Skip to main content

ती राजकन्या आणि मी..??

लेखक Yash यांनी बुधवार, 20/03/2013 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
तो खूपच थकून गेला होता. मागचे काही दिवस ऑफिसमधील काम इतक वाढलेल होत कि त्याला जेवायलाही वेळ मिळत नव्हता. तो PC समोर बसून files check करत होता. त्याला काहीच सुचत नव्हते. त्याला असं उदास बसलेलं पाहून अमोद त्याच्या इथे येऊन म्हणाला “अविनाश बस झाल आता चल जरा खाली जाऊन काही तरी खाऊन येऊ. तू तर आज धड जेवला पण नाहीयेस.” “नको रे कंटाळा आलाय खाली उतरायची पण इच्चा नाहीये.” “अरे चल ना अव्या (अविनाश) काम तर होतच राहतात म्हणून काय आपलं जेवणखाण सोडून चालत का ? चल निदान ज्यूस तरी घे.” “बर चल कटकट करू नको.” अविनाश आणि अमोद एका चांगल्या सोफ्टवेअर कंपनीत कामाला होते.

ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.

लेखक बॅटमॅन यांनी बुधवार, 20/03/2013 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २.१ मागील लेखात इलियडमधील २४ बुक्सपैकी पहिल्या ३ बुकांचा सारांश आला होता. आता बुक्स ४ ते १० यांमधील कथाभाग पाहू. पहावे तिकडे नुस्ती मारामारी-महाभारतात "धनुर्भिरसिभिर्भल्लैर्गदाभिस्तोमरर्ष्टिभि:" असे त्या तुंबळ युद्धाचे वर्णन दिलेय अगदी तश्शीच. शृंगार झाल्यानंतर होमरबाबांच्या अंगात वीररस उसळी मारू लागलाय असेच वाटते ती बुक्स वाचून. आधीचे संक्षिप्त ब्याकग्रौंडः मेनेलॉसबरोबरच्या मारामारीत जखमी होऊन पॅरिस पळाला.

कॉर्पोरेटिझम, समाज आणि संशोधन

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 20/03/2013 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
“It is one of the great ironies of corporate control that the corporate state needs the abilities of intellectuals to maintain power, yet outside of this role it refuses to permit intellectuals to think or function independently.” ― Chris Hedges तुमचा भुतांवर विश्वास आहे का? तुमचा भानामतीवर विश्वास आहे का? तुमचा देवावर विश्वास आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या चालीवर तुमचा ग्लोबल वॉर्मिंगवर विश्वास आहे का असा प्रश्न लोक एकमेकांना विचारताना पाहिले की विज्ञान ही एक श्रद्धा-अंधश्रद्धा ठेवण्याची गोष्ट आहे की काय असे वाटू लागते.

काक मृत्यू

लेखक मेघनाद यांनी बुधवार, 20/03/2013 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
एक कावळा मुंबईच्या सकाळच्या सुंदर कोमल वातावरणात आकाशात घिरट्या घालत होता. आपल्या मित्र परिवारात विहार करत असताना तो खाली उजाडत असलेल्या मुंबई नगरीचे दृश्य देखील पाहत होता. काहीवेळात तो आणि त्याचे काही मित्र उडत उडत भायखळा रेल्वे स्थानक परिसरात आले. तिथे येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या, त्यातून उतरणारी ठीगभर माणसे, बायका, पोर. उतरल्यावर त्यांची जिना गाठण्यासाठी होणारी धावपळ हे सर्व तो कावळा रेल्वेच्या विद्युत पुरवठा तारेवर बसून पाहत होता, आणि अचानक काही कारणास्तव त्याच्या पंखांना तारेतील विजेचा जोरदार झटका बसला तसा तो खाडकन भानावर आला आणि दुसऱ्या क्षणी जमिनीवर देखिल.

सीमारेषा

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 20/03/2013 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे तसे फार अवघड असते गं ------ श्वासाइतकीच सवयीची झालेल्या तुझ्या आणि माझ्यातील अंतर आता समुद्र आणि चंद्राइतकेच आहे एकतर रात्रिशिवाय नजरानजर नाही आणि समुद्राला तो चंद्र स्पर्शातित.... आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे फार अवघड असते गं ------- सूर्यास्तानंतर चंद्रोदयापर्यंतच्या वेळात तुझे भास मृगजळासारखे मागेपुढे करतात कटलेल्या पतंगामागे धावण्यार्‍या मुलासारखा मीही त्यांचा पाठलाग करत राहतो मगं जाणवत ज्या झाडावर पतंग अडकलाय त्याच झाडामागे चंद्रही अडकलाय आता चंद्र आणि पतंग यात निवड करणे आले, पण चंद्रही हाताला लागत नाही अन् तो पतंगही...
काव्यरस

जिकड खोबर, तिकड चांऽऽगभल!!!

लेखक साऊ यांनी बुधवार, 20/03/2013 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
आता सांगायच म्हणजे फारा वर्षापुर्वीची गोष्ट. आता किती वर्षापुर्वीची म्हणता? तर बघा त्या सिद्दी जौहरनं ते वेढा घातला होता किनी पन्हाळ्याला तेंव्हाची. तेंव्हाची म्हणा किंवा त्या आधीचीही असेल, पण मला आपली वाटते; तेंव्हाची, म्हणुन तेंव्हाची!! तर तेंव्हा काय झाल तर सारा मुलुख लुटला गनिमांनी. बायाबापड्या बाटवल्या. मंदिरं तोडली. देवादिकांच्या मुर्ती फोडल्या. उभी पिकं कापुन न्हेली हत्ती घोड्यांना चारायला. जित्रापंच्या जित्रापं पळवली कापुन खायला. असा वणवा पसरावा तशी पसरली त्यांची फौज दख्खनावर. कुठं कुठं आसरा र्‍हायला नाही. माणसं सैरावैरा पळाली रानोमाळ. शिवाजी राजा सुद्धा संकटात पडला.

तिरफळाची बांगड्याची आमटी.

लेखक ज्योति प्रकाश यांनी मंगळवार, 19/03/2013 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)५-६ ताजे बांगडे. २)१०-१२ लाल मिरच्या. ३)हळद्पूड. ४)खवलेला नारळ(अर्धा नारळ) ५)५-६ आमसुले. ६)८-९ तिरफळे. ७)मीठ. ८)एक चमचा धणे. कॄती :-बांगड्याचे तुकडे करून घ्यावे.खवलेले खोबरे,मिरच्या,धणे,हळद एकत्र वाटावे.वाटण आमटी करणार त्या भांड्यात काढून घ्यावे.त्यात मीठ व ठेचलेली तिरफळे घालून शिजत ठेवावे.उकळायला आले की त्यात बांगडे व आमसुले घालावी.व आमटी चांगली उकळून घ्यावी.

शित्याची खोड

लेखक नरेश_ यांनी मंगळवार, 19/03/2013 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
शित्याशेट ज्याम दिवस गावातनं गायप झाल्ता.कुनाला कय खबर ना पता. नाय म्हनाल आशिला सांगला व्हता क मामासकरं जातू म्हनून! शित्याशेट म्हनजे सिताराम म्हात्रे- हा तोच तो. एक नं. झोलर मानुस.मागं पन आपल्याला तो भेटलावता.