कुठचा राग कुठच्या प्रसंगी गावा याचे शास्त्रीय संगीतात काही संकेत आहेत. ते नियम आहेत असे समजू नये. जास्तीत जास्त कोमल स्वरांचे राग संधीकाळी व शुद्ध स्वरांचे राग पूर्ण प्रहरी असे सर्व साधारण विभाजन आहे. जे राग जास्त आर्त आहेत - मारावा , पूरिया ते सायंकाळी व जे प्रसन्न आहेत ते सकाळी - बिभास , भैरव , तोडी अशी त्यांची विभागणी आहे. साधारणपणे भैरव व भैरव थाटातले राग पहाटे गातात. कोमल ऋषभ हा ( जीवघेणा) स्वर हया सर्व रागांचा प्राण आहे.
दोनीही मध्यम असणारे राग - यमन , छायानट , बिहाग , केदार , भूप हे रात्रीच्या पहिल्या प्रहारचे मात्तबर राग ( ओपनिंग बेंटस्मन ). म्हणून ते मैफिलीच्या सुरवातीला गातात.