मि.पा वर नवीन सोयींबाबत
नमस्कार. मि. पा. वर मी तसा नवीनच आहे. भटकंती करता करता मनोगतावरुन इथे आलो आणि इथलाच होतोय हळूहळू.
एक दोन सोयी मि. पा. वर असाव्यात असे वाटते.
१. शोध: एखादी कथा, कविता, लेख आवडला आणि चुकून वाचनखुणेत घालायचा राहिला तर काही दिवसांनी परत आल्यावर तो पुन्हा सगळ्या पानांवर शोधत बसावा लागतो. त्याऐवजी प्रत्येक विभागात अथवा संपूर्ण मि.पा. वर 'शोध'ची सोय ( Search Functionality) असल्यास त्याचा खूप उपयोग होईल. त्याचप्रमाणे, एखाद्या विषयावर मि.पा. करांनी किती लेख / कविता / चर्चा केल्या आहेत तेही शोधणे शक्य आणि सोपे होऊन जाईल. लेखाप्रमाणेच मि.पा.कराबद्दलही हे करता येईल.
मिसळपाव