Skip to main content

हिंसा आणि अहिंसा...

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 02/02/2013 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
मोहनदास करमचंद गांधी यांच्यासंदर्भात दोन-तीन धागे गेल्या काही दिवसांत मिपावर चर्चेत आले आहेत. काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. धाग्यांवरील चर्चेत काही जण गांधी यांच्या अहिंसावादाचे समर्थक आहेत. बाकी काही जण त्याचे विरोधक आहेत. ते असो. जे अहिंसेचे विरोधक आहेत, त्यांच्या मांडणीतून काही गोष्टी मला जाणवल्या (हे माझे आकलन, समज वगैरे आहे): १. गांधींनी मांडलेली अहिंसा ही एक प्रकारे कमजोरीच असते, तो भ्याडपणा असतो. २. गांधींची हत्या समर्थनीय ठरू शकते, कारण नथुराम गोडसे यांची (यांची, याची नव्हे) तशी राष्ट्रविषयक, मातृभूमीविषयक धारणा होती. ३.

आई

लेखक शुचि यांनी शनिवार, 02/02/2013 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री मैत्रिणीबरोबर "आई" या अथांग विषयावर खूप गुज बोलून झाले. सकाळी उठले तेच हुंदका गळ्यात दाटून. या विषयावर एक तर लिहाल तितके कमी आहे शिवाय कविता हा माझा प्रांत नाही. पण जे काही खरडले ते गोड मानून घ्यावे. आशा करते कवितेमागील भावना पोचतील. संस्कार, त्याग, गर्भाशय, ऊब, दिलासा, अंगाईगीत, उन्हात वणवणताना मिळालेली शीतल सावली व झुळूक सवयी, व्यक्तीमत्त्वाची जडणघडण आणि हो प्रार्थनादेखील. नाळ, रुजलेली पाळंमूळं व दाटून आलेला हुंदका सुद्धा या सार्‍या गोष्टींचा , लहान प्रेमळ देव आणि त्याला जोडलेले हात. माझं भलं तिला लागो, तिचं वाईट मला मिळो.
काव्यरस

नजीक किनारे

लेखक कौस्तुभ आपटे यांनी शनिवार, 02/02/2013 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
नजीक किनारे येता कैसी नावच बुडते रे पैशाच्या फुंकरीने जळते सुर्य विझती रे कसा पाऊस होतो छोटा अन पैसा होतो मोठा हे व्यस्त प्रमाणी अवघड मज ना समिकरण सुटते रे..... त्यांनी भुर्रकावे लोणि मी ताकच का प्यावे दुखणे ऐसे ठणकत रहाते , अवघड जागीचे ही खोड जीत्याची रे, त्या मरण कसे यावे. इथे हरल्या पोथ्याही, गीता,गाथा , ओव्याही. कसा मोहासाठी विवेक आपला गहाण पडतो रे नजीक किनारे ... गंजुन गेली शरपंजरी तरी विरक्ती ना आली जीव अडकला सत्तेसाठी मरणही वेशीशी ही शर्यत सत्तेची इथे अट ना अंताची, त्यां भय ना पापाचे दानव वा देवांचे जरी गर्दन मारा तरी अशांची शेपुट फडफडते नजीक किनारे ... गीत - कौस्तुभ

मुतपीठसाठी लेख : कृपया मदत करा

लेखक खटासि खट यांनी शनिवार, 02/02/2013 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
लिखाणाचे निमित्त : खुमखुमी उद्देश : मनोरंजन, विरंगुळा फायदे : मिसळपाववर (कु)प्रसिद्ध होणे टार्गेट ऑडियन्स : मुक्तपीठचे नियमित वाचक प्रस्तावना : नमस्कार सदस्यहो. मला पुण्यनगरी देशी प्रसिद्ध व्हावेसे वाटत असल्याने एक लेख लिहून वर्तमानपत्रास पाठवावयाचे ठरवले. मी तसा चांदोबा. चंपक, ठकठक आणि सकाळ नियमित वाचतो. सकाळ मधे इमारतीच्या शेजारच्या मुतारीचा वास हे पत्र लिहीले होते. ते छापूनही आले होते. पण प्रसिद्धी मिळाली नाही. लोक म्हणतात लेख लिही. मी आवडीने मुक्तपीठ वाचतो. त्यासाठी लेख लिहावा असे मनी आले. एक कच्चा मसुदा आपल्याला दाखवत आहे.

'विश्वरूपम' चा वाद काय आहे ? कोण सांगेल.

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 02/02/2013 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
हिन्दुस्थानातला विख्यात अभिनेता 'कमल हसन' याचा 'विश्वरूपम' चित्रपट अखेर काही ठिकाणी प्रदर्शित झाला येण्यापूर्वीच वादात अडकल्याने सर्वत्र त्याच्याबद्दल उत्सुकताही होती. अनेकदा हे वाद खरे मानायचे की प्रसिद्धीच्या क्लूप्त्या मानायच्या असा प्रश्न पडतो ? जमानाच तसा आलाय. एक नक्की हा चित्रपट २०१३ चा हिट्ट चित्रपट ठरणार असे दिसते त्याच्याबाबत जे वाद निर्माण झाले त्याबाबत सर्वांनी फक्त अंदाज व्यक्त केलेत नेमकं कुणीच काही बोलत नाही. 'विश्वरूपम' या नावामुळे काही वेगळ्याच कल्पना मनात येतात. पण ज्या लोकांनी विरोध केला आहे त्यावरून असे मानायला जागा आहे की विदेशी संस्कॄतीबद्दल काही भाष्य असावे ज्याच्य

स्वामिनी

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 01/02/2013 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
गविंच्या आदेशानुसार थोडं साध ललित लिहीता येत कां ते पाहतोय. किती जमलयं ते तुमच्या प्रतिसादांवरुन कळेलचं. तिचे आणि माझे नाते, स्वामिनी आणि चाकराचे. पण ती खुप चांगली आहे, हिडीस-फिडीस नाही करत कधी. तिची अट एकचं असते निमुटपणे तिच्या आज्ञा पाळणे. त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड चालत नाही तिला. मला तिचे सगळे मुड सांभाळायला लागतात. कारण मुळातच ती फार लहरी आहे. आणि तिच्या या लहरीपणामध्ये प्रचंड ताकद असते. त्या लहरींवर मी लाटेवरील कागदाच्या होडीसारखा असतो. तितकाच असहाय्य, तितकाच बिचारा.

ती खिडकी..!!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 01/02/2013 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप घेताना चेहरा हसरा ठेवलेला असतो .... निघण्याचा क्षण आता निसटून गेलेला असतो ... राहिलेली असते ...ती फक्त एक खिडकी ..!! विचारांचा कल्लोळ उडालेलं मन ... अडखळत टाकलेली काही पावले .. नव्या जगाचा , नवा ध्यास .. जुन्या फक्त ओळखीच्या आठवणी ... आणि एक अनोळखी खिडकी ..!! आपल्याला घेऊन उडणारा तो अफाट मोठा पक्षी ... आभाळाला जाऊन भिडण्यासाठी त्याने घेतलेला तो तुफान वेग .... भरून आलेले डोळे , दबलेला एक हुंदका ... आणि सोबतीला ..फक्त ती खिडकी ..!! थरारणारे काहीतरी , उडणारे काहीतरी ... नवीन वेगाने जुन्या वेगाला मागे टाकत घेतलेली भरारी..

कॉकटेल लाउंज : ब्लु गोवन हेवन

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 01/02/2013 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ब्लु गोवन हेवनपार्श्वभूमी: काजु फेणीच्या चवीवर एक्सपेरीमेंट्स करताना ही कॉकटेल रेसिपी हाती लागली. ब्लु कुरास्सो वापरुन निळ्या रंगाची समुद्राची निळाई ह्या कॉकटेलला आकर्षक आणि दिलखेचक बनवते. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे.
Taxonomy upgrade extras

आई ..

लेखक विदेश यांनी गुरुवार, 31/01/2013 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
ठेच लागता घाई घाई, तोंडी नेमके आई आई .. दु:खामधे मुखात येई कसे नेमके आई आई .. तळमळ जेव्हां जिवात होई मनीं नेमके आई आई .. समर प्रसंग सामोरी येई स्मरण नेमके आई आई .. बापाचा पाठी मार खाई तोंडी नेमके आई आई .. जन्म माणसा वाया जाई म्हटले ना जर आई आई ! .
काव्यरस