Skip to main content

माझे ह्या वर्षीचे संकल्प

लेखक सुचेल तसं यांनी मंगळवार, 08/01/2013 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन वर्षाची सुरुवात झाली की काहीतरी संकल्प करायची सुरसुरी येते. ९९% संकल्प हे मागील वर्षी केलेले आणि पूर्ण न झालेले असतात. वर्ष सुरु झालं की अ] डायरी (जास्तीत जास्त १५ दिवस नियमित नोंदी केल्या जातात) घेतली जाते ब] कालनिर्णय (ज्यात इंग्रजी तारखेखाली तिथी, अमुक महाराजांची पुण्यतिथी, त्याच्याखाली "१ लिटर दुध चालू" किंवा "कामवालीला पगार दिला" अशी घरगुती माहिती लिहीली जाते) घेतलं जातं क] संकल्प केले जातात. संकल्पांना आपण विकल्प समजून काही दिवसांनी ऑप्शनमधे टाकतो. जे थेट पुढच्या वर्षीच परत डोकं वर काढतात.

आमची पहिली गाडी

लेखक पैसा यांनी मंगळवार, 08/01/2013 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पहिली गाडी झालं असं की घराचे सगळे पैसे देऊन झाले आणि हप्ते पण सुरू झाले. काही दिवसांनी हातात थोडे पैसे खुळखुळायला लागले. तोपर्यंत घरात दोनाचे चार मेंबर्स झाले होते आणि जबाबदार पालकांप्रमाणे स्कूटरवरून दोन मुलांना घेऊन जाणे किती धोक्याचे आहे वगैरे विचार आपोआप डोक्यात यायला लागले. मग मी आणि माझा नवरा याच्या तार्किक शेवटाकडे पोचलो, ते म्हणजे आपल्याला एक चारचाकी गाडी घ्यायला पाहिजे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. नवरा लगेच ड्रायव्हिंग शिकायला ड्रायव्हिंग स्कूलमधे जायला लागला. ड्रायव्हिंगच्या बाबतीत माझा आधीपासूनच आनंद! एक बारीकशी सनी होती तीही तोपर्यंत गंजून जाऊन विकून झाली होती.

गोव्याचे पक्षी

लेखक पांथस्थ यांनी सोमवार, 07/01/2013 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
२०१२ नाताळाच्या सुट्टीत गोव्याला जाउन आलो तेव्हा काढलेली हि पक्षांची छायाचित्रे. हि छायाचित्रे वागातोर, साळीगाव, पर्रा आणी डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य, चराओ बेट इथे काढलेली आहेत.

जळ.लि..

लेखक गवि यांनी सोमवार, 07/01/2013 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
तुमचं लिखाण मिळमिळीत आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या लिखाणाला वरणभाताची उपमा कधी मिळाली आहे का? तुमच्या शब्दांची तुलना वपु काळेंच्या लेखनाशी केली गेली आहे का? तुमच्या लेखनात ज्वलंत अनुभवविश्व नाही अशी प्रतिक्रिया तुम्हाला मिळाली आहे का? तुमचं लिखाण वाचून तुम्हाला कोणी मिडिऑकर, कार्कुंडा, किंवा एसी केबिनमधे बसून कल्पनेचे मनोरे रचणारा अशी दूषणं दिली आहेत का? वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर "लाजयुक्त हो" असं असेल तर वाईट वाटून घेऊ नका. पुढे वाचा.

बुद्ध

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 07/01/2013 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मित्राकडे गेलो होतो तर बुद्धाची ही प्रतिमा दिसली... बघत रहावं अशी. इतकी विलोभनीय की मूर्तीकाराच कौतुक वाटलं. पद्मासनात बसलेला आणि विरक्त दिसणारा अश्या अनेक प्रतिमा आहेत पण ही मूर्ती अत्यंत साधीये. कुठलाही अभिनिवेश नाही तरीही बुद्धाची चित्तदशा सहीसही प्रकट होतेय. इतकी की तिच्याकडे पहात राहिलं तरी आपण बुद्धाच्या चित्तदशेशी संलग्न होतो. मग दोन दिवसासाठी त्याच्याकडून मागून आणली. मुलाला म्हटलं तू या प्रतिमेचं एक सुरेख कॉंपोझिशन कर. त्याचा मित्र आला होता त्यानं रेफरन्ससाठी हा फोटो घेतला...

कोंकण-मालवण दौरा....

लेखक सौरभ उप्स यांनी सोमवार, 07/01/2013 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेम्बर शेवटच्या आठवड्यात कोंकणात जाणे झाले.. तिकडच्या नैसर्गिक सौंदर्याचे काही फोटोज... कॅमेरा - Sony Cybershot DSC W570 १. ट्रेनीतून जाताना मस्त सूर्योदयाचे दर्शन झाले.... 1 २. अशी बैलगाडी बघितली कि अगदी गावात आल्यासारखं वाटत, एकदम फ्रेश.... 2 ३.

Catch 22

लेखक शैलेंद्रसिंह यांनी रविवार, 06/01/2013 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
"हरन्याला पुलिस नी पकडुन नेलं ना बाप्पा.." कालू वरडत वरडतच येत व्हता. "का म्हुन?" बाप्पाच्या चेहऱ्यावर माशीही उडाली नाही. "ते काल नक्सलीनी मारलं व्हतं ना पुलिसले...हरन्या नक्सली हाये म्हनत व्हते" "नक्सली? हरन्या? काय येडबीड लागले का बे पुलिसले?" "कोनीतरी पायजे ना बाप्पा....रिकॉर्ड ले.. हरन्या वावरात गेला व्हता रात्री...धरला ना मग त्याले रस्त्यात...जंगल म्हुन वावराचा रस्ता हाये...तर तिथेच धरला पुलिसने..." "साली आपली तर जिदंगानीच खराब हाये साली...तिथे नक्सली इथे पुलिस..." "जाव दे...रोजचाच हाये..." "हा..

वेदना

लेखक kanchanbari यांनी रविवार, 06/01/2013 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
इवलस तूझ बाळ वेदनांनी झाल लाचार म्हणे काय केल त्याने पाप सर्वांना सांग तु आज मखमलीची असतात स्वप्नांची पिसं अत्याचारी या दुनियेत हिरमुसली तुझी कुस ओढवली आहे सर्वांनी अंधाराची चादर तुझ्या या संसाराला लागली कुणाची नजर डोळ्यांच्या या पापण्या बघतांनाही लुकलुकतात अश्रुंच्या या सागरात थेंब रक्ताचे मिसळ्तात अरे जगाच्या माय बापा तुच आहेस ना सर्वांचा भाग्य विधाता मग दुर कर नशिबातला काटा तेव्हा करेल वंदन तुला दाता
काव्यरस

अकबरुद्दीन ओवेसी या धर्मांधाचे देशाबाहेर पलायन

लेखक सागर यांनी रविवार, 06/01/2013 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावर मिपावर चर्चा झाली आहे असे दिसले नाही म्हणून हा धागा. अलिकडेच हैद्राबादेतील झपाट्याने वाढत असलेला व एम.आय.एम या नावाने प्रसिद्ध असलेल्या पक्षाचा नेता अकबरुद्दीन ओवेसी याने एक अतिशय प्रक्षोभक भाषण केले होते. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला काणाडोळा केलेल्या मिडियाला कसे भान आले न कळे. पण त्यांनी या प्रकरणाचा गाजावाजा केला व मग या महाशयांवर केस दाखल झाली. आपल्या भाषणात १०० कोटी हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची भाषा करणारे हे अकबरुद्दीन ओवेसी महाशय सध्या इंग्लंडमध्ये परागंदा होऊन भूमिगत झाले आहेत. असो.