शब्द शब्द शब्दातच सारे
शब्द जिव्हाळा शब्द उन्हाळा
वडवानळ जळ शब्द पसारे
एक एकट्या एकांताचे
कूस छत्र घर शब्द सहारे
मुक्या जाणिवा गभुळ जखमा
आतुर माया शब्द शहारे
नभ संचित आकाश पवन घन
शब्दच वेडे ऋतु झरणारे
खोल ओंजळी लाव्हा अंकित
खुपणारे सल शब्द बोचरे
शब्द उतारा सकल प्रार्थना
आत्म संहिता शब्द खरे
.....................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1370
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख.
क्लास! सुपर्ब! भाव, लय, वजन,
रेखिव
ह्म्म्म्म्म..................
In reply to रेखिव by मिसळलेला काव्यप्रेमी