एकला चालो
सन १९८८,डिसेंबर तिला प्रथम भेटलो मी. सकाळी सात वाजता सगळे मित्र मैत्रिणी रायगड पिकनिक साठी पु.लं.च्या भ्रमण मंडलागत उभे होतो. ढापण्या विनायक टीम लीडर सर्वांना काहीबाही सूचना देत होता मैत्रिणी ते ऐकत उभ्या होत्या आणि मित्र "पकवतोय रे!! मंजुला इम्प्रेस करतोय" सारखे वाग्बाण त्याच्या दिशेने भिरकावत त्याला टेन्शन देत होते.
मी बस स्टोपच्या रेलींगला पार्श्वभाग adjust करत हे सगळे पाहत होतो. कोवळी उन्हे सगळ्यांच्या अंगावरून झिरपत होती, किंचित थंड वातावरण त्यामुळे काही जणांचे चेहरे दिसत नव्हते पण एक गुलाबी कि चंदेरीशी छटा सर्वांची एक औट लाईन दाखवत होती.
मिसळपाव