Skip to main content

गोडाची कमळफुले.

लेखक ज्योति प्रकाश यांनी सोमवार, 03/09/2012 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
हि कमळफुले लहान मोठे सगळ्यांनाच आवडतात्.बाहेरचे खाणे आणण्यापेक्षा घरगुती खाणे केव्हाही चांगले.

जन्मकुंडलीत नोकरी, करीअरचे स्थान कोणते? सहावे की दहावे?

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 03/09/2012 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
(१) जन्मकुंडलीत नोकरी, करीअरचे स्थान कोणते? सहावे की दहावे? (२) तसेच, सहावे स्थान शतृ, रोग दर्शवते. त्यानुसार जर सहाव्या स्थानात सिंह राशी असून त्याचा मालक रवी बाराव्या स्थानात कुंभ राशीत बुधासोबत असेल तर त्याचे फळ काय मिळेल? (३) आणि दहाव्या स्थानात धनू राशी असून त्याचा मालक गुरू हा तिसर्‍या स्थानात चंद्राबरोबर वृषभ राशीत असेत तर त्याचे फळ काय?

माझेच मी....

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी सोमवार, 03/09/2012 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझेच मी..... * कुणी भेटता, ठाव माझेच मी विचारतो शहरात या, नाव माझेच मी विचारतो * असा दूर आलो, कळेना कुठे पोहोचलो प्रवासात या, गाव माझेच मी विचारतो * काढले विकाया माझेच सर्वस्व मी दुकानात या, भाव माझेच मी विचारतो * तो बैसला समोरी, हार माझी नक्कीच आहे शत्रूस माझ्या, डाव माझेच मी विचारतो * जायबंदी शरपंजरी, शेवटी युद्धात मी किती जाहले, घाव माझेच मी विचारतो * -अशोक

एक डोक्यातला किडा

लेखक अस्वस्थामा यांनी सोमवार, 03/09/2012 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा काही काही कर्तृत्ववान लोकांच्या गोष्टी ऐकतो तेव्हा कधी कधी थोडी बोलीवुडी गोष्ट होते असं वाटत रहातं. हुमायून भारत सोडून पळून गेला तरी पण भली मोठी फौज घेउन परत येतो आणि दिल्ली काबीज करतो.. आणि शिवाजी राजे सगळे आयुष्य अस्तित्त्वाची लढाई करत बसतात. परागंदा राजे, नेते परत येवून मिरवतात, परत नेते बनतात आणि लोकं पण त्यांना दारात उभे करतात (उदा. नवाज शरीफ यांचा पाकिस्तानात परत प्रवेश ) नव्हे त्यांना पूर्वीचे स्थान पण देऊ करतात..

माझे पहिले चित्रपट परिक्षण-- खामोश पानी

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 03/09/2012 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझ्यासारख्या अत्यंत रूक्ष आणि अरसिक माणसाचा चित्रपट परिक्षणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.तेव्हा परिक्षण विस्कळीत वाटल्यास ते समजून घ्यावे ही विनंती. त्याचे झाले असे की गेल्याच आठवड्यात एन.डी.टी.व्ही वर २०१२ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास नक्की कसे निकाल लागतील याविषयीचा ओपिनिअन पोल दाखवला होता.हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी तो कार्यक्रम अर्थातच चुकविला नाही.त्या कार्यक्रमात निवडणुकविषयक प्रश्नांबरोबरच सर्वेक्षणात विचारलेल्या इतर प्रश्नांनाही लोकांनी नक्की कसे प्रतिसाद दिले हे पण दाखविले होते.त्यातच एक प्रश्न होता--

मनधुंद - मनाला धुंद करणारी गाणी

लेखक योगेश पितळे यांनी रविवार, 02/09/2012 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
अनंतलता निर्मीत आणि गीतकार अखिल जोशी प्रस्तुत मनधुंद हा एक सुंदर मराठी अल्बम नुकताच ' मानबिंदू म्युझिक 'तर्फे ऑनलाईन प्रकाशित झाला आहे. पाऊस आणि प्रेम या मनाच्या खास आणि नाजूक कप्प्यात असलेल्या विषयावर आधारलेली;गीतकार अखिल जोशी यांनी लिहिलेली ९ वेगवेगळी गाणी या अल्बमद्वारे मिपाकर संगीत रसिकांना ऐकायला मिळतील.मर्डर-२, देव-D, दस कहानिया या सारख्या हिंदी चित्रपटात पार्श्वगायन केलेल्या क्षितीज तारेने प्रथमच एका मराठी अल्बमसाठी पार्श्वगायन केल आहे.

खुसखुशीत पाकळ्या

लेखक नूतन यांनी रविवार, 02/09/2012 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळच्या चहाबरोबर तोंडात टाकायला खुसखुशीत व पौष्टिक पदार्थ (हे प्रमाण दोन माणसांसाठी आहे) साहित्यः मोड आलेले मूग २ वाट्या हिरव्या मिरच्या २-३ आलं २-३चकत्या चिरलेली कोथिंबीर १ मूठ मीठ चविनुसार पावाचा चुरा जरुरीनुसार (अंदाजे १ वाटी) उकडलेला बटाटा १ (मध्यम आकाराचा) डाळीचे पीठ (बेसन) १ मोठा चमचा पाणी जरुरीनुसार तेल तळण्यासाठी कृती