Skip to main content

श्री. मकरंद साठे यांच्या Identity च्या संदर्भातील मांडणी बाबत पडलेले काही प्रश्न.

लेखक कुमारकौस्तुभ यांनी सोमवार, 23/12/2013 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम काही गोष्टी स्पष्ट करतो. 1- खालील निबंधातील निवडलेला भाग ( मात्र जसा आहे तसा साठेंच्याच शब्दात) हा श्री.

रॅबिट प्रुफ फेन्स

लेखक निनाद यांनी सोमवार, 23/12/2013 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
रॅबिट प्रुफ फेन्स सुमारे १९३०चा सुमार. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या ग्रामीण भागातली जिगालाँग ही एक छोटीशी आदिवासी वस्ती. ही वस्ती रॅबिट प्रुफ फेन्स या कुंपणाला लागून होती. या गावात तीन बहिणी आपली आई आणि आज्जी यांच्या सोबत रहात असत. चवदा वर्षांची मॉली, आठ वर्षांची डेझी आणि दहा वर्षांची ग्रेसी. स्वच्छ निळे आकाश आणि जमिनीशी असलेले घट्ट नाते यांच्या बळावर आनंदात दिवस चालले असत. इकडे हजारो मैल दूर 'ऑस्ट्रेलियन आदिवासींचा रक्षक' असे सरकारी पद असलेला नेव्हिल हा या तीन मुलींना आपल्या कुटुंबापासून धोका असल्याने शिक्षणासाठी म्हणून त्यांना आई वडिलांपासून वेगळे करण्याच्या आदेशावर सही करतो.

जिमी (पूर्वार्ध)

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 23/12/2013 04:27 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या नोकरीचा पहिला दिवस नेहेमीच जरा भीतीदायक असतो. काम जमेल का? सहकारी कसे असतील? हजार प्रश्न. त्या नोकरीच्या वेळी तर धोपटमार्गा सोडून मुद्दाम बिकट वाटेची वहिवाट करायला घेतली होती. आमच्या सत्तावन पिढ्यांत कोणी हॉटेलात नोकरी केली नव्हती. मीही तसा कारकुनी पेशात असल्यामुळे करण्याची शक्यता नव्हतीच, पण या हॉटेलाने नोकरी देऊ केली, म्हटलं बघूया तरी कसं असतंय. मध्य मुंबईतल्या जागेचे भाव प्रचंड. त्यामुळे हॉटेलातली जास्तीत जास्त जागा गेस्ट एरिया म्हणून वापरायला ठेवलेली. त्याखालोखाल किचन, बेकरी वगैरेचा नंबर. त्याखालोखाल हाऊसकीपिंगचा.

चायवाला -!_/~

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 22/12/2013 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
काल आमच्या ऑफिसच्या चायवाल्याने गोंधळ घातला. घाबरला बावरला, डोळ्यात पाणीही आले बिचार्‍याच्या. २२-२४ वर्षांचा मुलगा म्हणजे अगदीच काही लहान नाही, आपला तर खास फंटर ! कधी आपण जागेवर नसलो तरी आठवणीने चहा ठेवतो.. बघावे तर तसे हे एकच कारण, खास असण्याचे. पण ज्या आपुलकीने चहा पाजतो त्याने स्वताला खास झाल्यासारखे वाटते. म्हटलं तर कुठलीही देवाणघेवाण हा एक धंदाच, पण त्यात थोडा भावनांचा ओलावा आला की त्याचे आपलेच एक नाते बनते. काल कदाचित त्याच नात्याने त्याला तारले. वॉशरूममधून जागेवर आलो तेव्हा त्याचे एकेकाच्या जागेवर जात चहा वाटपाचे काम चालू होते.

आणि रजनीकांत रडला - धूम ३

लेखक मृत्युन्जय यांनी रविवार, 22/12/2013 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
१८ मे १९७४ भारतीय इतिहासात एक अतिशय क्रांतिकारक घटना घडली. पोखरण मध्ये पहिली अण्वस्त्र चाचणी घेण्यात आली आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रमुखांनी डॉ. होमी सेठनांनी पंतप्रधानांच्या सचिवांना दूरध्वनीवरुन ही रोमांचकारक बातमी देताना सांकेतिक भाषेत सांगितले "आ़णि बुद्ध हसला. काही लोकांच्या मते "आणि बुद्ध हसला" वगैरे असे काही सांगितले गेले नाही. ही नंतर बुद्धजयंतीचे निमित्त साधुन काही लोकांच्या डोक्यातुन निघालेली सुपीक कल्पना असेल. डिसेंबर २०१३ मध्ये एक अशीच अजुन एक क्रांतिकारक घटना घडली. धूम ३ प्रदर्शित झाला.

थोडं थोडं जगून घे

लेखक वैभवकुमारन यांनी रविवार, 22/12/2013 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
(व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे) "गड्या थोडं थोडं जगून घे" किती पळशी पैश्यामागे नको पैश्याचे अरण हे पैश्यावाचून गरीबाची तू शांत झोप ती बघून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. बघ आकाशी निळे रंग हे बघ पक्ष्यांचे खुले छंद हे एकच पक्षी थव्यातला तो डोळ्यात तुझ्या भरून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. नकोच विचार वयाचा तो नकोच विचार भयाचा तो उरात बालपण भरूनिया तू मनात दंगा करून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. येतील दु:ख असंख्य कधी वाहील डोळी नीर नदी कधीतरी मग अथांग सागर उधाणलेला बघून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं

मूर्तीपूजा

लेखक राही यांनी रविवार, 22/12/2013 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
सगुणोपासकांच्या श्रद्धा आणि भक्तीप्रती पूर्ण आदर आहे. कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा). देवाला सगुणरूपात मानल्याने हिंदूंत मूर्तिपूजा रूढ झाली आणि ती हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण बनली. या बरोबर देवळे, पुजारी, दैनिक सोहळे, उपचार, प्रसाद, हार, फळे ,फुले, नैवेद्य, दागिने-मुकुट-माळा-कंठ्या, गर्दी, फसवणूक, लुबाडणूक, अस्वच्छता, अराजक आदींची एक मोठी व्यवस्था/अव्यवथा उभी राहिली आणि आता ती इतकी दृढमूल झालेली आहे की त्याशिवायचा हिंदुधर्म कल्पिताच येत नाही.

पौष्टिक पदार्थ (१) बीटच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी.

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 22/12/2013 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुलांच्या आवडी-नावडी फार असतात. बहुतेक पदार्थ आणि भाज्या आई-वडिलांना आवडत नाही पण पोरांच्या नावाने बोंब मारायला मोकळे होतात आमच्या मुलांना हे आवडत नाही किंवा ते आवडत नाही. . केवळ बटाटा, अरबी आणि भिंडी शिवाय दुसरी भाजी न आवडणारे, पुष्कळ मुलें बघितली आहे. आमच्या सौ ला न आवडणाऱ्या भाज्या मुलांच्या पोटात कसं पोहचवायचं ही कला चांगलीच अवगत आहे. तिने खाऊ घातलेले मुलांना आणि मला, पदार्थ आपल्या पर्यंत पोहचवीत आहे. माजी मुले सर्व भाज्या आनंदाने खातात त्याचे श्रेय सौ लाच. बीट आयरन युक्त अत्यंत पौष्टिक कंद आहे. पुरी आणि बटाट्याची भाजी मुलांना आवडतेच.

झुळुक वादळी

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 22/12/2013 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
युगे जाहली जळून पण अंगारा अजून दाही कलेवरे उरली स्वप्नांची डोळा भरून कांही काजळ वाटा धूळ फ़ुफ़ाटा दिशा व्यापल्या दाही सुकलेला पाचोळा भिरभिर उडवत वारा वाही अंध मोहरे काळे गहिरे पोत मानवत नाही वठलेल्या रेषांचे व्रण अवशेष वाहती भोई पराधीन मायामय जीवन झुळुक वादळे तीही ओहटीत कवने वचनांची जगणे लाट सदाही उलगडणे वाळूसम काठावर लोटांगण घेई खोल तळातिल दडलेले सागर पृष्ठावर येई फेस दुधी विरघळे उफाळे फुटे अंगभर लाही श्वासांचे दळणे आदळणे चिर अंदोलत राही …………………. अज्ञात
काव्यरस

ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग २ ऊर्जेचे उगमस्थान

लेखक आनंद घारे यांनी रविवार, 22/12/2013 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज मागील भागावरून पुढे चालू ... आपल्या रोजच्या ओळखीचे परंपरागत ऊर्जेचे काही प्रकार आपण पहिल्या भागात पाहिले. पण आपल्याला यांच्याबद्दल कितीशी माहिती असते? आपल्या हातापायांमधले बळ आपल्याला खाण्यापिण्यामधून मिळते एवढे सगळ्यांना माहीत असते. लाकूड जाळल्याने जशी आग निघते त्याचप्रकारे पण एक सौम्य आग (जठराग्नि) आपल्या पोटात तेवत असते आणि त्या अग्नीला अन्नाची आहुती देतांना आपण एक यज्ञ करत असतो असे 'वदनि कवळ घेता ..