Skip to main content

एका सेवाभावी डॉक्टरांचा स्तुत्य उपक्रम!

लेखक बाळकराम यांनी बुधवार, 30/01/2013 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काही दिवसापूर्वीच ई-सकाळमधल्या ह्या baatamee ने लक्ष वेधले आणि समाजातल्या काही घटकांच्या तरी जाणिवा अजूनही जागृत आहेत याचा एक सुखद प्रत्यय आला. ही गोष्ट आहे पुण्याजवळच्या हडपसर मधील डॉ. गणेश राख यांची आणि त्यांनी चालू केलेल्या एका जगावेगळ्या आणि सेवाभावी उपक्रमाची.

आठवणीतले ग्रीस - भाग १

लेखक nishant यांनी बुधवार, 30/01/2013 03:01 या दिवशी प्रकाशित केले.
"तौबा तुम्हारे ये इशारे.." युट्युब वर चलते-चलते सिनेमातले गाणे चालु होते आणि बायकोने फर्माईश केली.. ह्या गाण्याचे शुटिंग जिथे कुठे झाले आहे, तिथे एकदा जायला पाहिजे, काय मस्त दिसतात ती मागची पांढरी-निळी घरे!! मग काय! गुगलवर शोध करायला सुरवात झाली आणि समोर नाव आले ग्रीस आणि त्याचे जगातील सर्वात सुंदर समजले जाणरे बेट - सँटोरिनी. मग ठरलेच, येत्या ऊन्हाळ्यात ग्रीसचा दौरा करायचा!! २०११ हे साल युरोपियन युनियन वर अनेक प्रश्नचिन्हे उभी करतच सुरु झाले.. युरोपियन युनियन टिकणार का? टिकले तर किती काळ? आणि नक्की या युनियनचा फायदा काय आणि कोणाला? असे एकना अनेक प्रश्नांवर चर्चासत्र टिव्ही वर चालु..

हे " शास्त्रीय संगीत" हाय तरी काय राव ? ( भाग १)

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 29/01/2013 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला ' मधुबनमे राधिका नाचेरे ' हे गीत आवडत असते पण राग " हमीर" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते. आपल्याला ' अब तो तेरे बिन जी लेंगे हम "' हे गीत आवडत असते पण राग " अहीर भैरव " मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते. आपल्याला ' छैया रे छैया ' ( द ट्रेन) ' हे गीत आवडत असते पण राग " मालकंस" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते. आपल्याला ' गोरी तोरी बाँकी ' हे गीत आवडत असते पण राग " भैरवी" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते. आपल्याला ' साज हो तुम आवाज हुम मै ' हे गीत आवडत असते पण राग " पटदीप " मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते. आपल्याला ' तू चीज बडी है मस्त मस्त ' ही गीत आवडत असते पण राग " भीममपलास" मधे आहे हे आपल्याला

गाण्याची आठवण...आठवणीतलं गाणं

लेखक अक्षया यांनी मंगळवार, 29/01/2013 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळलेला काव्यप्रेमी यांनी लहानपणीचा आठवणींचा पेटारा उघडलाच आहे तर त्याच अनुषंगाने. आत्ता आचानक मुकद्दर का सिकंदर मधले 'ओ साथी रे...तेरे बीना भी क्या जीना' गाणे मी ऐकले आणि लिहावेसे वाटले. हे गाणे ऐकले आणि मला लहानपणी उन्हाळ्याचा सुट्टीत वाड्यात सगळे एकत्र खेळायचो ते दिवस आठवले. तेंव्हा हा चित्रपट आणि हे गाणे खुपच फेमस झाले होते आणि सतत कानावर पडत असे. हे गाणे आंणि ते दिवस याची मन आपोआपच सांगड घालते. तेंव्हा एकत्र घालवलेले ते क्षण ते सवंगडी यांची आठवण येते.

जीवनरेषा

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 29/01/2013 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम असीम जलद विहारी कोणी न जाणे अंत तयाचा पवन दिशाहीन भ्रमरे भवती रोखे गिरी वेग त्याचा अजब जळी समीकरण असे हे बरसे जीवन रेषा सदनी बरसे जीवन रेषा मधुर स्वरे रसरंग परांनी नटे अवनी हृदयी मनरमणी वलये भली सुखसंवेदनांची ज्योत झरे अंजनाची गरज अटळ कळ तळकाळजाची बिन अक्षर परिभाषा वाणी बिन अक्षर परिभाषा शोध भरे ऋतु लयवित क्रांती अविरत स्पंदन खल एकांती मन साधन पण क्षितीज अनंत लेश न गावे हाती मनन स्मरण क्षण जतन करावे जनन मरण पडछाया देही जनन मरण पडछाया ...........................अज्ञात
काव्यरस

विदूषक

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 29/01/2013 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
काय माझ्या रेखिले आहे कपाळी व्हायचे वटवृक्ष की साधी लव्हाळी मागते आहेस का आषाढ श्रावण वाट चुकला मेघ आहे मी उन्हाळी स्पर्श,स्वप्ने,पाकळ्या,गझला नि माझ्या काळजामध्ये किती जपशील जाळी लागतो द्यावा सुखाला रोज पत्ता दुःख येते प्रत्यही शोधीत आळी आसवांवर तेवते आयुष्य माझे वेदनांची साजरी करतो दिवाळी फुंकरी घालू नका जखमांवरी या मी विदूषक द्या मला निर्व्याज टाळी -- उपटसुंभ
काव्यरस

प्रेम - तुझे माझे ...

लेखक विदेश यांनी मंगळवार, 29/01/2013 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
‎'तुझ माझ्यावर खरच प्रेम आहे - ' --विचारून माझ्या प्रेमाचा का अपमान करतोस रे..... वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेबरोबर तू सावरलेल्या माझ्या चेहऱ्यावरच्या अवखळ बटा... सागरतीरी मी वाळूत ओढलेल्या रेघोट्यावर तुझे अलगद फिरलेले बोट... ओलेत्या माझ्या चेहऱ्यावरचे तू आपल्या ओठांनी टिपून घेतलेला पावसाचा एकेक थेंब... क्याफेतल्या उष्टावलेल्या कॉफीच्या मग धरलेल्या माझ्या हातावर तो हळूच फिरलेला तुझा हात ... डोळ्यात डोळे घालून अगणित काळापर्यंत पाहिलेले एकमेकांचे प्रतिबिंब ... माझ्या हृदयाच्या कप्प्यातल्या एका कोपऱ्यात मी दडवलेल्या त्या सगळ्या आठवणी ... तू कधीच आपल्या मनाने जाणून घ्यायला हव्यास
काव्यरस

खजुर - सफरचंद खीर

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 29/01/2013 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी !! खरं तर ह्या खीरीची रेसेपी मी पुढल्या आठवढ्याकरिता ठेवली होती पण केल्यावर ती चवीला ईतकि छान झाली कि तुमच्याशी शेअर केल्याशिवाय रहावलं नाहि. दिलेलं साहित्य पाह्ता उद्या संकष्टि चतुर्थि चा उपास सोडण्याकरिता करायला हरकत नाहि. बघता काय मग...घ्या देवाचं नाव आणि करा सुरवात! Kheer साहित्यः १. रसरशीत लाल सफरचंद - ३ २. खजुर - १० ३. तुप - २ चमचे ४. केशर - चीमुटभर ५. साखर - आवडिप्रमाणे कमी/जास्त ६. दुध - १ लिटर ७.

पद्म पुरस्कार - 'टू लिट्ल अँड टू लेट'?

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 29/01/2013 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतातील एक दिग्गज गायिका एस. जानकी यांनी या वर्षीचा पद्मभूषण पुरस्कार नाकारल्याची बातमी अलीकडेच वाचली. आपल्याला दिलेला पुरस्कार आपल्या लौकिकाला साजेसा नाही आणि तो देण्यात खूप उशीर झालेला आहे ('टू लिट्ल अँड टू लेट') असे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले आहे. हिंदुस्थानी संगीतशैलीतल्या कलाकारांपैकी उ. विलायत खाँ यांनी अशाच भावना व्यक्त करून पद्म पुरस्कार नाकारला होता, तर पं. रविशंकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यावर पं. जसराज यांनी उघडपणे नाराजी दर्शवत पं. रविशंकर यांच्यावर कंपूबाजी केल्याचा/ दबावतंत्र वापरण्याचा ('लॉबिंग' केल्याचा) आरोप केला होता.

नाणेघाट

लेखक स्पा यांनी मंगळवार, 29/01/2013 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
नाणेघाट : मध्यम श्रेणीचा ट्रेक उंची : अंदाजे २७०० फूट जिल्हा: पुणे कसे पोहोचाल : १. कल्याण मार्गे : मुंबईकर कल्याण ला येऊन तिथून कल्याण - मुरबाड - टोकावडे - वैशाखरे असे करत नाणेघाटाच्या पायथ्याशी पोचू शकतात. इथून नाणेघाटात जायला साधारण २ तास लागतात २. पुण्या मार्गे : पुण्याहून जुन्नर - घाटघर करत थेट नाणेघाटात येता येते . भल्या पहाटे थंडीत निघून बरोबर ७ च्या आसपास आम्ही मिपाकर (मी, शैलेंद्र ,सौरभ उप्स ) नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या नामनिर्देशक बोर्डापाशी पोचलो. गाडी खालीच लावली (होय, यावेळी बायका नव्हत्या सोबत ) आणि वर निघालो. थंडीसोबतच जंगलात तुफान वारं सुटलेलं होतं.