पू. चैतन्यमहाराज आणि आदरणीय समर्थ भक्त श्री. सुनीलजी चिंचोलकर यांच्या शुभंकर उपस्थितीत दासबोध अभ्यास संकेतस्थळाचे औपचारिक उदघाटन संपन्न झाले. हा एक अपूर्व योग होता. http://www.youtube.com/watch?v=huAiLZYGdpY समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यातील समान धागा व्यासंगी प्रा. डो. सदानंद मोरे यांनी हळूवार पणे उलगडून दाखवला. आणि गलिच्छ राजकारणांसाठी या पवित्र संप्रदाय़ांमध्ये फूट पाडणार्याचा निषेध केला. आणि यानंतर सुरु झाला गंगौघ ... प.पू. चैतन्य महाराज - श्री. समर्थ रामदासांची करुणाष्टके http://www.samarthramdas400.in/audio/cm_pravachane_01.mp3 http://www.samarthramdas400.in/audio/cm_pravachane_02.mp3 दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे यांच्या सुश्राव्य भजनाने झाली. वरील दुव्यांमध्ये ही भजने आहेत. >||जय जय रघुवीर समर्थ ||strong>

वाचने 3854 वाचनखूण प्रतिक्रिया 5

देविदस्खोत 14/12/2011 - 19:39
जय जय रघुवीर समर्थ !!! संकेतस्थळाविषयी आणी प्रवचनाविषयी माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद !!!!

मूकवाचक 15/12/2011 - 17:29
संकेतस्थळाच्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद...