Skip to main content

आमची मुंबई गलिच्छ मुंबई!

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 17/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच एका जागतिक सर्वेक्षणात मुंबई हे सगळ्यात गलिच्छ शहर असल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे. तसेच सौजन्याने वागण्यातही मुंबई पिछाडीवर आहे. अगदी सगळ्यात शेवटी नाही एवढेच. गेल्या काही वर्षात जेव्हा जेव्हा मुंबईला जायचा प्रसंग आला तेव्हा ते शहर अधिकाधिक घाणेरडे वाटत होते. लोकल जायचा मार्ग हा एक लांबच्या लांब कचराकुंडी आहे असे वाटले. समुद्राचा रंग गटारासारखा किळसवाणा होता. बाकी भिकारी, वाटेल तिथे मलमूत्रविसर्जन वगैरे होतेच. ह्या सर्वेक्षणाच्या निकालावरून ह्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जुन्या सिनेमात मुंबईचे दर्शन होते तेव्हा एक छानसे शहर दिसते. प्रशस्त रस्ते, प्रेक्षणीय इमारती पण आता हे सगळे इतिहासजमा झाले आहे असे वाटते. अफाट श्रीमंत असणारे हे शहर घाणीचे माहेरघर बनावे हा एक विरोधाभास वाटतो. ह्यात कधीतरी सुधारणा होईल का? मराठी मुंबईचा घोष करणारे आणि मुंबईवर राज्य करणारे शिवसैनिक ह्या बाबतीत काही करतील का? http://daily.bhaskar.com/article/MAH-MUM-filthiest-streets-mumbai-is-on…

वाचने 4129
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

परिस्थिती काही प्रमाणात सत्य आहे,पण अस्सल मुंबईकराला किळस वाटण्याऐवजी दु:ख वाटतं. मुंबईवरचं प्रेम घाणीने कमी होत नाही.

सेंट्रल रेल्वे ने येताना असं वाटतं खरं, पश्चिम रेल्वे खुप क्लीन आहे. आणि कोणत्या समुद्राचं पाणी काळं दिसलं हो तुम्हाला. समुद्र तर व्यवस्थित आहेत बॉस. बकालपणा वोट बँक पॉलिटिक्स ने झाला आहे. त्याला काँग्रेस+ राष्ट्रवादी+ भाजपा+ शिवसेना ह्या सर्वांनी खतपाणी घातलं आहे. मग केवळ शिवसैनिकांवर आगपाखड कशासाठी ?

In reply to by अमोल खरे

२०१२ जून अखेरीस मरीन ड्राईव्हजवळ गेलो होतो. समुद्राजवळून चालायला छान सोय केली आहे. पण पाणी? घाण घाण घाण! उंच लाटा उसळत होत्या पण अंगावर चुकूनही त्या पाण्याचे शिंतोडे उडू नयेत अशी प्रार्थना करत कसाबसा पळ काढला. गलिच्छ, राखाडी, काळपट दिसणारे दुर्गंधी पाणी. नको वाटले. लहानपणची आठवणीतील मुंबई व तिथला समुद्र इतका गलिच्छ कधीच आठवत नाही. जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, गोराई बीच हे सगळे चांगलेच वाटले होते. एका सुंदर शहराचा असा दुर्दैवी कायापालट होऊ नये असे वाटते. पण कालाय तस्मै नमः!

घाण कुठल्या भारतीय शहरात नाही? कोलकाता विसरलेत वाट्टं हे लोक. शिवाय सौजन्याबद्दल सांगायचे झाले तर अन्य बरीचशी शहरे आहेत ;)

In reply to by बॅटमॅन

>>शिवाय सौजन्याबद्दल सांगायचे झाले तर अन्य बरीचशी शहरे आहेत उदाहरणादाखल एखादं नाव दिलंस तर धागा शंभरी पार व्हायला मदत होईल. ;)

In reply to by सूड

हॅ हॅ हॅ...उदाहरणार्थ त्या शहराला अनुल्लेखाने मारणे हीच बेष्ट स्ट्रॅटेजी आहे ;) उगीच मुंबैच्या धाग्यावर त्याने का म्हणून ट्यार्पी खेचावा? शिवाय खबो जाप यांच्या मताशी सहमती. तसे झाले असण्याची शक्यता लै जास्त वाट्टे =))

In reply to by बॅटमॅन

सर्वेक्षणाच्या दिवशी नेमकी त्या विशिष्ट जाज्वल्य स्वाभिमानी शहरातील मोठ्ठी झुंड मुंबईत येऊन दाखल झाली होती की काय अशी शंका मला चाटून गेली. कारण मुंबईचे लोक इतके उद्धट वाटले नव्हते. असो.

In reply to by हुप्प्या

स्वतःच्या झालेल्या अपमानाचे खापर कारण नसताना 'स्वाभिमानी' शहरावर फोडणार्या मानसिकतेचा तीव्र निषेध - एक "स्वाभिमानी शहर " निवासी आवांतर: मुंबई बद्दल आम्हालापण आपलेपणा वाटतो हो… आणि मुंबई विषयी असलं काही ऐकून मनाला त्रास ही होतो …

आणि ह्यावर सगळ्यात वाईट म्हणजे शनिवारी जवळ जवळ सगळी news channels निर्लज्ज असल्या सारखे मुंबई कशी घाण आहे हे शोधून शोधून दाखवत होते .........

अरेरे ! :)

आता शिवसैनिकांनी काय मुंबई बकाल करणार्यां विरोधात आंदोलन करायची कि काय ? का खळ्ळ खट्याक करायचे मग हे सो कॉल्ड गांधीवादी उर बडवायला मोकळे की हि गुंडगीरी आणि हुकुमशाही आहे म्हणुन बाकी काहि नाही चालु द्या आपल बाकी आम्ही आता मो. रफीच गाण ऐकतो ऐ दिल है मुष्किल जीना यहा जरा बचके ये है बंबई मेरि जान (मुंबईचा गव्हर्नर) घाश्या कोतवाल

पाण्याच्या रंगाविषयी बोलायचे तर न्यू यॉर्कचा संपूर्ण किनारा असाच काळाशार आहे. हडसन नदीही दोन्ही काठांवर तशीच काळी आहे.काही जागी बांधलेल्या लाकडी पॅटिओंखाली काळा अट्लांटिक घनगंभीर धडका मारताना विषण्ण आणि भयावह वाटते.गाजावाजा करून शुद्ध केलेल्या चिमुकल्या थेम्सचेही तेच. हां,किनारे मात्र अतिस्वच्छ आहेत. मग मुंबईची काय कथा? आता मुंबईत रहाणे ही काळ्या पाण्याची शिक्षा आहे असे काही जणांना वाटत असते त्याला काय करणार?[इथे मु.आणि मु.(या नदीविशेषां)ची आठवण आलेली नाही याची खात्री असावी.]

हा सगळा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा अमराठी धनाढ्य लोकांचा डाव आहे.

In reply to by चिरोटा

लंबर एक प्रतिसाद आवडला. हहमुव. -दिलीप बिरुते

In reply to by चिरोटा

मुंबईस सीईओ हवा वगैरेवरून चर्चा झाली असेल असे समजायला हरकत नाही!

In reply to by चिरोटा

पुण्याच्या अस्मितेवर काढलेल्या धाग्याला प्रतिउत्तर म्हणुन कोणीतरी (सपे पुणे) न्युजचॅनेलवाल्यांना उचकवलेले दिसत आहे

मुंबईत येउन धडकण्यापूर्वी जर इच्छुकांना समजली तर किती बरे होईल! निदान येणारे लोंढे तरी थांबतील.

In reply to by सर्वसाक्षी

मुंबईत लोंढ्यानी येणारी माणसं फक्त जगण्यासाठी धडपड करणार्‍यांपैकी असतात. त्यांना स्वच्छता, पर्यावरण वगैरेंशी काहीच देणंघेणं नसतं.

In reply to by दादा कोंडके

सहमत आहे. आमचे तीर्हरूप जेव्हा कोकणातून मुंबईत आले तेव्हा मुंबई स्वच्छ आहे की कशी याची चवकशी केली नसणार असे वाटते.

साहेबांच्या काळात काय मुंबई होती राव त्याने मैदाने ,राणीचा बाग अगदी लंडनच्या धर्तीवर मुंबई वसवली. ह्याचा उल्लेख राजसाहेबांनी सुद्धा पुण्यातील एका सभेत केला होता. पण काळ्या साहेबांनी पार वाट लावली. भूखंडाचे श्रीखंड खाऊन तृप्त जाहले. धारावी ही त्याची मुंबईला देणगी भाई म्हणतात तसे एकेकाळी मुंबईतील रस्ते पाण्याने धुतले जायचे. साहेब गेला आणि उरल्या त्याच्या आठवणी म्हणूनच आता अमेरिकेतून सार्‍या जगाचा साहेब परत बोलावला आहे. त्याने आता आंदोलने पुरस्कृत करावी ,प्रसार माध्यमे नियंत्रित करावी , राजकारणी सुद्धा त्यासाठी लॉबिंग करावे व त्याचा जमाखर्चाचा ताळेबंद सुद्धा द्यावा ,