<अवाक्षर>
कोणालाही न पटणार्या, पण लिहीलेल्या लेखांची ही स्टोरी. न पटता (किंवा पटण्याची शक्यता नसताना) ते कशाला लिहीले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. ते पटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा प्रतिसादतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायचं नाही.... फक्त लिहायचं.
लेखनाचा उद्देश ठाऊक नाही पण लिहायचं,... वेड्यासारखं लिहायचं.
आजूबाजूच्या मिपाकरांना जुमानतंय कोण?
शब्दाशब्दातून 'मी'पण त्यात लॉजिक कुठले बोंबलायला ?
आपलंच मिपा म्हटल्यावर झक मारत वाचणारच आणि लोकं चुका काढतायत म्हटल्यावर आपलंच खरं न करून सांगतोय कुणाला?
अरे एक सांगायच राहिलं, अतार्किक लिहायच....फार मजा येते.
मस्कत कट्टा - दोघांचाच पण दिलखुलास..
नमस्कार मंडळी,
कामानिमित्ताने कुठे कुठे फिरणं होत असतं हे तुम्हाला माहिती आहेच, असाच उडतउडत इकडे मस्कतमधे आठवडाभर येउन पडलो, एक दिवस इकडे जरा स्थिरस्थावर होण्यात गेला, मग नेहेमीप्रमाणे इथे पहायला काय आहे, फिरायला काही आहे का वगैरे शोध चालू झाला, फेसबूकावर ज्योतीतैशी गप्पा मारता मारता, तिने सांगीतले आपले मिपाकर प्रभाकर पेठकरकाका तिकडेच असतात, जमलं तर भेट.
काकबन
एका काकबनात असंख्य कावळे नांदत होते. वेगवेगळ्या मतप्रवाहाचे थवे होते त्या काकबनात. पत्येक थवा आपापल्या मतप्रवाहांवर ठाम होता. त्या मतप्रवाहांमधली विवीधता त्या काकबनाचे वैषिठ्य होते. अनेक नविन कावळे त्या बनात येऊन आनंदाने विहार करायचे. बरेच कावळे त्या काकबनात असलेल्या थव्यांना बिचकूनही असायचे. कारण हे थवे कधी कधी झुंडीने काही वेगळेपणा दाखवणार्या कावळ्यांवर तुटून पडायचे. त्या काकबनाच्या इतिहासात असे बरेच वेगळे असणारे कावळे हार मानून काकबन कायमचे सोडून निघून गेले होते. त्यात त्या काकबनाचेच नुकसान झाले. पण हे त्या थवे करुन रहणार्या कावळ्यांच्या कधी लक्षात आलेच नाही.
नानाचा अग्रलेख.....!
लैट्स.....!, कॅमेरा.......!!! अक्षन .....!!!!!! फाट्ट .......!!!!!!!!
......याच्या पुढे काय करायचं आणि काय पोपटायचं हे सगळं सांगितलेलं असतं. तोंड रंगविलेल्या बाहुल्यांनी जमेल तितकं पोपटायचं. फार मोठे संवाद नसतात. पाठांतर झेपायला नको ? दोन चार दोन चार वाक्यंच. तुकड्या तुकड्यांनी पोपटायचं. "....एक साला मच्छर आदमीको..हिजडा बना देता है......वेग्रे वेग्रे !! थोडेफार जे काही कपडे अंगावर चढविले असतील ते संभाळत डायरेक्टरने उठ म्हटलं की उठायचं. बस म्हटलं की बसायचं. रड म्हटलं की ग्लीसरीन ओतुन घ्यायचं आणि पड म्हटलं की दरी डोंगरात सुद्धा स्पंजच्या गादीवर अलगद पडायचं. हे कर, करायचं. ते कर करायचं.
देव - सनातन प्रश्न!
देव आहे अथवा नाही? सनातन प्रश्न. चावून चोथा झालेला विषय. त्यात ही आणखी एक भर. असो.
प्रत्येकाची धारणा वेगळी. प्रत्येकाचे मत वेगळे. कोणाची बरोबर अन् कोणाची चूक हे आपण कोण ठरवणार? हा अधिकार कोणाचा? त्यातही मी कोणावर विश्वास ठेवायचा?
देवाचं अस्तित्व नाकारयचं म्हटलं तर मला आपसुक एक प्रश्न पडतो- संतांचं म्हणणं, वागणं, त्यांचे अनुभव, त्यांनी सांगीतलेलं मर्म; हे सर्व थोतांड होतं असं मी मान्य करू शकतो का? माझ्या ते पचनी पडतं का? कारण तसं नाही झालं तर आपल्याच मताशी अप्रामाणिक असल्यासारखं होईल. मी स्वत: तरी ते करू शकत नाही. कारण संतांवर मी अविश्वास दाखवायचं एकही संयुक्तिक कारण मला सापडत नाही.
पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनहो, ऐका अध्यात्माच्या कहाणीचा ब्रम्हघोटाळा ...
नमस्कार मंडळी. मी चित्रगुप्त...
आता या चित्रगुप्ताचा अध्यात्माशी काय संबंध? असे तुम्ही म्हणत असाल.
अहो, अध्यात्म म्हणजे आत्म्याचा ८४ लक्ष योनीतून होणारा प्रवास, आणि सरतेशेवटी लाभणारा मोक्ष. या सर्वांचा लेखा-जोखा ठेवणारे तर आम्हीच ना!...पण आता या सर्व उचापतींचा हिशेब लिहून लिहून आमचं कंबरडं पार मोडलय. निवृत्त होऊन या केंव्हा या कटकटीतून मुक्त होतोय, असं झालंय...
... बघा, की आम्ही अनंत काळापासून आमचं काम इमाने-इतबारे करत आलो. पूर्वी इतर पशुपक्षी खूप असले, तरी मनुष्यप्राणी फारच कमी होते. दिवसभर शिकार वा शेतीची कामं करून सूर्य मावळताच झोपून जायचे. त्यामुळे उचापती कमी, हिशेब ठेवणं सोपं.
झेन कथा - सहनशिलता
मिपा वरील अलीकडील काही लेख, त्यावरील प्रतिसाद आणि त्या प्रतिसादांचे पडसाद वाचुन मला ही झेन कथा आठवली.
योग्य/अयोग्य, पाप/पुण्य, साक्षर/निरक्षर, इश्वरवादी/निरीश्वरवादी ई. वादग्रस्त वातावरणात थोडासा शितल शिडकाव करावा हा हेतु.
चंदन पुर गाव.
या गावात लहु लोहाराच एक दुकान असतं.
चंदन पुर गाव.
या गावात लहु लोहाराच एक दुकान असतं.रामदासी संप्रदायाचा कन्हेरी मठ
कण्हेरी मठ- मठाधिपती श्री.वासुदेव स्वामी
हा फोटो श्री.वासुदेव स्वामी - मठाधिपती कण्हेरी मठ यांच्या समाधीचा आहे. हे पूर्वाश्रमीचे सदाशिवशास्त्री येवलेकर! "वाद-विवदात हरल्यास जीभ कापून देईन" असा अहंकार असलेले!
मिसळपाव
***