लेखकअविनाशकुलकर्णीयांनी सोमवार, 04/02/2013 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
पोळी की चपाती ??/
नेमके काय म्हणावे???
पोळी की चपाती?/
एक पक्ष....पोळी ही गुळाची ,पुरणाची असते.... साधी नेहमीची चपाती असते.
दुसरा पक्ष...चपाति असे काही नसते गुळाची असो वा पुरणाची वा साधी..ती पोळीच असते..
नेहमीच्या पोळीत पण साधी व घडीची असे २ प्रकार ...
बहुमत चपातीच्या बाजूने....
पोळपाटावर बनतात त्या पोळ्या...
चपाती मशीनमधे बनतात त्या चपात्या....असेही एक मत आहे..
चपाती हा शब्द कन्नड मधून मराठीत आलेला असेही वाचण्यात आले
म्हणजेच मूळ मराठी शब्द पोळीच.
लेखकदीपकशेठयांनी सोमवार, 04/02/2013 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
खूप प्रयत्न केले आणि अजुनहि करतोय आणि करेल.... पण यश काही येताच नाही आहे... काय करू जात जाताच नाही आहे ना....
मी माळी आणि ती मराठा.. एकमेकांवर खऱ प्रेम.. हो अगदी खर..
खूप प्रयत्न केले, ६-८ महिने झाले ती तिच्या घरी सांगतेय तरी सुद्धा तिचे वडील तयार होत नाही आणि त्यामुळे बाकी कोणीही पाठींबा देत नाही..
तिचे वडील गावी असतात.. गावी सर्व जन त्यांना खूप मान देतात, एकत्र कुटुंब, आणि घरात पण सर्वच मान देतात..आणी माझी मुलगी असा करतेय??
बरेच जनांना हा अनुभव येतो तसा आम्हाला सुद्धा आला, तीला धमकी देण्यात आली.. आम्ही सगळे किव्वा तो.. आणि असा काही केला तर मी माझ्या .....
हेच तर आम्हाला नको आहे ना...
लेखकपाषाणभेदयांनी सोमवार, 04/02/2013 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
सिटीबसमधले नाट्य
प्रवासी: आपलं हे एक द्या हो.
कंडक्टर (वैतागून): हे म्हणजे काय?
प्रवासी: अहो हे म्हणजे तिकीट द्या. एक सर्पोद्यान द्या.
कंडक्टर: काय नागाचा नाच बघायला चालला वाटतं?
प्रवासी: नाही हो. हे आपलं..
कंडक्टर: मग काय नागाला दुध पाजायला चाललात वाटतं?
प्रवासी: नाही नाही. तसं काही नाहीये.
कंडक्टर: मग तेथे नागाला तेथेल्या पाळणाघरात सोडायला चालले वाटतं? नाही म्हणजे पिशवी बरीच मोठी दिसतेय. गारूडी दिसताय अगदी.
(कंडक्टर "मन डोले मेरा तन डोले मेरा दिलका गया खयाल..." या चालीवर नाचतो. प्रवासीही त्यात सहभागी होतो.)
प्रवासी (भानावर येत): अहो नाही हो.
लेखकतर्रीयांनी रविवार, 03/02/2013 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
10th ची exam declare झाली. आयुष्यातला beautiful period खल्लास. Fundoo मजा केली शाळेत. बंटीची बॉडी उतरली, तरी बरे बंटीने ९ वीत सिगारेट सोडली. मला पण जाम कंटाळा येतो आजकाल सिगरेटचा. पमी कधी कधी कंपनी देते, पण ली भित्री आहे, चोरून चोरून ओढते. पमी पहिली टायगरची compass होती. त्यानेच तिला सिगरेट ओढायला लावले. साला तिला घेवून सिनेमेक्स ला morning show जायचा. टायगर च्या बापूची transfer झाली , कोण म्हणतो uncle ला हाकलले. तो साला पाहिजे होता १० वीत. टायगरला रोबर्टपण घाबरायचा. Science period ला रोज पमी ला घेवून बसायचा बाजूला. कधी कायपण बोलला नाय रोबर्ट त्याला. तशी पमी सहावीतच upgrade झाली होती.
लेखकअविनाशकुलकर्णीयांनी रविवार, 03/02/2013 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक परिवारात एखादा तरी घोरणारा प्राणी असतोच..
साथीदाराच्या घोरण्यामुळे तुमच्या झोपेचे खोबरे होत असेल तर त्याकडे तुच्छतेने दुर्लक्ष करू नका, घोरणे हे फक्त श्वासोच्छ्वासांतील अनियमितता नसून ते संभाव्य मोठ्या विकारांचे मूळ असू शकते.
असे वाचण्यात आले..
इंग्लंड मध्ये तर नवरा जोरात घोरतो त्या मुळे घतस्फोटा पर्यँत प्रकरण गेले असे वाचल्याचे स्मरते..
एकदा लग्न घरात रात्री झोपण्याचा भयानक अनुभव घेतला..
सीमांत पूजन झाले कढिभाताचे जेवण तब्ब जेवून " भट्ट जेवुनि तट्टची फुगले" अशी अस्वस्था होती.....
लेखकदिपक.कुवेतयांनी रविवार, 03/02/2013 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
आईसक्रीम....लहानांनपासून म्हातार्या-कोतार्यापर्यतचा एक आवडता प्रकार. आईसक्रीम न आवडणारा बहूधा विराळाच. आता तर काय सगळ्याच गोष्टी सहज मिळतात पण लहानपणी मिळालेल्या प्रत्येक गोष्टीच अप्रुप असायच...त्यातलच एक आईसक्रीम. समुद्रावर मनसोक्त खेळल्यावर भेळ, शेवपुरी किंवा कधी कधी भाजलेलं मक्याचं कणीस हे तर असायचंच पण सांगता शेवटी आईसक्रीमनेच व्हायची. हि उत्सुकता / ओढ शेवटी घरी फ्रिज आल्यावर संपली.
लेखकअविनाशकुलकर्णीयांनी शनिवार, 02/02/2013 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
वळवून मान तिने .मधाळ का हसावे?
वेडे मन हे ,त्यात त्याने का फसावे ?
कधी हो कधी नाही नेमके काय समजावे?
कधी हसणे कधी रडणे तिचे तिलाच ठावे
गुलाबी जिवणी.,का करावे विभ्रमी चाळे ??
होतो जीव चोळा मोळा, हे तिला का न कळे??
वेळी अवेळी भेटणे,वाट निसरडी,वय कोवळे
कसे समजवू तिला ,मन मुळापासून उन्मळे
खवळला तो सागर, सुटले पिसाट वारे
तरी लोटतेस होडी वादळात ,हे आहे का बरे ??
अविनाश