आई
असा एकही दिवस नाही,तुझी आठवण येत नाही,
सतत डोळ्यासमोर असते तू ,भू लोकी नसूनही करते पाखरण आमची I
मनात हूर हूर दाटून येते ,तू असतीस तर किती बरे वाटले असते,
मार्ग दर्शन तुझे लाभले असते ,काही वेळा काही सुचतच नाही I
चलबिचल मनाची होई ,तुझ्या फोटो समोर येऊन मी उभा राही,
तू गेल्याने झालेले नुकसान कसे बरे भरून येई?
मनातील पोकळी कशी बरे भरून येणार ?
तुझ्यावर भार टाकून अश्रूंना मोकळी वाट करून कशी देऊ ?
प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची आई तू , दुरून का होईना पाखरण करतेस तू ,
माया ,ममता प्रेमाचा तुझा स्पर्श , आठवणीत जपून ठेवला तो,
सुरक्षित असे आशीर्वाद रुपी कवच ,सौरक्षण करते आमचे ,
निर्भय पणे वावरतो आम्ही ,टप्पे टोणपे पचवतो आम्ही I
तू दाखविलेला कष्टाचा मार्ग ,अवलंबितो आम्ही,
तुझ्याच मार्गदर्शनाने पुढची वाट चालतो आम्ही ,
पण तू नाही ,याचे शल्य जाणवत असते मनी I
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1194
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
तू दाखविलेला कष्टाचा मार्ग
पुन्हा प्रयत्न करावा.
पुन्हा प्रयत्न करावा?
In reply to पुन्हा प्रयत्न करावा. by प्रभाकर पेठकर
पेठकरकाकांशी सहमत.