नमिताचा क्लास (शतशब्दकथा)
कॉमर्सच्या बारावीला मार्कांचं एवढं काही कौतुक नसतं. तरी बोर्डात येणं भारीच! दहा मित्र-मैत्रिणींच्या ग्रूपमध्ये नमिताच बोर्डात आली होती. "माहेश्वरी आहे." कुळ्या म्हणाला. "कॉमर्सच्या बोर्डात नाही आली तर उपयोग काय मारवाडी असण्याचा?" सगळे जोरजोरात हसले. नमितासुद्धा, पण डोळ्यांत थोडी उदासी होती.
बाकीच्यांना बरे मार्क होते तसे, भारी काही नाही. सीए करायचं. "झावरे" लावायचा, का "जोशी", का "अग्रवाल" हे ठरंत होती. नमिता एकटीच बसली होती, कडेला.
क्लासचं विचारल्यावर म्हणाली, "काय पप्पा म्हणतील तसं..."
आठवड्यातच तिची लग्नपत्रिका सगळ्यांना पोस्टाने आली. लातूरचा तेलाचा व्यापारी होता.
मिसळपाव