Skip to main content

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 30/12/2013 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- http://misalpav.com/node/25626 ...पुढे चालू धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....! ========================================== आपण धार्मिकपणा फारच पाळतो असा दृढं (गैर)समज असणार्‍या अश्या लोकांची काही व्यवच्छेदक लक्षण आहेत. त्यात प्रचंड तात्विक असणं.. हे आद्य लक्षण.. म्हणजे तत्व पाळलं गेलं कि व्यवहार आपोआप पाळला जातोच! असा एक हटकून गैरसमज.

महाभारतातील “चलाख” महापुरुष - भाग १

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 29/12/2013 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
mahabharat महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच. पराक्रमी, कसलातरी पीळ घेऊन जगणारी. प्रत्येकाचे पाय मातीचे. हर्ष, खेद, सुख, दु:ख, वेदना, लोभ, सूड, कौर्य अशा अनेकानेक भावनांचा विविधरंगी पट या कथेत गुंफला आहे. हा इतिहास पराक्रमी पुरुषांचा असला तरी त्यामागे कुशल राजकारणाचा देखिल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि या राजकारणाचे धागेदोरे महाभारतात फार दुरवर जाणारे आहेत. या राजकारणाचा विचार करताना तीन महापुरुषांनी केलेल्या घडवुन आणलेल्या घटनांचा परामर्ष या लेखात घेतलेला आहे.

भान

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 29/12/2013 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
'हे बघा तुमची मुलगी खुपच वेगळी वागते,'सासु म्हणाली, 'तुम्हाला म्हणायचे नेमके काय?एवढे दिवस काही नव्हते बरं ती काय नविन आहे का?,'मुलीचा बाप बापु म्हणाला, 'आता पर्यत खुप सहन केली, आता या पुढे जमणार नाही,'महेश मध्येच म्हणाला, 'बापु ह्याचं काही एकु नका हे तुमच्या समोर एक बोलतात आणि माघारी माझ्या समोर एक वेग़ळच बोलतात,'मुलग़ी ग़ीता म्हणाली, 'हो हो हो तुझावरच विश्वास ठेवतील बघ,शेवटी तुझा बाप,'सासु म्हणाली, 'आहो तसे नव्हे,दोघांचंही ऐकुण घेतोच की ,हे बघा महेशराव आतापर्यत देवाच्या आशिर्वादान ग़ोडी ग़ुलाबीन चालु होत, हो की नाय,'बापु हात करत, 'मग़ ह्या दोघाचं आता का पटंना?कारण दोघांनी ही एकमेकांना समजावुन घेत

भटकंती १

लेखक इन्ना यांनी रविवार, 29/12/2013 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
भटकंती -१ लहानपणी सायकल चालवता यायला लागली तो माझा पहिला प्रवास! आपापलं, मनसोक्त, अकारण भटकणे!! हळूहळू त्या प्रवासाची म्हणा, अथवा अनुभवाची, चटकच लागली. शाळेतून येताना, पुणे ३० ते गुलटेकडी, रोज नवीन रस्ता असो, वा गडकिल्ले असो, आजीच्या गावाला म्हशींच्या मागे जाणे असो वा शाळेतून गुंजवणी खोर्‍यात विविध उपक्रमांसाठी जाणे असो.

अंथर

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 29/12/2013 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
धुके सभोवर चराचरावर दोघे कातर एकांतावर गूढ वेदना हृदयी अनवट खोल कुठे निश्वास अनावर काळ दाटला पडद्यापाठी स्मरण अडखळे प्रतिमा धूसर शब्द स्तब्ध प्रतिबिंब आभासे; संरचना कांचेचे झुंबर लोलक फिरवी तरंग गहिरे द्वैत विचारांचे मन संगर ताल आडाणे अवघडलेले रान दुंदुभी वणवा मंथर आहे नाही संभ्रम अवघे सहवासाचे दुर्लभ अंथर उलाल रेषा अगतिक निष्फळ जुळवू पाहे समान अंतर …………………………. अज्ञात
काव्यरस

बिंब आणि प्रतिबिंब

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 29/12/2013 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
सहज वाटलं जीवनाची वाट चालताना एक प्रसन्न, सुंदर, सुगंधित फूल द्यावं तुला आणि तुझ्याकडे पहातच राहावं, तू ते फूल पहात असताना आणि मनातल्या मनात सांगत रहावं काळ पुरुषाला थांब, जरा थांब, अरे थोडासा तरी थांब का रे सतत घड्याळाचे काटे पुढे ढकलत रहाण्याची घाई तुला? असेच सतत राहू दे ना पहात मला बिंब आणि प्रतिबिंब, बिंब आणि प्रतिबिंब

लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य

लेखक माहितगार यांनी रविवार, 29/12/2013 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी अलिकडे पर्यंत गीतारहस्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ग्रंथ एवढच सामन्यज्ञान होत.पण एकेकाळी ह्या ग्रंथाने विक्रिचे तत्कालीन विक्रम केले असावेत असे वाटते. लोकप्रभा साप्ताहीकातील एका लेखात डॉ.यशवंत रायकर यांनी, '१९१५च्या जून महिन्यात प्रसिद्ध झालेल्या गीतारहस्याच्या सर्व प्रती संपल्यामुळे लगेच सप्टेंबर महिन्यात पहिले पुनर्मुद्रण करावे लागले.' अशी माहिती दिली आहे.या ग्रंथाचा जो भाग (बहुधा शेवटील भाग) ऑनलाईन उपलब्ध झाला ते १९२४ सालचे पुर्नमुद्रण आहे त्यावर ५००० प्रती असा आकडा आहे.

तुमको देखा तो ये खयाल आया …

लेखक निमिष ध. यांनी शनिवार, 28/12/2013 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक गरीब मध्यममार्गी विद्यार्थी, आपले एम ए चे शिक्षण घेणारा. छंद म्हणून शायरी करणारा. आपल्या घरापासून दूर कॉलेज असणाऱ्या शहरात राहणारा. नेहमी चहासाठी कॅन्टीन मध्ये दोस्तांबरोबर गप्पा मारत बसणारा. त्या नायाकामध्ये आणि आमच्यात खूप साधर्म्य होते कॉलेज जीवनात त्यामुळे की काय पण इतर बी ए पास आणि नुसत्या गाड्या उडवणाऱ्या हिंदी चित्रपट नायकांपेक्षा तो खूप जवळचा वाटायचा. जरी त्याच्या चित्रपटांत आणि आमच्या कॉलेज जीवनात एक-दीड पिढीचे अंतर होते तरीही तो जणू आपले प्रतिनिधित्व करतो आहे हे पाहून बरे वाटायचे.