Skip to main content

ज्योती

लेखक kalpana joshi यांनी मंगळवार, 27/08/2013 19:59 या दिवशी प्रकाशित केले.

अंतरीचा दिवा मालवू देऊ नको ,
प्रज्वलित ठेव ती ज्योत अंतापर्यत I
तिच देईल तुला आधार,
कार्य करण्या तत्पर होशील तू तयार I
अंधारातून मार्ग दाखवते ,
प्रगतीपथावर ती नेते ,वाट ती किती बिकट ,
खाच खळगे किती असती त्यावरी I
प्रयत्न कष्ट ,आत्माविशासाचा मार्ग दाखवते ती आम्हास,
असाध्य ते साध्य कराया सायास ,
तू जा या वाटेवरुनी उज्वल भविष्याची ती वाट मोकळी I
कवी म्हणतो ,
चालून आली नामी संधी ,
नाही दवडणार मी कधी ,
प्रकाश पडला अंतरीच्या मन चक्षुवरी ,
योग्य दिशा ,मार्ग सापडे त्यास,
तेवत राहू दे अंतरीचा दिवा अंतापर्यत I

लेखनविषय:

वाचने 998
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया