Skip to main content

"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी"

लेखक शिवप्रसाद यांनी मंगळवार, 08/01/2013 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी" (माझी पहिलीच कविता ) ऊठ मुला झडकरी आळस टाक झटकून | परिक्षा येता जवळी वेळ जाईल निघुन || करायचे आहे आईवडिलांचे स्वप्न साकार | तुझ्या शिवाय त्यांना नाही कोणाचा आधार | अभ्यास करि चांगला लाउनी मन | परिक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || आईवडीलांनी तुझ्यासाठी कष्ट केले अपार | प्रसंगी फक्त तुझ्याचसाठी सोसली उपासमार | शिक्षणाकडे लक्ष दे देऊनी ध्यान | परीक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || ठेच लागता तुझ, जीव त्यांचा तळमळे | आता तरी सोडुन दे तुझे ऊनाड चाळे | तुला करायला हवे अभ्यासात एकाग्र मन | परिक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || जिवनात असंख्य परिक्षा द्याव्या लागतात

मी बिभीषण एकटा

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 08/01/2013 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
बेमुवर्त पणे येथे, मद्याचे प्याले वागती यांना न कसली नीती, यांना न कसली भिती तो जो ऊभा राहिला, अन्याय बोलण्या काही तो ही म्हणे आताशा, मद्यात धुंद राही कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही होती काल परवा, हिरवी डौल शेते केव्हा लिलावले त्यांना, आम्हा कळलेच नाही पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही वाटे जरी निराशा, माझ्या स्वरांतुनी तुम्हाला मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही झटलो बांधावया सेतू,तरले दगड नाही लिहिणा-याच्या अहो आज, हातात राम नाही...
काव्यरस

गोवा - ईतर छायाचित्रे

लेखक पांथस्थ यांनी मंगळवार, 08/01/2013 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
गोवा भेटि दरम्यान काढलेली काहि इतर छायाचित्रे १. छोटा वाघातोर / ओझरान समुद्रकिनार्‍यावरील एक संध्याकाळ - Small Vagator Beach Distant View २.

मागे वळून पाहताना.....

लेखक मन यांनी मंगळवार, 08/01/2013 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
संपर्काची फारशी साधने उपलब्ध नसतानाच्या काळातील एका घटनेचे धावते वर्णन. hindsight. ते बघा, ते फार दिवसाचे चालताहेत. शेवटी एकदाचे खूप खूप दिवस चालत, तंगडतोड करत ते तिघे चौघे वरती, एका उंच डोंगरावर नुकतेच पोचलेत. डोंगर त्या अतिअघनदाट जंगलानं पूर्णपणे वेढलेला आहे. जंगलात वाट चुकून ह्या टोळक्याला नक्की किती दिवस झाले तेही आठवत नाहिये. जंगल भलतच दाट आहे. मनुष्यासाठी आजवर अस्पर्शित राहिलेलं आहे. दाटी इतकी, की भरदिवसा सुद्धा जमिनीवर सूर्यप्रकाश पडूच नये. त्या वनात एक अतिप्रचंड, आभाळाएवढं पाणी सतत वाहवत असणारी नदी आहे.

राधा

लेखक रेशा यांनी मंगळवार, 08/01/2013 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
मोरपीस जणू फिरते तनी, वेणू नाद हा पडता कानी, काहूर मनात, अन हुरहूर आगळी मोहरते आठवता, छबी सावळी थरथरते अधर, लाली गाली किंचित लाज, अधीर नयनी ललना साजिरी, नटली सजली शाम सख्यावर, आणिक भाळली बावरे मन, अन आशा कोवळी मिलनास आसुसली, राधा भोळी पाहून अधीर राधा, बोले सखी "होईल बोभाटा ग गोकुळी!", नयनी पाणी, मिटे पापणी अस्वस्थ राधा,आजही नंदनवनी!!! ... रेघोटी

येशील?

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 08/01/2013 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
अजुनही आठवतंय... सुंदर पुरीया रंगलेला असतांना कटकन सतारीची एकचं तार तुटावी असे काहीतरी झाले होते ----- तू गेलीस त्या दिवसापासून हे असचं होतयं मग माझ्या सगळ्या कवितांचा पसारा मांडुन बसतो घरभर पानचं पानं आणि मध्ये मी ---- अमावस्येच्या रात्री हट्ट धरून बसली होतीस मला चंद्रचं हवाय त्या रात्री कागदाचा एक चंद्र करुन खिडकीच्या काळ्या काचेवर चिकटवला होता तेव्हा कुठे समाधान झाले तुझे ती बघ तिकडे त्या कोपर्‍यात त्या कागदाच्या चंद्रावरची कविता ती माझ्याकडे कशी रागाने बघतेय... ----- दोन आठवड्यांसाठी मी परगावी जातांना डोळ्यात दोनच टप्पोरे थेंब होते तुझ्या एकाने मला बांधून टाकले आणि दुसरा तुझ्या
काव्यरस

"ते" - ५

लेखक स्पा यांनी मंगळवार, 08/01/2013 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
"ते" -१ "ते" -२ "ते" -३ "ते" -४ रामोशाची पोरं मशाली आणणार होती , आमच्याकडे दोन कुर्हाडी होत्या, गुरव देवीचा अंगारा आणणार होता, आमच्या बुद्धीप्रमाणे आम्ही तयारी केलेली होती . त्या दिवशी पोर्णिमा होती . लक्ख चांदणे पडलेले होते . आणि आम्ही निघालो , अंगावर शहारा येत होता , भयंकर धाडस करत होतो , सगळे गुपचूप सड्यावर आलो ..

माझी बाग

लेखक neeta यांनी मंगळवार, 08/01/2013 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
अजून काही नवीन फोटो माझ्या बागेतल्या झाडांचे :