Skip to main content

संक्षीप्तानुभव

संक्षीप्तानुभव

Published on 17/12/2012 - 09:30 प्रकाशित मुखपृष्ठ
मिपाच्या काही सदस्यांशी नुकत्याच गप्पा झाल्या. मिपावर येणारे जिलब्यापाडू धागे, धोधो येणारी खल्लास विडंबनं, नवलेखकांचा नवखा उत्साह, स्वतःची मतंच खरी मानणारे, ती दामटणारे काही सदस्य असं सगळंच त्यात आलं. मग पुढे लेखन कसं हवं, कसं नको, प्रतिक्रिया कशा द्याव्या, कशा नसाव्या हेदेखील. या निमित्ताने पटणाऱ्या, न पटणाऱ्या बऱ्याच गोष्टींची उजळणी झाली. या सगळ्या उचापतीचा सारांश म्हणून हे जिलबीचं ताट.. हे ताट भरायला हातभार लावणाऱ्या (आणि लावणार असलेल्याही) इतर बल्लवांचेही आभार. :-D ... मिसळपावच्या दुनियेमध्ये आहेत काही सदस्य त्यांच्यापैकी एकांचे काही कळेना हे रहस्य न लागू दे टोटल तरी धागे तू काढावे गरज असो नसो भले प्रतिसादही द्यावे चर्चा होईल वादळी, परि अर्थ? .. शून्य. झाला नाही उपयोग तरी तू मात्र धन्य. म ची बाराखडी आहे विशेष प्रिय तुला सदा तुझा घोष सुरू - मी.. माझे.. मला. नसलेल्या मुद्यावर शब्दाळल्या भाषी एकुलत्या एका संदर्भावर लिही लिही लिहिशी बघता बघता जमून येते वाचकांची गर्दी ४०, ५०, ६० प्रतिसाद.. होत राहते भरती धाग्यावरती आल्यावर चालवायची शाब्दिक कात्री एकेकट्या सदस्याशी मात्र करायची असते मैत्री तुझ्या मताविना वेगळे असूच नये काही दरवेळी हाच हट्ट..? असं बरं नाही. ऎकवले कोणी चार शब्द की खट्टू होते मन आपलंच असं का होतं हे बघायचं नाही पण गाणं, कविता, अध्यात्म, असो कोणताही 'विषय' सग्गळ्यातलं सग्गळं तुलाच कळतं. खरंच का रे ...असंय?

याद्या 6203
प्रतिक्रिया 34

In reply to by मोदक

आपकी नजरोने समझा व्यनीके काबिल मुझे सब प्रतिसादको ठहर जा मिल गया कातिल मुझे..

हं! एकुण ऑरगॅझॅमिक लेखन दिसतय.

कवितेविषयी नंतर.. भूछत्र आणि कोडाईकॅनाल हे काय आहे ते आधी कोणीतरी सांगा आणि अडाण्याचा दुवा घ्या.. (जालीय दुवा नव्हे.. )

In reply to by बॅटमॅन

ते कोडाईकनालचे भूछत्र कवितेबरोबर बाय डिफॉल्ट चिकटते. या विषयी जास्ती बोललो तर अवांतर होवून आमच्या आधीच्या विडंबनाच्या आठवणी निघतील म्हणून इतकेच. ;-)

In reply to by कवितानागेश

भूछत्र आणि कोडाईकॅनाल हे काय आहे> उपरोक्त माहितीसाठी कृपया 'संपादक मंडळ' या आयडीला व्यनि करा.
वेल, ही खरंच काय भानगड आहे बरं? कृपया कुणीतरी मला व्यनि करून सांगा... :P व्यनि पाठवणार्‍याचा आयडी गुप्त ठेवला जाईल.. :D

In reply to by एस

नक्की कारण माहिती नाही... पण धाग्याची वर्गवारी करताना "काव्य" विभाग निवडलाकी "भूछत्र आणि कोडाईकॅनाल" आपोआप चिकटते.

लैच बारीक निरिक्षण बाबौ. नेक्स्ट ट ट टSSSSSSS ?

और भी आने दो. :) -दिलीप बिरुटे

अरेच्चा.... हे चावायचं आपलं वाचायचं राहूनच गेलं. ह्याची बॅलन्स शीट बनवायला एखाद्या 'सी ए' कडं च जावं लागणार की वो इनिगोय! कुनी हाय काय 'वळकीचं'? ;)

काय प्रतिसाद पाडावा समजेना झालंय :) वर्गवारीत सामील होण्याची भीती आहे ;)

In reply to by ५० फक्त

पुंडलिक वरदे हारीठ्ठल, स्री द्य्नादेव तुकाराम... फंडरीनात म्हाराज कि जय, ज्ञानेस्वर म्हाराज कि जय, झालंस्तर पिंपळपार म्हाराज कि जय..... :)

आमचेही चार आणे. नसलेल्या मुद्द्यावर, शब्दाळल्या हाती एकल्या संदर्भावर लिहित तू राही अंती येशी कोपयाशी, दुखावेल मन पायाखाली घसरलेले वाळूचे अंगण धाग्यावर जमून येईल वाचकांची गर्दी मंद स्मित करतील कवितेचे दर्दी

अक्शी शालजोडितन कि व ...:)