Skip to main content

गपचिप

लेखक आतिवास यांनी शनिवार, 28/12/2013 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची आई येकदम वाईट. च्या काय देत नाही कदी. ही मोटी मान्सं बरी च्या पित्यात. आमाला मात्र न्हाई. आण्णा म्हन्त्यात, “चहा नको पिऊ; काळी होशील.” त्यादिशी पाटीलकाका आल्ते. आई च्या दिऊन बोलत बसली तितचं. मला म्हन्ली, “बेटा, तेवढी कपबशी आत नेऊन ठेव मोरीत. न फोडता ने.” आता पावणे होते; तेंच्यासमोर आईचं ऐकाया पायजे ना! वाईट असली ती तरी! पाटीलकाकांनी कपात उलिसा च्या तसाच ठुला व्हता. म्या पिऊन टाकला तो गपचिप. येकदम झ्याक. तवापासून आले पावणे, की उचल कपबशी ... प्या च्या..... पावणे नाय आले तर? म्या रस्त्यावर जाऊन कुणालाबी सांगतिया “आई-आण्णा बोलावत्येत” म्हनूनशान. आई करतेच च्या. म्याबी पिते. उलिसा. गपचिप.

अभिनेता फारुख शेख काळाच्या पडद्या आड....

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 28/12/2013 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
एक धक्कादायक बातमी आपल्या सहज अभिनयाने प्रत्येक प्रसंग सुंदर करणारे फारुख शेख काळाच्या पडद्या आड गेले. र्‍हदयविकाराने त्यांचे दुबईत निधन झाले. त्यांची प्रथम ओळख सई पराम्जपेंच्या "चश्मेबद्दूर" या चित्रपटाने झाली त्यापूर्वी त्यानी चित्रपट केले होते मात्र त्याना खरी ओळख या मुळे मिळाली. "किसीसे ना कहना, नूरी , बाजार , उमरावजान या चित्रपटांमधून त्यानी आपली वेगळी ओळख प्रस्थापीत केली.

मेरा नाम चिन चिन चू…….

लेखक Atul Thakur यांनी शनिवार, 28/12/2013 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
हिन्दी चित्रपटाच्या पडद्यावर शृंगार आणि विभीत्सपणा यांच्या सीमारेषा बरेचदा फारच पुसट झालेल्या आढळतात. यात शुद्ध शृंगाराचा अनुभव हेलनने तीन दशकं प्रेक्षकांना दिला. वासना हा शब्द मला वापरण्याची इच्छा नाही कारण त्याला अनेक अर्थांची पुटं चढली आहेत. मात्र माणसातली “काम” ही आदीम प्रेरणा जागवण्याची कला या मदनिकेत होती. प्रदीर्घ काल हेलन स्वतः निवृत्त होइपर्यंत तिला या कलेत अनेकांशी स्पर्धा करावी लागली. हेलनच्या समोर उभ्या असलेल्या अभिनेत्री साध्या नव्हत्या. सौंदर्यात मधुबाला, अभिनयात मीना कुमारी, नृत्यात वैजयंती माला असे अनेक मानदंड त्यावेळी प्रतिष्ठा पावले होते.

कारल्याची भाजी

लेखक काकाकाकू यांनी शनिवार, 28/12/2013 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ४ मध्यम आकाराची कारली (बिया काढून, जरा जाडसर काचर्‍या कराव्या.) २-३ हिरव्या मिरच्या ८-१० कढीपत्याची पाने फोडणीचे साहित्य (मोहोरी, हिंग, ह्ळद या क्रमाने फोडणीत घालावे) मीठ (चवीप्रमाणे) गूळ (१/४ कप) कोथिंबीर (बारीक चिरलेली १/४ कप) तेल १/४ कप (ह्या कृतीत तेल जरा जास्त लागते) कृती: १. तेल जरा जाड बुडाच्या पातेल्यात गरम करुन फोडणी करावी. फोडणीत हिंग नेहमीपेक्षा जरा जास्त घालावा. २. फोडणीत मिरच्या व कढीपत्याची पाने घालून जरा परतून घ्यावी. ३. आता त्यात कारल्याच्या काचर्‍या घालाव्या. वर मीठ घालून नीट परतावे. ही भाजी करताना पातेल्यावर झाकण अजिबात ठेवायचे नाही. ४.

(प्रणयासक्ती)

लेखक मूकवाचक यांनी शनिवार, 28/12/2013 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रणयासक्तांच्या प्रेमभावना आणि निसर्गदत्त वासनांप्रती पूर्ण आदर आहे.कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा). पुनरूत्पादनाच्या सहजप्रेरणेतून प्रणयासक्तीचा उगम झाला आणि पुढे काम हा पुरूषार्थ गणला जाण्यापर्यंत या भावनेचा प्रवास झाला. भोळ्याभाळ्या लोकांनी मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाखाली घडणार्‍या या गतानुगतिक, ओंगळ आणि कष्टप्रद वर्तनाला मर्दानगी, स्त्रीत्व समजायला सुरूवात केली. काहींनी मातृत्वाची आस वगैरे उदात्तीकरण करायला सुरूवात केली.

टिकले तुफान काही

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 28/12/2013 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
टिकले तुफान काही

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी
आभाळ झेलले ते उरले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे

मिर्झा ग़ालिब...........भाग-१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 27/12/2013 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रांनो, हातातील सर्व लिखाण बाजूला ठेवून हा लेख लिहायला घेतला आहे याचे कारण आज बरोबर २१६ वर्षापूर्वी एक थोर शायर या पृथ्वीतलावर परमेश्वराने धाडला आणि अगणित अक्षरश: अगणित रसिकांना त्याने त्याच्या शायरीने वेड लावले. नजिकच्या काळात वेड लागलेला मीही त्यातलाच. त्याच्यावर आज लिहिले नाही तर त्याच्या दरबारात क्षमा मिळेल की नाहे याची शंकाच आहे.

रेजोल्यूशन

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 27/12/2013 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
२०१३ आता संपेल. आपण हॅप्पी न्यू इयर म्हणत सगळ्यांना शुभेच्छा देऊ, पार्ट्या होतील, दारूचे पाट वाहतील, टीव्ही वर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित होतील, त्याच धुंदीत जमल्यास गेल्या वर्षीचा जमाखर्च मांडत आपण पुढच्या वर्षाला आलिंगन देऊ. व्हॉट्सॅप्प, फ़ेसबुक, इत्यादी माध्यमातून जगाला विश केलं जाईल, विविध ‘रेजोल्यूशन्स’ केली जातील, जगाशी शेअर केली जातील.

ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग ४ अणूपासून ऊर्जा

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 27/12/2013 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग २ ऊर्जेचे उगमस्थान ऊर्जास्त्रोतांच्या शोधात- भाग ३ विजेची निर्मिती मागील भागावरून पुढे चालू ... एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीला मादाम मेरी क्यूरीने रेडिओअॅक्टिव्हिटीचा शोध लावला आणि पदार्थविज्ञानात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली.

कॉकटेल लाउंज : क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 27/12/2013 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail) पार्श्वभूमी: Crabby ह्या शब्दाचा Crabbie असा अपभ्रंश करून, मात्र त्याचा अर्थ तोच घेऊन, हे कॉकटेल बनले आहे. खरेतर मी घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतून Mixology मधला काहीतरी प्रयोग करायला गेलो आणि त्या प्रयोगाचे कॉकटेल ऑलरेडी अस्तित्वात होते हे आंजावर शोध घेता कळले, तेच हे क्रॅबी कॉकटेल. मालिबू रम हा ह्या कॉकटेलचा आत्मा आहे. मालिबू रमचे अंग म्हणजे 'एक मखमली' टेक्स्चर आणि चवही तितकीच भन्नाट! तिचे अननसाच्या रसाबरोबर जुळणारे सूत हे कॉकटेला एक वेगळीच 'उंची' देऊन जाते.